Navratri : ऑक्सीडाइज ज्वेलरीला ‘या’ टिप्स वापरून करा चकाचक
अवघ्या काही दिवसातच नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. आता नवरात्र म्हटले की, देवीचा जागर, उत्सवासोबतच जल्लोष असतो तो गरबा आणि दांडियाचा. नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडिया खेळण्याची एक वेगळीच मजा असते. या दिवसांमध्ये गरबा खेळण्यासाठी एक खास प्रकारची वेशभूषा केली जाते. पारंपारिक चनिया चोली, घागरा-चोळी किंवा ट्रेण्डी साड्यांवर ऑक्सिडाईज्ड दागिने घालून तरुण, तरुणी रास, गरबा खेळतात. नवरात्रीमध्ये ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कमालीची शोभून दिसते. नवरात्री आणि ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी यांचे खास नाते आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गरबा खेळताना ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी घातल्यास एक आकर्षक आणि सुंदर लूक मिळतो. (Navratri)
गरबा आणि दांडियाच्या नऊ रात्रींमध्ये वजनाला हलके, दिसायला मोठे आणि उठावदार दागिने म्हणून ऑक्सिडाईज्ड दागिन्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते. केवळ नवरात्रींमध्येच नाही तर इतर दिवसांमध्ये विशिष्ट कपड्यांवर हे दागिने सुंदर दिसतात. तसे पाहिले तर दागिने हा प्रत्येक स्त्रीचा अतिशय संवेदनशील विषय असून तिचा वीक पॉइंट देखील आहे. अगदी लहान मुलींपासून ते मोठ्यां वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्वच स्त्रिया कमी अधिक प्रमाणात रोज काहींना काही दागिने घालत असतात. त्यातही ऑक्सिडाइज ज्वेलरी ही आजकाल महिलांची पहिली पसंती आहे. स्त्रिया कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ड्रेसवर अगदी सहज मॅच करू शकतात अशी ही ज्वेलरी आहे. (oxidised jewellery)
ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये सर्वच प्रकारचे दागिने अनेक वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये असतात जे महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. आता नवरात्रीचा उत्सव सुरु होणार म्हटल्यावर सगळ्याच महिला त्यांच्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी काढून ती त्यांच्या वेषभूषेवर मॅच करण्याचे काम करत असतील. काही महिला नेहमीच हे दागिने घालतात असे नाही. बऱ्याच स्त्रियांनी काही काळापासून हे दागिने वापरले नसतील. त्यामुळे ही ज्वेलरी ठेऊन जरा काळवंडली असेल. तसे पण ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना थोड्या काळजीची आवश्यकता असते. या दागिन्यांची योग्य देखभाल करणे देखील महत्वाचे आहे. आता या नवरात्रीच्या काळात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी नव्यासारखी दिसावी यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची जुनी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी नव्यासारखी चमकाऊ शकतात. (Todays Marathi Headline)

बेकिंग सोड्याने स्वच्छ करा
ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी बेकिंग सोडा वापरू शकता. एका भांड्यात थोडे गरम पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाकायचा आणि चांगले मिक्स करून त्यात हे दागिने ५ मिनिटे ठेवा. नंतर घासून स्वच्छ करा. या सोबतच एका भांड्यात ज्वेलरी घेऊन त्यावर व्हीनेगर टाकून व्यवस्थित घासायचे आणि १५ मिनिटांसाठी ही ज्वेलरी तशीच ठेवायची. नंतर पाण्याने धुवून कोरडी कार्याची. यामुळे ऑक्सिडाइज ज्वेलरी चकाकेल. (Marathi)
परफ्यूमपासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने घालताना त्यामध्ये परफ्यूम किंवा इतर दुर्गंधी येत नसल्याची खात्री करून घ्या. यामुळे दागिन्यांचे नुकसान होऊ शकते कारण यामुळे दागिन्यांमध्ये ओलावा वाढतो. ही ज्वेलरी घालण्यापूर्वी परफ्यूम किंवा डिओडोरंट लावा आणि २ मिनिटांनी दागिने घाला. (Top Marathi NEws)
मऊ कापडाने स्वच्छ करा
दागिने वापरून झाल्यानंतर ते मऊ कापडाने स्वच्छ करा. यामुळे दागिने घाण होण्यापासून वाचतील आणि दीर्घकाळ टिकतील. कोरडी टूथ पावडर आणि मऊ कापड वापरून हे दागिने हलक्या हाताने स्वच्छ करा. (Latest Marathi Headline)
आर्द्रतेपासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने नेहमी आर्द्रतेपासून दूर ठेवावे जेणेकरून ते खराब होणार नाहीत. ते फक्त झिप लॉक प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवा. पाऊचमध्ये कोणत्याही प्रकारचे छिद्र नसावे हे लक्षात ठेवा. हवेच्या संपर्कात आल्याने हे ऑक्सिडाइज्ड खराब होऊन त्यांचा रंग देखील बदलतो. (Top Stories)
ओलाव्यापासून दूर ठेवा
ऑक्सिडाइज्ड दागिने कधीही ओलावामध्ये ठेवू नका. या प्रकारचे दागिने थोड्याशा ओलावामध्ये खराब होऊ लागतात आणि त्याची चमकही निघून जाते. ऑक्सिडाइज ज्वेलरीचा संपूर्ण सेट स्टोअर करायचा असेल तर, तर कानातले एका वेगळ्या पिशवीत आणि नेकलेस एका वेगळ्या पिशवीत ठेवा. या पिशव्या एका एअर टाइट बॉक्समध्ये ठेवा. यामुळे दागिने बराच काळ सुरक्षित राहतात. (Social News)
This blog is originally posted at gajawaja - https://gajawaja.in/how-to-maintain-your-oxidised-jewellery-and-how-to-take-care-of-oxidized-jewellery/

Comments
Post a Comment