Ekadshi : परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी बदलतात कूस; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. दर महिन्याला दोन एकादशी तिथी असतात. पहिली एकादशी कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. सध्या गणेशोत्सव सुरु असून, या काळात एक एकादशी तिथी येत आहे. त्यामुळे ya एकादशीचे महत्त्व अधिक मानले जात आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिथी ही परिवर्तिनी एकादशी तिथी म्हणून ओळखली जाते. यंदा ही तिथी 22 सप्टेंबरला साजरी होणार आहे. या दिवशी व्रत अनेक पापांपासून मुक्ती मिळते तसेच मोक्ष प्राप्तीचे वरदान मिळते असे पुराणात सांगण्यात आले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रीहरी क्षीरसागरात कुस बदलतात म्हणून याला परिवर्तिनी एकादशी असे म्हटले जाते. भगवान विष्णूच्या झोपलेल्या अवस्थेत बदल होतो. म्हणूनच त्याला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. परिवर्तिनी एकादशीला पद्मा एकादशी किंवा वामन एकादशी असे देखील म्हटले जाते. (Ekadshi)
पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी तिथी २१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता सुरू होईल आणि २२ सप्टेंबर रोजी रात्री ९:४३ वाजता समाप्त होईल. ‘उदय तिथी’नुसार परिवर्तिनी एकादशीचा उपवास २२ सप्टेंबर २०२६ रोजी पाळला जाईल. व्रताचे पारण २३ सप्टेंबर रोजी सकाळी ०६:२४ ते ०८:४९ या वेळेत केले जाईल. सर्व दुःखांपासून मुक्ती देणारी परिवर्तनी एकादशी मानली जाते. हा दिवस केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूने वामनाच्या रूपात राजा बलीला सर्व काही दान करण्यास सांगितले होते. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याची मूर्ती सुपूर्द केली. त्यामुळे या दिवसाला वामन ग्यारस असेही म्हणतात. (Top Marathi News)
एकादशी व्रत विधी
सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आणि शुचिर्भूत होऊन देवाजवळ दिवा लावावा. भगवान विष्णूला गंगेच्या पाण्याने अभिषेक करून, त्यांना फुले आणि तुळशी दल अर्पण करावी. शक्य असल्यास, या दिवशी देखील उपवास ठेवा. देवाची सात्विक मनाने पूजा करावी. देवाला नैवेद्य अर्पण करावा. लक्षात ठेवा की फक्त सात्त्विक गोष्टी देवाला अर्पण केल्या जातात. भगवान विष्णूच्या नैवेद्यात तुळशीचा समावेश करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की तुळशीशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत. त्यामुळे नैवेद्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा. या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी. तुपाचा दिवा लावून आरती करावी. दरम्यान, एकादशी व्रत कथा, विष्णू चालिसा वाचा आणि देवाच्या मंत्रांचाही जप करावा. देवाला पंचामृत आणि फळे अर्पण करा. द्वादशी तिथीला शुभ मुहूर्तावर व्रताचे पारण करा. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. (Latest Marathi Headline)

परिवर्तिनी एकादशी कथा
परिवर्तिनी एकादशीला जयंती एकादशी असे म्हणतात. त्याचा यज्ञ केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. तसेच पापांचा नाश होतो. या एकादशीला जो मनुष्य वामन स्वरुपाची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्ती होते. महाभारतील युगात भगवान श्रीकृष्णाने पांडूचा मुलगा अर्जूनाच्या विनंतीवरुन परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्रेतायुगात बळी नावाच्या राक्षस होता, तो अंत्यत दानशूर, सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता. त्याच्या भक्तीच्या प्रभावाने त्याने स्वर्गलोकात इंद्र देवाच्या ठिकाणी राज्य करत होता. त्यांने इंद्र देवाचा पराभव करुन तो देवाचा राजा बनला. त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूकडे गेले. (Top Stories)
देवतांनी रक्षणांसाठी देवाकडे प्रार्थना केली. यानंतर श्रीविष्णूने बामनाचे रुप धारण करुन राजा बळीला जिंकले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, वामनाचे रुप धारण करुन मी त्याला विनंती केली. तु मला तीन पावली जमिन दान कर, यामुळे तुला तिन्ही लोकांच्या दानाचे फळ मिळेल. राजा बळीने माझी प्रार्थना स्विकारली आणि जमिन दान केली. दानांचा संकल्प करताच श्री विष्णुंनी दैत्याचे रुप धारण केले. एक पाय पृथ्वीवर, दुसऱ्या पायाची टाच स्वर्गात आणि तिसरे नखांनी ब्रह्मलोक मोजले. राजा बळीकडे तिसऱ्या पायी काहीच उरले नाही. म्हणून त्याने डोके पुढे करुन भगवान बामनांनी तिसरा पाय त्याच्या डोक्यावर ठेवला. राजा बळी वचनबद्धतेने प्रसन्न झाल्यामुळे भगवान बामनाने त्याला अधोलोकाचे स्वामी बनवले. तसेच श्रीविष्णूंनी त्याला वचन दिले की, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेषनागावर क्षीरसागरात झोपेल. (Social News)
this blog is originally published at gajawaja - https://gajawaja.in/parivartani-ekadashi-2026-date-vrat-tithi-puja-muhurt/

Comments
Post a Comment