Mystery of China: ३००० वर्षांपूर्वीचे रहस्य आणि एका गायब झालेल्या जमातीची गोष्ट!
डोंगरांच्या भिंतींवर रहस्यमय पद्धतीने लटकवलेल्या या शवपेट्यांमध्ये एका प्राचीन जमातीची अनेक रहस्ये लपलेली आहेत. या पेट्यांमध्ये आहेत 3,000 वर्षे जुनी प्रेते आणि काही रहस्यमयी वस्तू! पण मुळात प्रश्न असा आहे की, या शवपेट्या इतक्या उंच डोंगरांच्या भिंतींवर लटकवल्या कोणी आणि कशा? या शवपेट्यांचे रहस्य जाणून घेऊया. (Mystery of China)
China च्या Yunnan आणि Sichuan प्रांतातल्या दुर्गम डोंगरांमध्ये जेव्हा कोणी या लटकलेल्या शवपेट्या पाहते, तेव्हा पहिल्यांदा वाटते की हे एखादे स्मशान आहे. पण हे काही साधे स्मशान नाही, कारण येथे मृतदेह जमिनीमध्ये पुरलेले नसून उंच डोंगरांच्या कड्यांवर लटकवलेले आहेत. फक्त एका डोंगरावर नाही, तर येथील अनेक डोंगरांवर आणि छोट्या-मोठ्या कड्यांवर अशा शवपेट्या दिसतात—कुठे 100 फुटांवर, तर कुठे 400 फुटांच्या प्रचंड उंचीवर! आता विचार करा, एवढ्या उंचीवर चढणे, तिथे लाकडी फळ्या बांधणे आणि त्यावर शेकडो किलो वजनाच्या शवपेट्या चढवणे… आजच्या आधुनिक काळातसुद्धा हे काम करायचे म्हटले तर खूप अवघड पडेल. मग हजारो वर्षांपूर्वी लोकांनी हे कसे केले असेल? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे—असे का केले असेल?
येथील स्थानिक दंतकथांनुसार असे सांगितले जाते की, पूर्वी येथे राहणाऱ्या लोकांकडे उडण्याची शक्ती होती! मात्र इतिहास चाळला तर कळते की, जवळपास 3,000 वर्षांपूर्वी येथे ‘Bo‘ नावाची एक जमात राहत होती. या जमातीबद्दल फारशी माहिती मिळत नाही. पण इतके नक्की माहीत आहे की, 1573 मध्ये Ming राजवंशाने China वर ताबा मिळवला आणि त्यानंतर त्यांनी Bo जमातीच्या लोकांना एक-एक करून मारून टाकले. अशा पद्धतीने Bo जमातीचे लोक पृथ्वीवरून नाहीसे झाले, पण जगासाठी मागे सोडून गेले एक न सुटलेले रहस्य—या लटकणाऱ्या शवपेट्यांचे! येथील परिसर इतका दुर्गम आहे की, अजूनही काही ठिकाणी माणसाने पाऊलही ठेवलेले नाही. संशोधकांनी जेव्हा या शवपेट्यांचे नमुने तपासले, तेव्हा कळले की सगळ्यात जुन्या शवपेट्या तब्बल 3,000 वर्षांपूर्वीच्या आहेत. म्हणजेच, त्या काळात Bo जमात येथे सक्रिय होती यावर शिक्कामोर्तब झाले. आतापर्यंत केवळ काहीच शवपेट्या हाती लागल्या आहेत, पण तज्ज्ञांच्या मते कदाचित अजूनही हजारो शवपेट्या या खडकांमध्ये लपलेल्या असू शकतात.
शवपेटीची रचना: या शवपेट्या एका अखंड लाकडाच्या ठोकळ्यापासून बनवल्या गेल्या होत्या. कोणतेही अवजड साधन न वापरता, फक्त कुऱ्हाड घेऊन झाडाच्या खोडाचा आतील भाग कोरून त्याला शवपेटीचा आकार दिला जायचा.
China Exploration and Research Society ने या शवपेट्यांचा सखोल शोध घेण्याचे ठरवले. यासाठी जगभरातून पुरातत्त्वज्ञ आणि संशोधक एकत्र आले. त्यांनी Yunnan मधील एका प्रचंड खडकावर मोहीम आखली, जिथे ६ शवपेट्या लटकलेल्या होत्या. तिथे थेट पोहोचणे अनुभवी गिर्यारोहकांसाठीही (climbers) अशक्य होते. त्यामुळे संशोधकांनी खडकाच्या वरून दोरीच्या मदतीने खाली उतरण्याचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे, ज्या लाकडी खांबांवर या शवपेट्या टिकून होत्या, ते पूर्णपणे सडलेले होते आणि कधीही कोसळतील अशा स्थितीत होते. संशोधनाला गती मिळाल्यानंतर एक थक्क करणारी गोष्ट समोर आली. प्रत्येक शवपेटीत एकाच नव्हे, तर अनेक माणसांची हाडे होती आणि त्यावर माती चिकटलेली होती. सुरुवातीला वाटले की पावसाचे पाणी किंवा माती आत गेली असावी, पण नंतर मुख्य कारण समोर आले 1) Bo जमातीचे लोक आधी मृतदेहांना जमिनीमध्ये पुरत असत. 2) शरीर पूर्णपणे विघटित झाल्यावर ती हाडे जमिनीतून बाहेर काढली जायची आणि या लाकडी शवपेटीत ठेवली जायची. 3) हाडे आतल्या आत इकडेतिकडे हलू नयेत म्हणून शवपेटीत रेती (वाळू) भरली जायची.
सर्वात मोठा प्रश्न हाच होता की, हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय या शवपेट्या वर कशा नेल्या? संशोधकांनी बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना खडकांवर छोटी-छोटी कृत्रिम छिद्रे दिसली, जी छिन्नी-हातोड्याने बनवलेली होती. Bo जमातीचे लोक या छिद्रांमध्ये बांबू ठोकून एक तात्पुरते ‘स्कॅफोल्डिंग’ (पाया) तयार करत असत.
या दाव्याची शहानिशा करण्यासाठी, 2003 मध्ये संशोधकांनी आणि Discovery Channel च्या टीमने एक प्रॅक्टिकल करायचे ठरवले. त्यांनी खडकात छिद्रे करून त्यात बांबूचे दांडे बसवले, जसे आजकाल इमारतीला रंग देताना बांबू बांधले जातात. त्यानंतर दोरी आणि ‘Ball Bearing’ (गराडी) सारख्या रचनेचा वापर करून दुसऱ्या बाजूने शवपेटी वर खेचली. यामुळे शवपेटीचे वजन जवळपास 50% कमी झाले आणि ती सहजपणे 300 फूट उंचीवर पोहोचली! हे संपूर्ण प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी केवळ 12 लोक आणि 3 दिवसांची मेहनत लागली.येथे सापडलेल्या काही शवपेट्यांमध्ये अतिशय बारीक, नक्षीकाम केलेले रेशीम कापड सापडले आहे. यावरून स्पष्ट होते की, Bo जमात रेशीम किडे पाळण्यात आणि विणकाम करण्यात अत्यंत पटाईत होती. धक्कादायक बाब म्हणजे, अशाच डिझाईनची कापडे आजही China च्या काही भागांत तयार केली जातात. याचा अर्थ Bo जमातीची वंशवेल पूर्णपणे संपलेली नाही, तर त्यांचे काही वंशज आजही जिवंत असावेत. पण मग त्यांनी आपल्या पूर्वजांची ही अनोखी परंपरा का बंद केली? हा प्रश्न अजूनही कायम आहे.
Professor Ling Chen, ज्यांनी या शवपेट्यांवर तब्बल 30 वर्षे संशोधन केले आहे, त्यांच्या मते एवढ्या उंचावर शवपेट्या ठेवण्यामागे दोन मुख्य कारणे असू शकतात:
- धार्मिक कारण: मृतदेह जितका उंचावर असेल, तितका त्यांचा आत्मा स्वर्गाच्या जवळ जाईल आणि लवकर मुक्त होईल.
- सुरक्षितता: मृतदेह जंगली प्राणी किंवा शत्रूंच्या हाती लागू नयेत आणि सुरक्षित राहावेत.
पण तरीही, हे सगळे केवळ अंदाज आहेत. कारण या लटकणाऱ्या शवपेट्यांचे खरे अंतिम रहस्य अजूनही त्या दुर्गम खडकांमध्येच दडलेले आहे!
this blog was originally published on https://gajawaja.in/the-mystery-of-3000-years-ago-and-the-story-of-a-vanished-tribe/
Comments
Post a Comment