Ganpati Bappa : जाणून घ्या गणेश मूर्ती आणि बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भातील ‘या’ खास गोष्टी
श्रावण महिना लागला की, लगबग सुरु होते ती गणेशोत्सवाची. बाप्पा येणार म्हणून अनेक महिने आधी त्यांच्या आगमनाची, स्वागताची तयारी वेग घेऊ लागते. आता आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन आता तोंडावर आले आहे. येत्या सोमवारी अर्थात 14 सप्टेंबर रोजी सगळीकडे बाप्पांचे आगमन होत आहे. त्यामुळे सध्या गणेशाची मूर्ती घेण्यासाठी सगळ्यांचीच लगबग असेल. यंदा बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची? यावर आता कुटुंबांमध्ये देखील चर्चा रंगत आहे. सोबतच बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त, बाप्पाची पूजा आदी अनेक बऱ्याच विषयांवर घराघरांमध्ये चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला गणेश मूर्तीशी संबंधित काही नियम सांगणार आहोत. सोबतच प्राणप्रतिष्ठेच्या आधी देखील काय करावे काय करू नये हे देखील जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)
बाजारात आपल्याला गणेशाच्या विविध रूपातील मूर्ती भुरळ घालतात. कुठे बाप्पा गाडीवर बसून गाडी चालवतात, तर कुठे बाप्पा शिक्षक बनलेले दिसतात, कुठे बाप्पा तर आधुनिक कपड्यांमध्ये स्टायलिश वाटतात. एकूणच काय तर काळाप्रमाणे आता गणेशच्या मुर्त्यांमध्ये देखील अनेक बदल होऊ लागले आहेत. लोकं देखील हौस म्हणून किंवा मुलांचा हट्ट म्हणून अशा मुर्त्या घेता आणि त्या स्थापित देखील करतात. मात्र खरंच अशा मुर्त्या स्थापित केल्या पाहिजे की नाही? गणेश मूर्ती घेताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? गणेश मूर्ती घेण्याचे कोणते नियम आपल्या धर्मात सांगितले आहेत? गणपती अथर्वशीर्षामधे गणेशाची मूर्ती कशी असावी याचे उत्तम वर्णन केले आहे.
एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। रदं च वरदं हस्तैर्विभ्राणं मूषकध्वजम्। रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्। रक्तगंधानु लिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्। भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्। (Marathi News)
अर्थात श्री गणपती अथर्वशीर्षात गणेशाचे रूप “एकदन्तं चतुर्हस्तं” म्हणजे एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा, एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आणि दुसर्या हाताची वरदमुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषकचिन्हांकित आहे, असा रक्त म्हणजेच लाल वर्ण असलेला, लंबोदर अर्थात मोठे पोट आहे असा, सुपासारखे कान असलेला, रक्त-लाल वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त (लाल) पुष्पांनी पूजन केलेला. असावा. श्री गणेश हा एका हाती (मोडलेला) दात धारण करणारा आहे, असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे. श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची (विद्येची) देवता आहे. ‘मोदक’ हे ज्ञानाचे प्रतीक आहे. या कारणामुळे श्री गणेशाच्या हातात मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडली असावी. (Todays Marathi Headline)
- गणेशाची मूर्ती ही चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून बनवलेली असावी असे आपल्या शास्त्रविधीमध्ये सांगितले आहे. गणेशाची मूर्ती कधीही प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा आदी गोष्टींपासून बनवलेली नसावी. मूर्ती निवडताना ती शक्यतो बसलेल्या स्वरुपातील असावी. तिच्या डोक्यावर मुकुट असावा. (Top Trending News)
- डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते आणि ती घरी आणल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. घरात सुख-शांती नांदण्यासाठी डाव्या सोंडेची बाप्पाची मूर्ती बसवावी, असे पुराणात म्हटले आहे. (Top Marathi Headline)
- उजव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती घरी आणू नये. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना घरात करू नये, असे सांगितले जाते. कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. (Latest Marathi News)

- एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी.
- मूर्ती एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी. मूर्तीच्या एका हाती मोदक आणि दुसर्या हात वरदमुद्रेत असावा.
- मूर्ती ही पाटावर किंवा सिंहासनावर बसलेल्या स्थितीतील असावी. गणेशमूर्तीची शरीरयष्टीत बदल करणे योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये.
- गणेशाची मूर्ती सुबक, प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले असेल अशी घ्यावी. मूर्ती भंगलेली, रंग उडालेली नसावी. कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. शिव-पार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती निषिद्ध आहे.
मात्र यासोबतच पूजेची तयारी देखील घरांमध्ये सुरु आहे. पूजेसाठी लागणारे सामान आणण्यापासून ते बाप्पाच्या मूर्तीपर्यंत सर्वच गोष्टी आता अगदी घाईघाई मध्ये होताना दिसत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ज्या बाप्पाला अगदी मनोभावे घरी आणतात, त्याची विशिष्ट दिवस भक्तिपूर्वक पूजा करतात, त्याच बाप्पाच्या पूजेमध्ये काही चूक झाली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही. त्यामुळे बाप्पाची पूजा करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत पाहूया.
- घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी, घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी.
- गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा. गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या. (Top Stories)
- गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे.
- त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये. शिवाय गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी.
- दररोज सकाळ संध्याकाळ गणेशमूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे. जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे.
- आपल्या पुराणांनुसार तुळशीचा उपयोग भगवान शंकर आणि पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही. असे मानले जाते की, श्रीगणेशाने तुळशीला शाप दिला होता की, तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही. त्यामुळे गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर करू नका. याउलट गणेशाच्या पूजेत दुर्वा वापरणे शुभ आणि चांगले मानले जाते. (Social News)
- गणपतीच्या पूजेत तुटलेला तांदूळ वापरू नये. त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा, जो कुठेही तुटलेला नसेल.
- गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये केतकीचे फुले वापरली जात नाही. त्याऐवजी तुम्ही जास्वंद वापरा.
- गणेशाच्या पूजेत शिळी किंवा सुकलेली फुले वापरू नका. जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता.
- गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनते. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.
- This blog is originally published at Gajawaja - https://gajawaja.in/ganesh-chaturthi-2026-know-how-should-ganesha-idol-be-worshiped-and-know-puja-rules-for-sthapana/

Comments
Post a Comment