Railway : भारतातील ‘या’ रेल्वे स्टेशवरुन प्रवास करताना लागतो पासपोर्ट

 

भारताबाहेर प्रवास आपण विमानानेच करत असतो. आपल्याला जर भारताबाहेर प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी लागतो तो पासपोर्ट. पासपोर्टशिवाय आपल्याला परदेशात जाता येत नाही. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात असे काही रेल्वे स्टेशन आहेत जिथून प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे…तर? तुम्ही म्हणाल काहीही काय रेल्वेने प्रवास करताना कुठे पासपोर्ट लागतो. आम्हाला वेड्यात काढता का राव? मात्र हे खरे आहे, जेव्हा तुम्ही काही विशिष्ट रेल्वे स्टेशनवरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला पासपोर्टची गरज पडते.(Railway)

अनेक लोकं त्यांना गरज नसते म्हणून पासपोर्ट काढत नाही. कारण त्यांना माहिती ते परदेशात प्रवास करणार नाही. मात्र देशांतर्गत काही ठिकाणी रेल्वेने प्रवास करताना देखील पासपोर्ट लागतो. हे ऐकल्यावर आता अनेकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुद्धा पासपोर्ट काढावा लागेल. जर तुम्हाला देशातील काही विशिष्ट स्टेशनवरून प्रवास करायचा असेल तर आधी पासपोर्ट काढावा लागेल आणि मगच त्या स्टेशनवरून तुम्ही प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते स्टेशन आहेत. (Indian Railway)

पेट्रापोल रेल्वे स्टेशन (petrapole railway station)
या रेल्वे स्थानकाचे नाव फार कमी लोकांना माहित असेल. हे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये असून, भारत आणि बांगलादेश सीमेवरील एक ट्रांसिट हब आहे. हे रेल्वे स्टेशन ब्रिटिशांच्या काळात बांधले गेले होते. ब्रॉडगेज लाइनद्वारे ते बांगलादेशातील खुलना शहराशी जोडलेले आहे. पेट्रापोल हे स्थानक मालवाहतूक आणि प्रवाशांसाठी महत्त्वाचे स्टेशन आहे. पण या स्टेशनवरून बांगलादेशात जाण्यासाठी प्रवाशांकडे कायदेशीर पासपोर्ट आणि व्हिसा असणे आवश्यक आहे. (Top Marathi News)

राधिकापूर रेल्वे स्टेशन (Radhikapur Railway Station)

राधिकापूर या रेल्वे स्टेशनबद्दल जास्त लोकांना माहित नसेल. हे स्टेशन उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथे असलेले एक महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन देखील भारत – बांगलादेश सीमेवर चौकी म्हणून काम करते. या स्थानकाचा उपयोग दोन्ही देशांमधील रेल्वे वाहतुकीसाठी केला जातो. या वाहतुकीमध्ये माल वाहतुकीसोबतच प्रवासी वाहतूक देखील येथून केली जाते. यामुळे व्यापार तर वाढतोच पण प्रवासी वाहतूकही वाढते.(Top Marathi headlines)

दिल्ली जंक्शन (Delhi Junction)

भारताची राजधानी असलेल्या दिल्ली जंक्शनपासून संपूर्ण देशात ट्रेन धावतात. सर्वात मोठे स्ट्रेशन म्हणून देखील या दिल्ली स्टेशनची ओळख आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की, याच दिल्ली जंक्शनवरून तुम्ही देशांतर्गत तर रेल्वने प्रवास करू शकता, मात्र देशाबाहेर देखील रेल्वेने प्रवास करू शकता. हो दिल्लीमधून परदेशात जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय देखील आहे. इथून पाकिस्तानसह जगातील काही देशांमध्ये ट्रेनने जात येते. यासोबतच या रेल्वे स्थानकाचा उपयोग रिजनल आणि कॉमर्स ट्रेडसाठीही केला जातो.(Social Media)



जयनगर रेल्वे स्टेशन (Jainagar Railway Station)

भारतातून नेपाळला जाण्यासाठी ट्रेनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला भारतातून नेपाळला ट्रेनने जायचे असेल तर बिहारमधील जयनगर रेल्वे स्टेशन तुम्हाला नेपाळला सोडते. मधुबनी जिल्ह्यात बांधलेले हे स्टेशन बिहारचे मुख्य टर्मिनल रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्थानकावरून एकूण ३९ गाड्या सुटतात. जनकपूरमधील कुर्था रेल्वे स्थानकाद्वारे त्याला थेट नेपाळशी जोडण्यात आले आहे. या स्टेशनवरून तुम्हाला ट्रेनने नेपाळला जाता येईल. ( Latest Marathi News)



Original content is posted on https://gajawaja.in/know-the-indian-railway-stations-where-a-passport-is-required-to-travel-marathi-info/


Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !