Andhra Pradesh : श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातील नंदीचे रहस्य !

 

भारतातील अनेक मंदिरांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. या मंदिरांमधील गुढ आजही उलगडण्यात यश आलेले नाही. अशा काही निवडक मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे, श्री यागंती उमा महेश्वर स्वामी मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर आंध्रप्रदेशमधील नंदयाल जिल्ह्यात आहे. रहस्यांनी भरलेल्या या मंदिरातील नंदी महाराजांची मूर्ती ही सतत वाढत आहे. काही वर्षापूर्वी या नंदी महाराजांना भगवान शंकराचे भाविक प्रदक्षिणा मारायचे. मात्र आता ही मूर्ती वाढल्यामुळे हा प्रदक्षिणा मार्गही बंद झाला आहे. याशिवाय या मंदिराभोवती अनेक गुहा आहेत. यातील काही गुहांमध्ये प्रशस्त कक्ष असून याची निर्मिती कोणी, कशासाठी आणि कधी केली, हे कोणालाही माहित नाही. या मंदिरासमोर एक तलाव असून याभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. (Andhra Pradesh) Marathi news

याशिवाय या तलावाच्या भोवती अश्वधारी कल्कींचीही मूर्ती कोरण्यात आली आहे. त्यामुळे श्री यागंती उमा महेश्वर मंदिराचे आणि कल्की अवताराचे रहस्य असल्याचे सांगण्यात येते. भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांमधील घटना पाहून भाविक नतमस्तक होतात. या चमत्कारांना बघण्यासाठी या मंदिरांमध्ये भाविक गर्दी करतात. यापैकीच एक मंदिर म्हणून श्री यागंती उमा महेश्वर मंदिराचा उल्लेख करण्यात येतो. या मंदिरामधील नंदी महाराजांची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. हे रहस्य उलगडण्यासाठी अनेक तज्ञांनी प्रयत्न केला. यासाठी येथील मातीचे आणि दगडाचेही परिक्षण करण्यात आले. मात्र त्यातून काहीही निष्कर्ष निघाला नाही. या मंदिराचे पुजारी या नंदी महाराजांचा आणि कल्की अवताराचा संबंध असल्याचे सांगतात. त्यामुळेच या मंदिराबाबत अनेकांना उत्सुकता आहे. Latest Marathi news

श्री यांगती उमा महेश्वर मंदिर वैष्णव परंपरेनुसार बांधले गेले आहे. 15 व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या संगम राजवंशाचे राजा हरिहर बुक्क राय यांनी हे मंदिर बांधल्याची नोंद येथील शिलालेखात आहे. त्यानंतर पल्लव, चोल, चालुक्य आणि विजयनगर शासकांनी या मंदिराच्या भव्यतेमध्ये भर घातली. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर भाविकांची नजर येथील मोठ्या नंदी महाराजांच्या मूर्तीकडे जाते. या मूर्तीचा आकार दर 20 वर्षांनी सुमारे एक इंचाने वाढतो. यामुळे या मंदिराचे खांब काढावे लागले आहेत. मंदिरातील पुजा-यांच्या मतानुसार कलियुगाच्या अखेरीस ही मूर्ती एका विशाल स्वरूपात जिवंत होईल आणि त्या दिवशी महाप्रलय येऊन कलियुगाचा अंत होणार आहे. या मंदिरातील शिवमूर्तीची स्थापना प्रत्यक्ष अगस्त्य ऋषींनी केल्याची माहिती आहे. त्यांना येथे भगवान वेंकटेश्वराचे मंदिर बांधायचे होते, परंतु भगवान विष्णुच्या मूर्तीची स्थापना करत असतांना या मूर्तीचा अंगठा तुटला आणि ही मूर्ती बाजुला ठेवण्यात आली. (Andhra Pradesh) 

त्यानंतर अगस्त्य ऋषींनी भगवान शिवाची पूजा केली. त्यांच्या तपश्चर्येनं भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी हे स्थान कैलासासारखे असल्याचे सांगून येथेच भव्य मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर अगस्त्य ऋषींनी भगवान शंकराला या ठिकाणी माता पार्वतीसोबत अनंतकाळ राहण्यासाठी वर मागितला. म्हणून या मंदिराला उमामहेश्वरे मंदिर असेही म्हणतात. या मंदिरात एकाच दगडावर शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे. त्या मंदिरालाच पुढे राजा हरिहर बुक्कराय यांनी भव्य स्वरुप दिल्याचे सांगितले जाते. या सर्व मंदिर परिसरात कुठेही कावळा दिसत नाही. त्यामागे अगस्त्य ऋषींचा शाप असल्याचे सांगितले जाते. आख्यायिकेनुसार अगस्त्य ऋषी तपश्चर्या करत असतांना कावळ्यांनी त्यांना त्रास दिली. तेव्हा अगस्त्य ऋषींनी या सर्व क्षेत्रात कावळ्यांना प्रवेश बंद केला. आजही या भागात कावळे दिसत नाहीत. (Social News)

या मंदिराचे आणखी विशेष वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आवारात असलेली पुष्करणी. या पुष्करणीमध्ये टेकडीच्या तळापासून नंदीच्या मुखातून पाणी वाहते. हे पाणी वर्षभर या पुष्करणीमध्ये येते. आसपास कितीही दुष्काळ असेल तरीही ही पुष्कराणी कधीही कोरडी होत नाही. या मंदिराच्या मागे असलेली भव्य गुहा ही आणखी रहस्यमय आहे. याच गुहेत बसून ऋषी अगस्त्य यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. या गुहेत जाण्यासाठी 120 पाय-या चढाव्या लागतात. आता या गुहेमध्ये अगस्त्य ऋषी भगवान विष्णुची जी मूर्ती स्थापन करणार होते, ती ठेवण्यात आललेली आहे. (Andhra Pradesh) 

=========

Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?

=========

याच गुहेमध्ये संत श्री मद्विरत पोतुलुरी वीर ब्रह्मेंद्र स्वामींनी त्यांची प्रसिद्ध भविष्यवाणी लिहिल्याची माहिती आहे. आकाश दीपम हे येथील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. मंदिराच्या मागे असलेल्या खडकाच्या रचनेवर दिवा ठेवला आहे. पुजारी दररोज अवघड वाट चढून हा दिवा प्रज्वलित करतात. त्याच्या आकारामुळे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते प्रज्वलित ठेवण्यासाठी 4 लिटर तेल आणि 2 मीटर जाडीची वात वापरली जाते. कल्की भगवान येणार, त्यांच्यासाठी ही ज्योत लावत असल्याचे पुजारी सांगतात. अशा या चमत्कारांनी भरलेल्या श्री यागंती उमा महेश्वर मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात येथे भाविकांची संख्या अधिक वाढते. हा सर्वच परिसर निसर्गरम्य असल्यानं निसर्ग अनुभवण्यासाठी आणि या मंदिरातील चमत्कारांना प्रत्यक्ष बघण्यासाठी भाविक गर्दी करतात. (Social News)

Original content is posted on https://gajawaja.in/sri-yaganti-uma-maheshwara-swamy-temple-in-andhra-pradesh/




Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !