Gudhipadwa : गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ अर्थात गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या दिवशी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा “श्री राम” लंकेवर विजय मिळवुन अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारुन मोठ्या आनंदाने केले. अवघ्या काही दिवसातच म्हणजेच 19 मार्च रोजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे “सत्य-युगाची” सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचे सकारात्मक फायदे आपल्याला आपल्या जीवनात जाणवतील. मग गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय करावे? चला जाणून घ्या.
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करावी, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. याच दरवाजातून घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजाची स्वच्छता झाल्यानंतर एक तांब्याभर पाणी मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा तांब्या शक्यतो पितळ, तांबा अशा धातूंचा असावा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असे सांगितले जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही घराला तोरण लावा, मात्र तोरण लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे तोरण कधीही कृत्रिम फुलांचे नसावे. तोरण बनवता झेंडूंच्या फुलांचा आणि अंब्यांच्या पानाचा वापर करावा, यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती नष्ट हेते, अशी मान्यता आहे. हिंदू नववर्षाच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पूजेनंतर संपूर्ण घराच गंगाजल शिंपडावे. यासोबत दुर्गा देवीचे ध्यान कराव. असे केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुमचे संपूर्ण वर्ष चांगले जाईल. सोबतच ओम ब्रह्मणे नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच दुर्गा मातेचे ध्यान करावे.
जर तुमच्या व्यावसायात विनाकारण अडथळे येत असतील तर गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील लहान मुलीला एक वाटी अख्खा तांदूळ एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे घरातील पैशाची कमतरता दूर होऊ लागते, असे म्हटले जाते. या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्व आहे ते. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्यावर विधीवत पूजा करावी.
गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. याने धान्यात किटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या दोन्ही बाजूला हरिद्राचे काही धान्य ठेवा. हे उपाय केल्याने तुमच्या घरात अचानक धन येणे सुरु होईल.
गुढीपाडव्याच्या दिवशी नखं कापू नयेत. शिवाय या दिवशी दाढी, मिशा आणि केस कापू नयेत. गुढीपाडव्याला देव पूजा आणि गुढी पूजा करताना चुका करू नयेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिवसा झोपू नये. या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान करू नये.
this blog was originally published on https://gajawaja.in/gudi-padwa-2026-what-to-do-on-gudi-padwa/
Comments
Post a Comment