Ganesh Chaturthi : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनामागील शास्त्र

 

काल सर्वच ठिकाणी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. विघ्नहर्ता बाप्पाची आपण वर्षभर वाट बघत असतो. निरोपाच्यावेळी वचन दिल्याप्रमाणे तो दरवर्षी आनंदाने आपल्या घरी येतो आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि आनंद देऊन जातो. तसे पाहिले तर गणपती बाप्पांचा सण हा दहा दिवसांचा असतो. मात्र सगळ्यांच्याच घरी दहा दिवस बाप्पा असतात असे नाही. अनेकांकडे बाप्पा केवळ दीड दिवसासाठीच येतात. गणेश चतुर्थी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते. काहींच्या घरी गौरींसोबत बाप्पांचे विसर्जन होते तर काहींकडे पाच, सात अशा दिवसांसाठी बाप्पांचे आगमन होत असते. (Ganesh Chaturthi)

दीड दिवसाचा गणपती हा गणेश चतुर्थी उत्सवातील एक पारंपरिक रीत आहे. ज्यात गणपती बाप्पाची मूर्ती भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला घरात स्थापित केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला (सुमारे दीड दिवसानंतर) विसर्जन केले जाते. हे मुख्यतः महाराष्ट्रात, विशेषतः कोकण आणि मुंबईसारख्या भागात लोकप्रिय आहे. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा आहे त्यांचे तर समाधान देखील होत नाही, तोवर बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. मग अनेकदा डोक्यात विचार देखील येतो, का दीड दिवसाचा बाप्पा आहे आपल्याकडे? जास्त दिवस बाप्पा का राहू शकत नाही? तर यामागे देखील एक शास्त्र आहे. (Latest Marathi News)

शास्त्रानुसार दीड दिवसात गणपतीचे विसर्जन करतात ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. असे सांगतात की दीड दिवासांच्या गणपती विसर्जन आणि शेती यांचा संबंध आहे. गणेश चतुर्थीपर्यंत धान्याची पाती शेतात दिसतात, तेव्हा धरणी मातेचे आभार मानण्यासाठी तिथे गणपती तयार करून त्याची पूजा केली जाते. प्राणप्रतिष्ठा केलेला हा बाप्पा दीड दिवसानंतर आपल्या घरी जातो म्हणजे त्याचे नदीत विसर्जन केले जाते. (Todays Marathi Headline) Todays Marathi News

काहीजण असेही सांगतात की गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर जे व्रत केले जाते ते एक ते दीड दिवसांचे असते त्यामुळे दीड दिवसांनी व्रत पूर्ण होते आणि बाप्पाचे विसर्जन केले जाते. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाबद्दल जाणकार सांगतात की, भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजे पार्थीव गणेश पूजनाचे व्रत आहे. या व्रताचा कालावधी दिवासाचे ४ आणि रात्रीचा १ असे ५ प्रहर धरले जातात. तसेच अशी ही एक मान्यता आहे की जेव्हा तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता तेव्हा त्या मूर्तीमध्ये जीवत्व प्राप्त होते, ते एक दिवस राहते त्यामुळे एक दिवस हे व्रत करून बाप्पाचे दुसऱ्या दिवशी अर्थात दीड दिवसाने विसर्जन केले जात असे. (Top Trending News)

विसर्जनासंदर्भात एक पौराणिक कथा
गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशी का केले जाते यासंदर्भात एक पौराणिक कथा सांगतात की, महर्षी व्यास महाभारत लिहित असताना गणेश लेखनिक होते. लिहिताना गणेशाच्या अंगातील पाणी कमी होऊन त्वचा कोरडी पडली आणि अंगाला जळजळ होऊ लागली. व्यास गुरूंनी गणपतीच्या अंगाला ओल्या मातीचा लेप लावला. चतुर्थीला हा लेप लावला आणि पंचमीला ताप उतरल्यावर पाण्यात विसर्जित केला. याचा अर्थ चतुर्थीला पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा सुरू झाली. (Marathi Top News)

दीड दिवसाचा गणपती हा शास्त्रोक्त आणि पारंपरिक आहे, जो पृथ्वीचे आभार व्यक्त करण्याशी जोडला जातो. मातीची मूर्ती वापरून पूजा करणे धर्मशास्त्रानुसार योग्य मानले जाते, तर चॉकलेट, फुले, फळे इत्यादींनी बनवलेल्या मूर्ती पूजणे मान्य नाही. हे व्रत गणेशाची कृपा जलद मिळवण्यासाठी आणि पूजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. दीड दिवसाचा गणपती प्राचीन काळापासून चालत आला आहे. भारत कृषीप्रधान असल्याने भाद्रपदात पिकांच्या लोंब्या डोलू लागताना धरणीमातेचे आभार मानण्यासाठी बांधावर मातीची मूर्ती तयार करून त्या दिवशीच पूजा आणि विसर्जन केले जात असे. शास्त्रानुसार हे व्रत दीड दिवसांचे आहे, नंतर उत्सव वाढवण्यासाठी पाच, सात किंवा दहा दिवसांची प्रथा सुरू झाली. कर्नाटकातील बनवासी येथे १५०० वर्ष जुनी अर्धी गणेश मूर्ती पूजली जाते, जी दीड दिवसाच्या संकल्पनेशी जोडली जाते. (Top Stories)

=========

Ashtavinayak : अष्टविनायकांमधील दुसरा गणपती- थेऊरचा चिंतामणी

Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?

=========

दीड दिवसाच्या गणेशच्या विसर्जनाचा मुहूर्त

गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी दीड दिवसानंतर गणेश विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनासाठी चोघड्याचा शुभ मुहूर्त. सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – दुपारी १२:४० ते दुपारी ३:४८, संध्याकाळचा मुहूर्त (शुभ) – संध्याकाळी ०५:२२ ते संध्याकाळी ०६:५६, संध्याकाळचा मुहूर्त (अमृत, चर) – संध्याकाळी ०६:५६ ते रात्री ०९:४८ आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/ganpati-visarjan-2025-tradition-reason-behind-deed-divsacha-ganpati/







Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी