Uttarakhand : हरिद्वार अर्धकुंभमेळ्याचा खर्च उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांना !

 

हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे होणारे हे कुंभमेळे ज्योतिषशास्त्रीय गणनेवर आधारित असतात. पवित्र नद्यांच्या संगमस्थानावर त्यांचे आयोजन केले जाते. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये तर जागतिक स्वरुपाचे विक्रम झाले. संपूर्ण जगभरातून भाविक या महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये आले होते. आता 2027 मध्ये उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अर्धकुंभमेळा होणार आहे. (Uttarakhand) Latest Marathi News


या अर्धकुंभ मेळ्याची तारीख नुकतीच साधुसंत आणि आख्याड्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. 6 मार्च 2027 रोजी महाशिवरात्री उत्सवाच्या पवित्र दिवशी या अर्धकुंभ मेळ्याचा प्रारंभ हरिद्वारमध्ये होणार आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांनी हरिद्वारच्या प्रमुख देवता मायापूर, देवी मायादेवी मंदिर आणि भैरव मंदिरात पूजा करुन या अर्धकुंभ मेळा आणि लवकरच सुरू होणाऱ्या छडी यात्रेची तारीख जाहीर केली. यासोबत हरिद्वारमध्ये होणाऱ्या या मेळ्यामध्ये महत्त्वाच्या दोन घोषणा करण्यात आल्या, त्यामुळे सर्वत्र अर्धकुंभ मेळा आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणा-या आखाड्यांचे आणि साधू संतांचे कौतुक होत आहे. या अर्धकुंभ मेळ्यात जुन्या परंपरेत बदल होणार असून यावेळी तीन अमृत स्नान होणार आहेत. सोबतच या मेळ्याच्या आयोजनासाठी खर्च कऱण्यात येणारा निधी उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना बहाल करण्याचा ऐतिहासिक आणि मानवतावादी निर्णय संत समुदायाने घेतला आहे. (Latest News)

कुंभमेळा हा हिंदू भाविकांच्या आस्थेचा आणि आदराचा मोठा भाग आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यानंतर हिंदू समाजातील या मोठ्या आयोजनाचे महत्त्व जगाला समजले आहे. आता 2027 मध्ये हरिद्वार येथे अर्धकुंभ मेळा  होत आहे. मात्र सध्या उत्तराखंड येथे निसर्गाचा प्रकोप झालेला दिसून येतो. डोंगराळ भागात सतत होणा-या ढगफुटीने प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाणही मोठे असल्यामुळे सर्वच मुलभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. (Uttarakhand)

हजारो नागरिकांची घरे बाधित झाली आहेत. रस्ते तुटले आहेत आणि पूल वाहून गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी येथील सरकारसोबत आता अर्धकुंभ मेळ्याच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणा-या आखाड्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत अर्धकुंभ मेळा आय़ोजनासाठीचा निधी आता आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसानासाठी वळवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे सरचिटणीस श्रीमहंत नारायण गिरी यांनी अर्धकुंभ मेळ्याच्या तारखा जाहीर केल्या. 6 मार्च 2027 रोजी महाशिवरात्री उत्सवापासून अर्ध कुंभमेळा सुरु होणार आहे. यामुळे आखाडा परिषदेकडून अर्धकुंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे. 2027 मध्ये हरिद्वारमध्ये होणाऱ्या या अर्धकुंभात जुन्या परंपरेत बदल करण्यात आले आहेत. (Latest News)

हरिद्वारच्या अर्धकुंभात साधू, संन्यासी, तपस्वी आणि आखाड्यांसह तीन अमृत स्नान होणार आहेत. पहिले अमृत स्नान 6 मार्च 2027 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होईल. दुसरे अमृत स्नान 8 मार्च 2027 रोजी सोमवती अमावस्येला होईल. तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान 14 एप्रिल 2027 रोजी बैसाखीला होणार आहे. बैसाखीच्या दिवशी होणारे अमृत स्नान खूप पवित्र असेल कारण संक्रांती याच दिवशी आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाडा सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी यांनी याबाबत सांगितले की, 2027 मध्ये हरिद्वारमध्ये अर्धकुंभाचा योग आणि त्याच वर्षी सिंहस्थ कुंभाचा योग आहे. या अर्धकुंभाच्या ऐतिहासिक यशासाठी देशातील सर्व संतांचा राज्यातील सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच संत समुदायाने हरिद्वार अर्धकुंभ मेळा 2027 चा अर्थसंकल्प उत्तराखंड आपत्तीमुळे बाधित झालेल्या भागांच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित करण्याचा संकल्प केला आहे. (Uttarakhand)

============

हे देखील वाचा : Sharadiya Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाची धुमधाम सुरु !

==============

हा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. पीडितांना मदत करणे हे धार्मिक स्थळांचे कर्तव्य असल्याचे अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. याशिवाय संतांनी सरकारला रुद्रप्रयाग, गोपेश्वर आणि चंपावत सारख्या भागात एम्ससारखी रुग्णालये बांधण्याची विनंतीही केली आहे. सोबतच रस्ता, शिक्षण आणि आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याची विनंतीही सरकारला करण्यात आली आहे. समाजाच्या दुःखाच्या वेळी, जनकल्याणासाठी पुढे येणे हे धर्मपीठांचे कर्तव्य असल्याचे सर्वच संतांनी या बैठकीत सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वस्थरातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच उत्तराखंडमधील नागरिकांनीही संतांच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. (Latest News) Top Marathi Headlines

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Original content is posted on https://gajawaja.in/haridwar-ardhakumbh-mela-and-uttarakhand/







Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !