Navratri : नवरात्राची सहावी माळ : नवदुर्गेचेच सहावे स्वरूप देवी कात्यायनी, जाणून घ्या देवीचे रूप आणि महती

 

Navratri

आज नवरात्रीचा सहावा दिवस असून, आज नवरात्राची सहावी माळ आहे. शारदीय नवरात्र मध्यावर आले आहे. आज नवदुर्गेचे सहावे स्वरुप कात्यायणी देवीची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, दुर्गा देवीचे सहावे रूप असलेल्या कात्यायणी देवीची पूजा केली जाते. यंदा नवरात्राची सहावी माळ आणि कात्यायणी देवीची पूजा ही आज 16 ऑक्टोबर शुक्रवार रोजी करण्यात येणार आहे. आजचा रंग हिरवा असून, हिरवा रंग हा प्रामुख्याने निसर्ग, समृद्धी, चैतन्य, शांती आणि वाढ यांचे प्रतीक मानला जातो. आजच्या दिवशी कात्यायणी देवीचे पूजन केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात. उपवर व्यक्तीस सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. (Navratri)

तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त होते. महर्षी कात्यायनाच्या घरी जन्मली, म्हणून तिचे नाव कात्यायनी पडले. देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन, धर्म, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. तसेच या देवीला महिर्षासुरवर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते. उत्तर भारतातील यूपी, बिहार आणि झारखंडमध्ये या देवीला छठ मैया म्हणूनही पूजा केली जाते. (Marathi News)

देवी कात्यायनीचे स्वरुप अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.देवी कात्यायनीची उपासना केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते. देवीला लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा. कात्यायनी मातेला मध आणि गोड खायचे पान अर्पण करावे, देवीला ते आवडते असे सांगितले जाते. हे अर्पण केल्याने व्यक्तीचे सौंदर्य वाढते. (Marathi News)

कात्यायणी देवीची पूजा पद्धत
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी कात्यायणी देवीची पूजा करण्याआधी स्नान नित्यादिकर्मे आटोपून सर्वप्रथम कलश पूजन करा. त्यानंतर माता दुर्गा आणि माता कात्यायनी यांची षोडोपचारे पूजा करा. पूजा करताना मातेचे सतत स्मरण करा. त्यानंतर देवीला हळदी कुंकू अक्षता, फुलांसह सोळा अलंकार अर्पण करा. देवीला आवडणारे मध आणि मिठाईचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा. तुपाचा दिवा लावून देवीची आरती करा. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती वाचा. आपल्या शरीरात सप्त (सात) चक्रे आहेत, या सात चक्रांपैकी आज्ञा चक्रात देवी कात्यायनी वास करते. देवीचे ध्यान केल्याने आज्ञा चक्र जागृत होते. (Todays Marathi Headline)

देवी कात्यायनी मंत्र
कात्यायनी महामाये , महायोगिन्यधीश्वरी। (Latest Marathi Headline)
नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः।।
जय जय अम्बे, जय कात्यायनी। जय जगमाता, जग की महारानी।
कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते।’

प्रार्थना मंत्र
ॐ देवी कात्यायन्यै नमः

देवी कात्यायनी स्तुति
चंद्रहसोज्वलकार शार्दुलवरवाहन (Marathi News)
कात्यायनी शुभम दद्याद देवी दानवघातिनी
या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

Navratri

कात्यायनी देवी ध्यान मंत्र
वन्दे वाञ्छित मनोरथार्थ चन्द्रार्धकृतशेखराम्।
सिंहारूढा चतुर्भुजा कात्यायनी यशस्विनीम्॥
स्वर्णवर्णा आज्ञाचक्र स्थिताम् षष्ठम दुर्गा त्रिनेत्राम्। (Marathi Top News)
वराभीत करां षगपदधरां कात्यायनसुतां भजामि॥
पटाम्बर परिधानां स्मेरमुखी नानालङ्कार भूषिताम्।
मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल मण्डिताम्॥
प्रसन्नवदना पल्लवाधरां कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।
कमनीयां लावण्यां त्रिवलीविभूषित निम्न नाभिम्॥

कात्यायनी देवी स्त्रोत
कञ्चनाभां वराभयं पद्मधरा मुकटोज्जवलां।
स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनेसुते नमोऽस्तुते॥
पटाम्बर परिधानां नानालङ्कार भूषिताम्। (Top Stories)
सिंहस्थिताम् पद्महस्तां कात्यायनसुते नमोऽस्तुते॥
परमानन्दमयी देवी परब्रह्म परमात्मा।
परमशक्ति, परमभक्ति, कात्यायनसुते नमोऽस्तुते॥
विश्वकर्ती, विश्वभर्ती, विश्वहर्ती, विश्वप्रीता।
विश्वाचिन्ता, विश्वातीता कात्यायनसुते नमोऽस्तुते॥
कां बीजा, कां जपानन्दकां बीज जप तोषिते।
कां कां बीज जपदासक्ताकां कां सन्तुता॥
कांकारहर्षिणीकां धनदाधनमासना।
कां बीज जपकारिणीकां बीज तप मानसा॥
कां कारिणी कां मन्त्रपूजिताकां बीज धारिणी।
कां कीं कूंकै क: ठ: छ: स्वाहारूपिणी॥ (Todays Marathi Headline)

कात्यायनी देवी कवच
कात्यायनौमुख पातु कां स्वाहास्वरूपिणी।
ललाटे विजया पातु मालिनी नित्य सुन्दरी॥
कल्याणी हृदयम् पातु जया भगमालिनी॥

कात्यायनी देवी कथा १
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. (Marathi Latest News)

काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे. (Top Trending Headline)

कात्यायनी देवी कथा २
कत नावाच्या ऋषींचे पुत्र होते कात्या आणि कात्या हा कात्यायन नावाच्या ऋषीचे पुत्र होते. कात्यायन ऋषींना आपल्या कन्येच्या रूपात देवी दुर्गा हवी होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कात्यायनाने कठोर तपश्चर्या केली. देवी दुर्गा ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि इच्छित वरदान दिले. काही काळानंतर कात्यायनाची कन्या म्हणून देवीचा जन्म झाला. कात्यायनाची कन्या असल्याने देवीचे नाव कात्यायनी होते. (Top Marathi News)

एका कथेनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायणी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायणी देवीचे पूजन केले होते, असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. (Latest Marathi Headline)

कात्यायनी देवीची आरती
जय जय अम्बे जय कात्यायनी। जय जग माता जग की महारानी॥ (Top Trending News)
बैजनाथ स्थान तुम्हारा। वहावर दाती नाम पुकारा॥
कई नाम है कई धाम है। यह स्थान भी तो सुखधाम है॥
हर मन्दिर में ज्योत तुम्हारी। कही योगेश्वरी महिमा न्यारी॥
हर जगह उत्सव होते रहते। हर मन्दिर में भगत है कहते॥
कत्यानी रक्षक काया की। ग्रंथि काटे मोह माया की॥
झूठे मोह से छुडाने वाली। अपना नाम जपाने वाली॥
बृहस्पतिवार को पूजा करिए। ध्यान कात्यानी का धरिये॥
हर संकट को दूर करेगी। भंडारे भरपूर करेगी॥
जो भी माँ को भक्त पुकारे। कात्यायनी सब कष्ट निवारे॥ (Social News)

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?