Pitrupaksha : पितृपक्षात नवमी तिथीला केले जाते सव्वाष्णपणी निधन झालेल्या महिलांचे श्राद्ध; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
सध्या पितृपक्ष सुरु असून, प्रत्येक घरांमध्ये आपल्या पूर्वजांच्या निधनाच्या तिथीनुसार श्राद्ध आणि तर्पण केले जात आहेत. पितृपक्षाचा काळ हा १५ दिवसांचा असला तरीही या दिवसात ज्या ज्या तिथींना कुटुंबातील लोकांचे निधन झाले अशा पूर्वजांचे श्राद्ध केले जातात. मुख्य म्हणजे या दिवसांमध्ये अगदी लहान बाळांपासून ते तरुण, विवाहित, अविवाहित, विधवा, सधवा, स्त्री, पुरुष आदी सर्वांसाठीच श्राद्ध तिथी असतात. याच पितृपक्षातील अतिशय महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी. या दिवशी ज्या स्त्रिया पती जिवंत असताना निधन झाल्या आहेत अर्थात सवाष्ण मृत झाल्या आहेत अशा स्त्रियांचे श्राद्ध केले जाते. (Top Marathi News)
पितृपक्षातील नवमी तिथी किंवा अविधवा नवमीला मोठे महत्व आहे. यंदा यावेळी अविधवा नवमी ४ ऑक्टोबर रोजी नवमी श्राद्ध अर्थात अविधवा नवमी श्राद्ध केले जाणार आहे. मातृ नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते. या दिवशी परिवारातील विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या त्या महिलांसाठी पिंड दान केले जाते. या दिवशी दिवंगत आई तसेच कुटुंबातील सौभाग्यवती महिलांच्या स्मरणार्थ श्राद्ध करण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते. त्यामुळे माता नवमी किंवा अविधवा नवमी ही पितृपक्षातील महत्त्वाची तिथी मानली जाते. अविधा नवमीला ब्राह्मण भोजन खाऊ घातले जाते. अन्नदान केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते. याला मातृ नवमी श्राद्ध म्हणतात. याला नवमी श्राद्ध आणि अविधवा श्राद्ध असेही म्हणतात. पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धला अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते. (Latest Marathi News)
सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध म्हणजेच ज्या माता, सासू, सुना, मुली किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांचा मृत्यू त्यांच्या पती जिवंत असताना झाला आहे, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते. जर सावत्र आई जिवंत असेल आणि सख्खी आईचे निधन झाले असेल, तर मुलाने हे श्राद्ध करावे. सख्खी आई जिवंत असेल आणि सावत्र आईचे निधन झाले असेल, तरीही मुलाने हे श्राद्ध करावे. जर मृत महिलेला मुलगा नसेल किंवा मुलाचाही मृत्यू झाला असेल, तर त्या महिलेच्या मुलांनी म्हणजेच नातवंडांनी हे श्राद्ध करू नये. लक्षात घ्या जर मृत्यूची तारीख माहीत नसेल आणि पती जिवंत असेल, तर अविधवा नवमीला त्या महिलेचे श्राद्ध केले जाऊ शकते. (Trending News)

सवाष्ण स्त्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृपक्षातील नवमीस पार्वणाविधीने ‘अविधवा नवमी श्राद्ध’ करण्याबद्दल आपल्या शास्त्रात सांगितले जाते. सवाष्ण म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सधवा म्हणून होते. तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर देखील ती सधवाच असते. सवाष्ण स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील ‘अविधवा नवमी’ तिथीला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतात. मुलाची मुंज झालेली नसली तरी त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे. पतीच्या निधनानंतर मुलं हे श्राद्ध करू शकतात. तर मुलाच्या निधनानंतर त्याच्या मुलाला आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी चालते. या दिवशी मृत व्यक्तीचा आवडता किंवा घरातील परंपरेनुसार स्वयंपाककरून सवाष्ण जेऊ घातली जाते. तिला साडी, ब्लाउज पीस, कुमकुम, आरसा आणि फुले दिली जातात. (Top Trending News)
मातृ नवमीला काय करावे?
सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. नंतर दक्षिण दिशेला टेबलवर पांढरी चादर पसरून, मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो ठेवावा आणि त्याला हार घालावा. गुलाब अर्पण करावे. फोटोसमोर तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाकावे. आता विधीप्रमाणे श्राद्ध करावे. पाहुणे, प्राणी, पक्षी यांना अन्न दान करावे. अविधवा नवमी श्राद्ध कर्म फक्त महिला पितरांसाठीच केले जाते. जर कोणत्याही कारणास्तव, एखादी व्यक्ती अविधवा नवमी विधी करण्यास चुकली तर, श्राद्ध ‘महालय अमावस्येला’ करता येईल. (Social Media)

Comments
Post a Comment