Anant Chaturdashi : यंदा अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या बाप्पांच्या विसर्जनाचा मुहूर्त

Anant Chaturdashi

आता आता पर्यंत आपण बाप्पांच्या आगमनाची तयारी करत होतो, बाप्पा आले विराजमान झाले आणि त्यांना निरोप देण्याची वेळ देखील जवळ आली आहे. तसे पाहिले तर आपले रोजचे सामान्य दिवस निघता निघत नाही, पण जेव्हा घरात बाप्पा असता ते दिवस तर पळतात. बाप्पांच्या सेवेत, भक्तीमध्ये दिवस कधी सुरु होतो आणि संपतो हे देखील आपल्या लक्षात येत नाही. 14 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. हा हा म्हणता बाप्पांना येऊन आता 8 दिवस झाले. आणि आता बाप्पांना निरोप देण्याची वेळ देखील जवळ येऊ लागली आहे. येत्या 4 सप्टेंबर अर्थात शुक्रवार रोजी अनंत चतुर्दशी असून, या दिवशी बाप्पा आपल्या घरी जाणार आहे. (Anant Chaturdashi)

तसे पाहिले तर बाप्पा आल्यानंतर प्रत्येक घरातली रितीनुसार, पद्धतीनुसार दीड, पाच, सात किंवा दहा दिवस झाल्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. अनेक घरातील गणपती आणि मंडळांचे गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जित केले जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते आणि मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन केले जाते. धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, भाविक गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्यांची विधीवत पूजा करतात. आता लगबग सुरु झाली आहे ती बाप्पाच्या विसर्जनाची. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर अनंत चतुर्दशीला, बाप्पा त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघतात. (Marathi)

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. पंचांगानुसार, यावर्षी यावर्षी अनंत चतुर्दशी तिथी गुरुवार, 24 सप्टेंबर रोजी रात्री 11.19 वाजता सुरू होईल. तर चतुर्दशी तिथी 25 सप्टेंबर, शुक्रवार दुसऱ्या दिवशी रात्री 11.07 वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेश विसर्जन मुहूर्त हा सकाळी 7.41 ते 9.11 पर्यंत तर दुपारी 12.12 ते दुपारी 1.43 पर्यंत असणार आहे. अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर रोजी समाप्त होत असल्याने या दिवशी विसर्जन दुपारी 1 वाजून 36 मिनिटांपर्यंत केले तरी चालणार आहे. (Latest Marathi Headline)

Anant Chaturdashi

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला अर्थात अनंत चतुर्दशीला गणेश उत्सवाची सांगता होत आहे. या दहा दिवसांमध्ये आपण सगळेच बाप्पाच्या सेवेमध्ये अगदी लीन झालेलो होतो. मात्र आता बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घेत त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. जाणून घेऊया लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहोत. गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी, गणपतीची पूजा केली जाते. त्यांची आरती करून, फुले अर्पण केली जातात आणि नैवेद्य दाखवला जातो. यानंतर, मोठ्या थाटामाटात आणि ढोल-ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया” आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात साश्रू नयनांनी बाप्पाची मूर्ती नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते. (Top Stories)

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीगणेशाशिवाय विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. हा दिवस भगवान विष्णूच्या अनंत रूपाला समर्पित आहे. या दिवशी भक्त विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करतात आणि सुख, समृद्धी व दुःखातून मुक्तीसाठी प्रार्थना करतात. या प्रसंगी लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हाताला 14 गाठी बांधतात. धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्याने सुरक्षित राहते, त्याला कशाचीही भीती नसते. श्रीहरींच्या कृपेने त्याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो. त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी एक अवश्य उपाय करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा ते बांदल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होते. (Social News) 

this blog is originally published at gajawaja - https://gajawaja.in/anant-chaturdashi-2026-know-date-ganpati-visarjan-muhurta/


Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !