Ganesh Visarjan : बाप्पांना निरोप देताना त्यांच्यासोबत शिदोरी का दिले जाते?


Ganesh Visarjan

आज गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस. उद्या अनंत चतुर्दशी असून, उद्या गणपती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवाची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो. गणपती आले म्हणजे उत्साह, आनंद, जल्लोषाचे वातावरण आजूबाजूला दिसून येते. मात्र बाप्पा जाणार हा विचारच नकोसा वाटतो. पण उद्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे. पुढच्या वर्षी लवकर येतो असे वचन देऊन बाप्पा आपल्या घरी परतणार आहे. उद्या सर्वच भाविक अतिशय भावुक होऊन साश्रू नयनांनी निरोप देणार आहोत. जेव्हा आपण बाप्पाला निरोप देतो तेव्हा त्यांना विसर्जन करताना आरती करून मगच पाण्यात सोडले जाते. पण बाप्पांचे विसर्जन करताना आपण अजून एक रीत पाळतो आणि ती म्हणजे शिदोरीची. (Ganesh Visarjan)

जेव्हा एखादी व्यक्ती लांब कुठे प्रवासाला जाते तेव्हा तिला वाटेत खाण्यासाठी काही खाऊ किंवा जेवण इतर काही पदार्थ घरातून दिले जातात, यालाच शिदोरी म्हटले जाते. प्रवासादरम्यान भूक लागल्यावर हेच घरचे पदार्थ खावे हाच यामागचा हेतू असतो. जेव्हा शिदोरी दिली जाते, तेव्हा त्यामागे काळजी, प्रेम, त्याग, आपुलकी अशा भावना लपलेल्या असतात. शिदोरीचा हाच अर्थ आणि संबंध गणपती बाप्पांशी देखील जोडण्यात आला आहे. गणपती बाप्पा देखील घरातील सदस्य म्हणूनच घरात राहतो. जेव्हा तो त्याच्या घरी जातो तेव्हा त्याला वाटेत खाण्यासाठीच ही शिदोरी प्रत्येक घरातून त्याच्यासोबत दिली जाते. भाविक अत्यंत श्रद्धेने ही शिदोरी बाप्पाच्या मूर्तीसोबत किंवा कापडात बांधून देतात. (Latest Marathi Headline)

बाप्पाला शिदोरीमध्ये प्रत्येक घरातील प्रथा, परंपरेनुसार विविध पदार्थ दिले जातात. यामागे कोणताही खास नियम नाही. प्रांतानुसार, कुटुंबानुसार, ठिकाणानुसार या शिदोरीमध्ये वेगवेगळा फरक असल्याचे आपल्याला जाणवेल. अनेक ठिकाणी शिदोरी म्हणून बाप्पासोबत दहीभात, दहीपोहे, लाडू, गूळ-खोबरे, पोहे, लाह्या, कुरमुरे, मोदक, फळं, सुकामेवा, खिरापत किंवा इतर घरगुती पदार्थ दिले जातात. पण लक्षात घ्या शिदोरी देणे ही कोणतीही परंपरा नाही किंवा पाळली गेलीच पाहिजे अशी प्रथा देखील नाही. ही प्रत्येक कुटुंबाने स्वइच्छेने आणि प्रेमाने जपली गेलेली श्रद्धा आहे. त्यामुळे काही घरांमध्ये शिदोरी दिली जाते, तर काही ठिकाणी केवळ उत्तरपूजा, आरती आणि नैवेद्य करून बाप्पाचे विसर्जन केले जाते. म्हणूनच बाप्पाच्या विसर्जनावेळी बांधली जाणारी शिदोरी ही केवळ अन्नाची पोटली नसून, ‘बाप्पाचा परतीचा प्रवास सुखाचा होवो आणि पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा लवकर आपल्या घरी येवो’. हीच आपली भावना आहे. (Social News)

This blog is originally published at gajawaja - https://gajawaja.in/ganesh-visarjan-2026-why-is-shidori-offered-to-bappa/

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?