The Last Battle : छत्रपती शिवाजी महाराजांचं अखेरचं युद्ध !

Chatrapati Shivaji Maharaj एका योद्ध्याच्या वेशात कसे दिसत असतील ? कधी विचार तरी केलाय का ? म्हणजे आपण त्यांना पांढरे शुभ्र, स्वच्छ वस्त्र, डोक्यावर मंदिल असे अनेक फोटो, चित्र पाहिलेच असतील. पण मस्तकावर शिरस्त्राण घातलेले युद्धसज्ज वेशात रौद्ररूपी शिवराय पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून या युद्धाचं नेतृत्व करत आहेत, म्हणजे असं अंगावर काटा आणणाराच हा प्रसंग असेल. शिवरायांनी आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात जवळपास ३० युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे. कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो. पण तुम्हाला माहितीये की, शिवरायांनी आपली अखेरची लढाई कधी लढली होती. आज याच युद्धाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

हा काळ १६७९ दरम्यानचा… दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांच्या एका पूर्वनियोजित योजनेनुसार शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते. दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर शंभू राजे खानाच्या फौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. यावेळी शिवरायांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की तुम्ही शंभू राजेंना सुखरूप पन्हाळगडावर घेऊन या. याचवेळी शिवराय जालन्यामध्ये मुघलांवर चाल करून गेले होते. याचंही एक कारण होतं. ते म्हणजे दख्खनेत मुघलांवर दबाव आणायचा. त्यांची इथली आर्थिक फळी खिळखिळी करायची… आणि सोबत लष्करालासुद्धा कमकुवत करायचं. शंभू राजे विजापूरला होते. त्यातच मुघलांचा सरदार दिलेर खानही विजापूरवर आक्रमण करत होता.

यावेळी त्यांनी एक युक्ती केली होती. विजापूरला मदत करायची नाही, पण जालनामध्ये नुसता जाळ करायचा. म्हणून त्यांनी युद्ध टाळलं आणि जालनामध्ये धडक मोहीम टाकली. त्यावेळी जालना हे मुघलांचं महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. श्रीमंती, पैसा आणि मुघलांचा महसूलसुद्धा तिथेच जमा व्हायचा. शिवरायांची हीच योजना होती की, आपण जालना जाळून टाकला तर त्यांचं लक्ष विजापूरवरून हटेल. नोव्हेंबर १६७९ मध्ये शिवरायांच्या नेतृत्वात मराठ्यांनी जालना मोहीम फत्ते केली. जी लुट मिळेल ती सोबत घेतली. पण याचवेळी रणमस्त खानला ही खबर कळली आणि तो दहा हजारांची फौज घेऊन शिवरायांच्या मागावर निघाला.

आता संपत्ती भरगच्च होती. त्यामुळे मराठे थोडे संथ झाले होते. रणमस्त खानसुद्धा आपल्या फौजेसोबत मागेच होता. संगमनेर जवळच्या रायतेवाडी इथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. १८, १९ आणि २० नोव्हेंबर असे तीन दिवस इथे युद्ध सुरूच होतं. शिवराय त्वेषाने लढत होते. त्यांच्यासोबत हंबीरराव आणि धनाजी जाधव यांच्या तलवारीही तळपत होत्या. यानंतर खानाच्या दिमतीला आणखी कुमक औरंगाबाद म्हणजेच आजच्या छत्रपती संभाजी नगरमधून आली होती. पण मुघलांचा जोर वाढत होता, ते पाहून हंबीररावांनी शिवरायांना पट्टा किल्ला गाठायला सांगितलं आणि हंबीरराव पुन्हा मैदानात उतरले. या युद्धात मराठ्यांचे पराक्रमी सरदार सिधोजी निंबाळकर यांना वीरमरण आलं. युद्ध मराठ्यांनी जिंकलं. हेच युद्ध शिवरायांचं अखेरचं युद्ध होतं, ज्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.

Chatrapati Shivaji Maharaj ५०० घोडेस्वारांना घेऊन पट्टा किल्ल्यावर पोहोचले. पट्टा किल्ला मराठ्यांनी ८ वर्षांपूर्वीच म्हणजे १६७१ सालीच जिंकला होता. या किल्ल्यावर शिवरायांनी १७ दिवस विश्राम केला होता, म्हणून याचं दुसरं नाव ‘विश्रामगड’ ठेवण्यात आलं. या युद्धाच्या अवघ्या साडे तीन महिन्यानंतरच शिवरायांचं निधन झालं. तर असा होता शिवरायांच्या अखेरच्या युद्धाचा इतिहास ! 

this blog was originally published on https://gajawaja.in/the-last-battle-of-chatrapati-shivaji-mahara/

Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय