Posts

Cockroach : फक्त 10 रुपयांत झुरळांपासून सुटका घरातील ‘हा’ सोपा जुगाड

  Cockroach :    घरामध्ये झुरळांचा (Cockroaches) त्रास ही अनेकांची डोकेदुखी बनलेली असते. किचन, बाथरूम किंवा ओलसर ठिकाणी झुरळं पटकन वाढतात आणि स्वच्छतेवरही परिणाम करतात. बाजारात अनेक महागडे केमिकल प्रॉडक्ट्स उपलब्ध असले तरी त्यांचे दुष्परिणामही असू शकतात. अशावेळी कमी खर्चात आणि घरगुती पद्धतीने झुरळांपासून सुटका कशी मिळवता येईल, याबाबत अनेकजण उपाय शोधत असतात.   तज्ज्ञांच्या मते, झुरळं हाकलण्यासाठी  बोरिक पावडर (Boric Powder)  हा अत्यंत प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे. साधारण 10 रुपयांमध्ये मिळणारी ही पावडर झुरळांच्या संपर्कात आल्यावर त्यांना नष्ट करण्यास मदत करते. बोरिक पावडर थोड्या साखरेसोबत किंवा पीठात मिसळून झुरळं येणाऱ्या ठिकाणी ठेवली, तर झुरळं त्या मिश्रणाकडे आकर्षित होतात आणि काही वेळातच त्यांचा नायनाट होतो. याशिवाय  बेकिंग सोडा आणि साखरेचा वापर  देखील केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा झुरळांच्या पोटात गेल्यावर रासायनिक प्रतिक्रिया निर्माण होते, ज्यामुळे त्यांचा नाश होतो. हा उपाय पूर्णपणे घरगुती असून, केमिकल्सचा वापर टाळू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे....

Chardham Yatra : चारधाम यात्रा सुफळ संपूर्ण होण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

  यंदा १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय तृतीया आहे. याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री या पहिल्या दोन धामांचे दरवाजे उघडले जातील. तर केदारनाथ मंदिर हे 22 एप्रिल आणि बद्रीनाथ मंदिर 23 एप्रिल रोजी उघडले जाणार आहे. या दिवसांपासून अधिकृतपणे चारधाम यात्रेला सुरुवात होते. २०२५ मध्ये ही यात्रा ३० एप्रिलला सुरू झाली होती. यंदा ११ दिवस आधीच दरवाजे उघडल्यामुळे मे महिन्यातील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या चार धाम यात्रेला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. ही यात्रा केल्यानंतर पुण्य प्राप्त होऊन मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे. त्यामुळे लाखो लोकं दरवर्षी ही यात्रा करतात. मात्र ही यात्रा करणे वाटते तितके सोपे अजिबातच नाहीये.   कारण हिमालयातील अत्यंत कठीण, उंचावर आणि बर्फाच्छादित भागात ही यात्रा पार पडते. साधारणपणे एप्रिल-मे ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात चालणारी ही यात्रा ट्रेकिंग, अनिश्चित हवामान आणि दुर्गम मार्गांमुळे अत्यंत अवघड मानली जाते. या ठिकाणी अनेक लोकांनी विविध प्रकारचे त्रास होतात, ज्यामुळे ही यात्रा पूर्ण करणे देखील अवघड होऊन जाते. ...

Gudhipadwa : गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

  भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ अर्थात गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. अवघ्या काही दिवसातच म्हणजेच 19 मार्च रोजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे.   ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला आपल्या जीवनात जाणवतील. मग गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय करावे? चला जाणून घ्या. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. याच दरव...

Monkeys in China : चीनमध्ये सोन्यापेक्षा महाग माकड

चीनमध्ये होणाऱ्या संशोधनाबाबतचे रहस्य आता लपून राहिलेले नाही.   चीनमध्ये अशा हजारो प्रयोगशाळा आहेत, ज्यामध्ये औषध आणि अन्य प्रकारची संशोधने होत असतात. या सर्वांचे प्रयोग सुरुवातीला प्राण्यांवर केले जातात.   यासाठी चीनमध्ये कुत्रा, मांजर, ससा, गाढव, साप आणि माकड यांचा वापर करण्यात येतो. चीनमध्ये संशोधन आणि प्रयोगांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, आता तिथे चक्क माकडांची किंमत आभाळाला टेकली आहे. एका माकडासाठी या प्रयोगशाळा वीस लाखांहून अधिक रक्कम मोजत आहेत. यामुळे चीनमध्येच माकड पकडून देण्याची स्पर्धा लागली आहे. ही स्पर्धा एवढी तीव्र झाली आहे की आता चीनमधील माकडेही दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे आता चीनमधील प्रयोगशाळा अन्य देशांमधून माकडे मागवत आहेत. यामध्ये श्रीलंका आणि व्हिएतनामसारख्या देशांचा समावेश आहे. चीनमध्ये औषधांच्या संशोधनात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा वापर केला जातो. त्यामध्ये अलिकडच्या वर्षांत माकडांचा वापर वाढला आहे. यामुळे संशोधनात वापरल्या जाणाऱ्या माकडांना सोन्याच्या दरापेक्षाही अधिक दर देऊन खरेदी केले जात आहे. जवळपास २० लाखांपर्यंत किंमत एका माकडाला मिळत आहे. येथील...

Pratyangira Temple: या ज्योतिर्लिंगाशेजारी आहे रावणाच्या कुलदेवीचे मंदिर

मध्यप्रदेशातील उज्जैन नगरी ही बाबा महाकालांची नगरी म्हणून ओळखली जाते. सोबतच या शहराची ओळख मंदिरांचे शहर म्हणूनही आहे. उज्जैनमध्ये १०० हून अधिक प्रमुख मंदिरे आणि शेकडो लहान तीर्थक्षेत्रे व तीर्थस्थळे आहेत.  या प्रसिद्ध मंदिरांमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, हरसिद्धी माता मंदिर, कालभैरव मंदिर, चिंतामण गणेश मंदिर आणि सांदीपनी आश्रम यांचा समावेश आहे.  राजा विक्रमादित्य यांनी यापैकी काही मंदिरांची स्थापना केल्याची कथा सांगण्यात येते. यापैकी सर्वच मंदिरांचा पौराणिक कथांमध्ये संदर्भ आढळतो. बाबा महाकाल मंदिराप्रमाणेच सांदीपनी आश्रमाचीही मोठी महती आहे. येथेच भगवान कृष्णाचे शिक्षण झाले आहे. त्यामुळेच उज्जैन नगरी ही भगवान शंकरांसोबत भगवान कृष्णाच्या भक्तांसाठीही पूजनीय नगरी आहे. मात्र यासोबत रावणासाठीही उज्जैन नगरी पूजनीय होती. कारण याच नगरीमध्ये रावणाची कुलदेवी असलेल्या माता प्रत्यांगिरा देवीचे मंदिर आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी रावण या देवीची पूजा करत असे. असे मानले जाते की माता प्रत्यांगिरा या निकुंबला देवीचे रूप आहेत. निकुंबला देवीचा जन्म भगवान नरसिंहांना शांत करण्यासाठी झाला होता...

Health Care : बॅड कोलेस्ट्रॉलच्या या 5 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, पडेल महागात

Health Care :  आजच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीत   बॅड कोलेस्ट्रॉल (LDL – Low Density Lipoprotein)   वाढणे ही गंभीर समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक घटक असला तरी त्याचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यांचे विकार उद्भवू शकतात. विशेष म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात, कारण ती सौम्य किंवा सामान्य वाटू शकतात. मात्र वेळेत लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. खालील पाच लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. छातीत वेदना किंवा दडपण रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे त्या अरुंद होतात. त्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि छातीत वेदना, दडपण किंवा जळजळ जाणवू शकते. हे लक्षण विशेषतः चालताना किंवा जिने चढताना अधिक जाणवते. ही स्थिती पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवते. त्यामुळे वारंवार छातीत त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पायात वेदना किंवा मुंग्या येणे रक्ताभिसरण कमी झाल्यास पायात वेदना, मुंग्या येणे किंवा थकवा जाणवतो. चालताना पिंडऱ्यांमध्ये वेदना होणे हे ‘पेर...