Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

 

मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये नानाविध प्रकारचे असंख्य मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील सर्वच मंदिरांची जगामध्ये भरपूर चर्चा होताना दिसते. आपल्याकडील प्रत्येक मंदिर हे खूपच खास आणि वैशिट्यपूर्ण आहे. प्रत्येक पुरातन मंदिराला एक खास पौराणिक इतिहास देखील आहे. याचमुळे या मंदिरांचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक मंदिरं तर त्यांच्या रहस्यमयी गोष्टींसाठी चर्चेत येत असतात. जुन्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर या मंदिरांचे बांधकाम आणि अचंभित करणाऱ्या गोष्टी कायम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यातलेच एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे, जाटोली शिव मंदिर. (Lord shiva) Top Marathi Headlines

भारताच्या सर्वात उंच टोकावर अर्थात हिमाचल प्रदेश राज्यात हे जाटोली शिव मंदिर स्थित आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर रहस्यमयी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. जटोली शिव मंदिर, जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या दगडांवर आघात केल्यास डमरूसारखा आवाज येतो अशी मान्यता आहे. (Marathi News)

जाटोली शिव मंदिर आहे, जे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेल्या सोलन शहरापासून सुमारे ७ किमी अंतरावर स्थित आहे. दक्षिण-द्रविड शैलीत बांधलेल्या या मंदिराची उंची सुमारे १११ फूट असल्याचे सांगितले जाते. ते बांधण्यासाठी ३९ वर्षे लागली असे मानले जाते. मंदिराच्या वरच्या टोकाला ११ फूट उंच सोन्याचा एक भव्य कलश स्थापित केलेला आहे. जो त्याचे सौंदर्य आणखी वाढवतो. (Todays Marathi Headline)

स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. १९५० मध्ये त्यांनी सोलनच्या या दुर्गम टेकड्यांवर शिवमंदिर बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर सुमारे ३९ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु त्याच्या फक्त ६ वर्षांपूर्वी १९८३ मध्ये स्वामीजींचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या शिष्यांनी स्वामीजींच्या अपूर्ण स्वप्नांना आकार दिला आणि या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. (Top Marathi Headline)

Shiv Mandir

जाटोली शिव मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना १०० पायऱ्या चढून जावे लागते. या मंदिराच्या आत महादेवाचे भव्य आणि विशाल शिवलिंग असून ते स्फटिक रत्नापासून बनलेले आहे. स्वामी कृष्णानंद यांची समाधी देखील त्याच्या शेजारी आहे. ज्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे त्या ठिकाणाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते की, साक्षात शंकर येथे आले होते आणि त्यांनी काही काळ येथे वास्तव्य केले होते. या मंदिरातील प्राचीन शिवलिंग देखील बराच काळ स्थापित आहे. (Latest Marathi News)

मान्यता आहे की हे मंदिर पूर्वी भगवान महादेवाचे विश्रांतीस्थान होते. महादेवाच्या लांब जटांमुळे जाटोली शिवमंदिर असे नाव पडले आहे. इतक्या उंच टेकडीवर मंदिर असूनही ईशान्य कोपऱ्यात ‘जल कुंड’ आहे, त्यातील पाणी गंगे इतकेच पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की या तलावाच्या पाण्यात काही औषधी गुणधर्म आहेत जे त्वचारोग बरे करू शकतात. जेव्हा स्वामी कृष्णानंद परमहंस येथे आले तेव्हा त्यांनी पाहिले की सोलनमधील लोक पाण्यासाठी खूपच त्रास सहन करत आहेत. त्यावेळी त्यांनी महादेवाची कठोर तपस्या केली आणि त्यानंतर या पाण्याच्या तळ्याची उत्पत्ती येथे झाली. तेव्हापासून या भागात कधीही पाण्याची कमतरता भासलेली नाही. जटोली शिवमंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ते त्वरित पर्यटकांसाठी उघडण्यात आले नव्हते, त्यानंतर २०१३ मध्ये ते शिवभक्तांसाठी उघडण्यात आले. (Top trending News)

=======

Gajalakshmi : घरात गजलक्ष्मीची पूजा केल्याने होतात ‘हे’ लाभ

=======

पौराणिक आख्यायिका
कथेनुसार, भगवान शिव येथे एका रात्रीसाठी आले आणि काही काळ राहिले. भगवान शिवानंतर, स्वामी कृष्ण परमहंस येथे तपश्चर्या करण्यासाठी आले. असे मानले जाते की येथे दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच मंदिराच्या जवळ एक पाण्याचे तळे बांधलेले आहे. मान्यतेनुसार, भगवान शिव जटोली येथे येत असत आणि भगवान शिवाचे महान भक्त स्वामी कृष्णानंद परमहंस यांनी येथे भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. तेव्हा येथे पाण्याची खूप समस्या होती. स्वामी कृष्णानंद परमहंसांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन, शिवजींनी त्यांच्या त्रिशूलाच्या प्रहाराने जमिनीतून पाणी काढले. तेव्हापासून आजपर्यंत जटोलीमध्ये पाण्याची समस्या नाही. लोक या पाण्याला चमत्कारिक मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की या पाण्यात कोणताही रोग बरा करण्याचे गुणधर्म आहे. (Social News) Todays Marathi News

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/jatoli-shiv-mandir-story-history/






Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी