Chandragrahan : चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व
आज २०२५ वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. मुख्य म्हणजे हे पूर्ण चंद्रग्रहण असून, या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. आजचे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. या स्थितीमध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. (Marathi)
त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असे म्हटले जाते. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११:४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असून, यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्रग्रहणाबद्दलची काही खास माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Chandragrhan News)
चंद्रग्रहण हे पौर्णिमा तिथीच्या जवळपास दिसते. परंतु, प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण नसते. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत आल्यानंतर चंद्रग्रहण तयार होते. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्यामध्ये येते आणि पृथ्वीच्या सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण तयार होते. चंद्रग्रहण ही वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. ग्रहणाचे तीन प्रकार पाहायला मिळतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. (Marathi News)
छायाकल्प चंद्रग्रहण
पृथ्वीच्या सावलीचे प्रच्छाया (गडद सावली किंवा सावलीच्या मधला भाग) आणि उपछाया (थोडी पुसटशी, बाजूची सावली) असे दोन प्रकार आहेत. पृथ्वीची प्रच्छाया चंद्रावर पडते तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास स्थिती दिसू शकते. पण जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्या पुसटशा सावलीनं जे ग्रहण दिसतं, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण किंवा penumbral lunar eclipse असं म्हणतात. कधी कधी सावलीतला हा फरक मानवी डोळ्यांना चटकन लक्षात येईल इतका प्रभावी नसतो. अतिशय छोट्या स्वरुपाचं हे ग्रहण असतं. (Marathi Top News)
खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मून
चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.
खंडग्रास चंद्रग्रहण
चंद्राचा फक्त काही भागच पृथ्वीच्या सावलीखाली आला तर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यालाच इंग्रजीत partial solar eclipse म्हणतात. ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्रावर गडद लालसर ते चॉकलेटी रंगछटा दिसून येतात. (todays Marathi Headline)
पूर्ण चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली पूर्णपणे चंद्रावर पडते. या वेळी चंद्र काळसर लालसर दिसतो, ज्याला “ब्लड मून” असेही म्हणतात. ही घटना खूप दुर्मिळ असते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ग्रहणाच्या वेळी खगोलशास्त्रज्ञ विविध संशोधन करतात. भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाला धार्मिक महत्त्वही आहे. लोक या काळात उपवास, जप आणि प्रार्थना करतात. तसेच ग्रहण संपल्यावर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. पूर्ण चंद्रग्रहण ही निसर्गातील अद्भुत दृश्य मानले जाते. (Top Marathi Headline)
ग्रहणाचे आध्यात्मिक महत्त्व: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्हींचा मानवाच्या मनावर आणि ऊर्जेवर खूप खोल प्रभाव पडतो. सूर्य आणि चंद्राशिवाय मानवी जीवनाची कल्पना अशक्य आहे. सूर्य आणि चंद्र दोघांची ऊर्जा पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी आवश्यक असते. मात्र जेव्हा याच सूर्याला किंवा चंद्राला ग्रहण लागते तेव्हा या ऊर्जा नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही फायदे मनुष्याला देतात. याबद्दल आपल्या ज्योतिषशास्त्रात खूप लिहून ठेवलेय. ग्रहण काळात अनेक गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. जेणेकरून या शक्तींचा आपल्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये. या प्रभावामुळे या ग्रहणांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे. (Latest Marathi News)
ज्योतिषशास्त्रांच्या मते चंद्रग्रहण हे विविध राशीतून वेगवेगळे फळ देते. तसाच त्याचा प्रभावही वेगळा पाहायला मिळतो. पुराणात आणि धार्मिक ग्रंथात देखील याचा वेगवेगळा उल्लेख केला आहे. असे म्हटले जाते की, चंद्रग्रहणाचा हा काळ बदलाचा असतो. चंद्राचा मानवीय मेंदूवर खोल परिणाम पडतो म्हणून चंद्रग्रहणाचा आपल्यावर भावनिकदृष्ट्या प्रभाव असतो. (Top Marathi News)
चंद्रग्रहणाचा काळ हा बदलाचा काळ असतो. चंद्राचा आपल्या मेंदूवर खोल प्रभाव पडतो आणि म्हणूनच चंद्रग्रहणाचा आपल्यावर भावनिकदृष्ट्या खूप प्रभाव पडतो. चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या मनात खूप गोंधळ होतो. या काळात आपले अनेक निर्णय चुकीचे होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. आपल्या अवचेतन मनातून नकारात्मक भावना सोडवण्यासाठी चंद्रग्रहण ही चांगली वेळ आहे. पूर्ण चंद्रग्रहण दरम्यान नकारात्मक गोष्टी खूप शक्तिशाली बनतात, परंतु जे लोक ध्यान करतात ते त्यांची ऊर्जा मजबूत करू शकतात. चंद्रग्रहण काळात मंत्रोच्चार करणे आणि दान केल्याने देखील विशेष लाभ होतो. (Top Trending News)
=========
ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?
Chandrgrahan : चंद्रग्रहणात गरोदर स्त्रियांनी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
Chandragrahan : चंद्रग्रहण ‘या’ राशींसाठी शुभ, तर ‘या’ राशींसाठी अशुभ
=========
चंद्रग्रहणाचे वैज्ञानिक महत्व देखील खूप मोठे आहे. चंद्रग्रहण हे पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे. या खगोलीय घटनेमुळे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची सापेक्ष स्थिती आणि त्यांची अवकाशातील गती समजून घेता येते. शास्त्रज्ञांना चंद्रग्रहणाचे निरीक्षण करून ग्रह आणि ताऱ्यांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. चंद्रग्रहणाचे निरीक्षण आणि विश्लेषण करून भविष्यकाळातील चंद्रग्रहणांचा कालावधी आणि वेळ निश्चित करता येते, जे खगोलशास्त्रासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्रहणे ही वैश्विक घटनांचा भाग आहेत. यांच्या अभ्यासातून संपूर्ण विश्वातील ग्रह-ताऱ्यांच्या हालचाली, त्यांची उत्पत्ती आणि भविष्यातील बदलांचा अंदाज लावता येतो. (Social News)
Original content is posted on https://gajawaja.in/lunar-eclipse-of-september-7-2025-know-some-intresting-facts/
Comments
Post a Comment