NATO Dating : नाटो डेटिंग म्हणजे काय आणि त्याचे संकेत कसे ओळखावे?

 

NATO Dating : आजच्या डिजिटल युगात डेटिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ऑनलाइन डेटिंग अॅप्स, सोशल मीडियावर वाढलेली मैत्री आणि आभासी जगातील संवाद या सर्वांमुळे लोक एकमेकांना पटकन भेटतात, बोलतात आणि नातं जोडतात. पण या सगळ्यात एक संकल्पना वाढत चालली आहे नाटो डेटिंग (NATO Dating) NATO म्हणजे No Action, Talk Only म्हणजेच फक्त बोलणे, पण कोणतीही कृती नाही. साध्या भाषेत सांगायचे तर, नातं फक्त संवादापुरतंच मर्यादित असतं; प्रत्यक्ष भेट, बांधिलकी किंवा पुढचं पाऊल कधीच घेतलं जात नाही.(NATO Dating ) Top stories

नाटो डेटिंग म्हणजे अशा प्रकारचं नातं जिथे एखादी व्यक्ती सतत संवाद ठेवते, मेसेज करते, काळजी घेत असल्यासारखं दाखवते, पण जेव्हा भेटण्याची, पुढे जाण्याची किंवा नातं दृढ करण्याची वेळ येते, तेव्हा मागे सरकते. अशी नाती सुरुवातीला खूप उत्साहवर्धक वाटतात  कारण समोरची व्यक्ती सतत संपर्कात असते, वेळ देत असते, कौतुक करत असते. पण हळूहळू लक्षात येतं की ते नातं फक्त बोलण्यापुरतंच आहे. अशी स्थिती अनेकदा भावनिक थकवा आणि गोंधळ निर्माण करते

अति बोलणे पण कृती नाही  समोरची व्यक्ती सतत आपण भेटू, आपल्याला ट्रिपला जायचंय, भविष्यात आपण काहीतरी करू असं बोलते, पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही. नेहमी कारणं दिली जातात  वेळ नाही, कामाचा ताण आहे, मूड नाही, वगैरे. दुसरा संकेत म्हणजे अनिश्चित वर्तन. कधी खूप जवळीक दाखवतात, तर कधी अचानक गायब होतात. अशा लोकांचं वागणं “on and off” असतं, ज्यामुळे आपल्याला नात्याचं स्वरूप समजत नाही.

NATO Dating

NATO Dating

 

भावनिक गुंतवणूक फक्त एका बाजूने असणे. नाटो डेटिंगमध्ये एक व्यक्ती मनापासून नातं जपण्याचा प्रयत्न करत असते, तर दुसरी व्यक्ती फक्त संवादाचा आनंद घेते. ते लोक अनेकदा “attention seekers” असतात  म्हणजे त्यांना फक्त कोणीतरी त्यांच्या भोवती असावं, त्यांच्याकडे लक्ष द्यावं, एवढंच हवं असतं. पण ते खरं नातं बांधण्यास तयार नसतात. चौथा संकेत म्हणजे भविष्याबद्दल टाळाटाळ करणे. अशा लोकांना नात्याबद्दल बोलायचं नाही, ते म्हणतात आत्ता enjoy करूया, पुढचं पाहू नंतर. हे वाक्य नाटो डेटिंगचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.(NATO Dating )

===================

हे देखील वाचा :

World Mental Health Day 2025 : स्वतःचे मानसिक आरोग्य हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात कोणते नियम फॉलो करावे?                                    

 Healthy Meal Ideas : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात करा या गोष्टींचा समावेश                                    

Government Policies : सरकारी धोरणांमधील बदल आणि त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम                                     

=====================

नाटो डेटिंगमधून बाहेर पडण्यासाठी स्वतःची जाणीव आणि मर्यादा आवश्यक असतात. जर तुम्हाला जाणवत असेल की समोरची व्यक्ती फक्त बोलण्यापुरती आहे आणि कोणतीच कृती करत नाही, तर त्या नात्याला मर्यादा घाला. स्पष्ट बोला “तुला खरंच नातं पुढे न्यायचं आहे का?” उत्तर टाळलं गेलं, तर स्वतःचा वेळ आणि भावना वाया घालवू नका. स्वतःचा सन्मान जपा आणि अशा नात्यांपासून लांब राहा ज्यात फक्त गोड बोलणं आहे पण कृती शून्य आहे.

अखेरीस, नाटो डेटिंग म्हणजे “फक्त बोलणी, कृती नाही” अशी आधुनिक डेटिंगची फसवणूक आहे. या नात्यांमध्ये आकर्षण असतं, पण स्थैर्य नसतं. म्हणून नातं जपताना फक्त शब्दांवर नव्हे तर कृतींवर विश्वास ठेवा  कारण खरी नाती तीच असतात जिथे बोलणं आणि कृती दोन्हींचा समतोल असतो. Latest Entertainment news

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/nato-dating/








Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी