Navratra : नवरात्रीत होम हवन करणे असते लाभदायक; जाणून घ्या हवनाची अधिक माहिती
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करण्याची पद्धत असते. यावेळी कन्या देवीच्या रूपात आपल्या घरी येतात त्यामुळे त्यांचे पाय धुवून त्यांना साजशृंगार देऊन जेवू घालावे अशी मान्यता आहे. तसेच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला देवीसमोर हवन करण्याची परंपरा आहे. अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी देवीसमोर हवन करणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः अष्टमी आणि नवमीच्या दिवशी योग्य पद्धतीने हवन केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते. यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यातील अडीअडचणी आणि नकारात्मकता हवनात स्वाहा होते असे मानतात. धार्मिक मान्यतेनुसार, विधीपूर्वक होमहवन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. (Navratra)
महानवमीच्या दिवशी हवन करून नऊ दिवसांचा उपवास सोडला जातो. यंदा नवमी तिथी 20 तारखेला दुपारी 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत राहील. अशा परिस्थितीत नवव्या दिवशी कन्या पूजन करणाऱ्यांनी 20 तारखेला दुपारी 12.50 च्या आधी कन्या पूजन करावे. नवमी तिथीला देवीच्या सिद्धदात्री या रूपाची पूजा केली जाते. सिद्धदात्रीची पूजा केल्याने समृद्धी, संपत्ती आणि कौटुंबिक आनंद मिळतो. आपण नेहमी पाहतो की, नवरात्रामध्ये अष्टमी किंवा नवमीला देवीसमोर होम केला जातो. मात्र हा होम का केला जातो, यामागे नक्की कोणते शास्त्र आहे? हे अनेकांना माहित नसेल. आज आपण या लेखातून होमाचे महत्त्व, फायदे आदी सर्वच गोष्टींची माहिती जाणून घेऊया. (Hom Havan)
हवनाचे धार्मिक महत्त्व
देवी भागवत पुराणानुसार दुर्गा सप्तशतीचे मंत्र आहेत. हवनाच्या वेळी दुर्गा सप्तशतीच्या 13 अध्यायांच्या मंत्रांचे पठण करताना हवनकुंडात स्वाहा म्हणत आहूती द्यावी. हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करण्यापूर्वी त्यामध्ये फळे, मध, तूप, लाकूड इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हवनाच्या प्रभावाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे आरोग्य आणि समृद्धी लाभते. नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते. हवनासाठी लागणार्या पदार्थांमध्ये धूप, तांदूळ, सुके खोबरे, दही, आंब्याचे लाकडं, सुपारी, मध, तूप, अत्तर आणि अक्षत यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकत्र करा. हवन अग्नि प्रज्वलित करण्यासाठी कापूर आणि आंब्याच्या लाकडाचा वापर करा. (Social Updates)
विटांच्या साहाय्याने अग्निकुंड तयार करा. त्याला शेणाने सारवा. त्यावर गंगाजल शिंपडा. पूजा साहित्यावरही गंगाजल शिंपडा. हवनकुंडात आहूती देण्यासाठी सुक्या आंब्याच्या लाकडाचा वापर करावा. तुपात भिजवलेला कापूस आणि कापूर जाळून हवनकुंडाची ज्योत पेटवा. यानंतर गणेशाला, पंचदेवता आणि नवग्रहांना ५ वेळा तूप अर्पण करावे. ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे नमः चा जप करा आणि हवनकुंडात अर्पण करा. शेवटी भात आणि मध एकत्र करून हवनकुंडात मंत्रासोबत अर्पण करा. हवनानंतर आरती करावी. विटा आणि शेणाने सारवलेले हवनकुंड तयार करणे शक्य नसेल तर बाजारात तयार हवनकुंड देखील मिळतात. हे तुम्ही विकत घेऊ शकता किंवा एखाद्या बिछायत केंद्रातून भाड्यानेही आणू शकता. हवन करताना शुद्धता आणि पावित्र्य जपणे फार आवश्यक आहे. याशिवाय हवन झाल्यानंतर 12 वेळा विष्णवे न महाः या मंत्राचा जप करावा आणि पुजेत काही कमी राहीली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी. (Latest Marathi News)
हवन पूजा सामग्री
नवमीच्या हवनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी : नवरात्रीमध्ये हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू लागतात. पूजा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हवन कुंड, आंब्याची पाने, शुद्ध गाईचे साजूक तूप, विड्याची पानं, सुपारी आणि नारळ लागेल. हे सर्व साहित्य हवनासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय कापूर, लाल रंगाचे वस्त्र, गंगाजल, पंचामृत, लाल धागा आणि हार फुले देखील लागतात. हवनासाठी लोबान, जव, काळे तीळ, तांदूळ, मध आणि लवंग यांचाही वापर केला जातो. हे सर्व पदार्थ हवनात वापरल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. (Top Trending Headline)

हवनाची पद्धत
नवमीला हवन करण्यापूर्वी हवनाची जागा पाणी अथवा गंगाजलाने स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर हवन कुंड आणि इतर सर्व पूजा साहित्य व्यवस्थित ठेवावे. कापूर ठेवून हवन कुंडात अग्नी प्रज्वलित करावा. ही अग्नी शुद्ध मानली जाते आणि ती देवांपर्यंत आपले आवाहन पोहोचवते असे मानले जाते. हातात पाणी, फुलं आणि तांदूळ घेऊन देवीसमोर संकल्प करावा. संकल्प म्हणजे आपण कोणत्या हेतूने हवन करत आहोत, हे देवीला सांगणे. यानंतर “ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे” किंवा दुर्गा सप्तशती मंत्राने १०८ आहुती द्याव्यात. प्रत्येक आहुती देताना मंत्राचा उच्चार स्पष्ट असावा. (Top Marathi News)
होमहवन निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, यासाठी मातृका देवतांचे पूजन केले जाते. पारंपरिक विधीमध्ये 17 सुपाऱ्यांची मातृका म्हणून स्थापना केली जाते. त्यानंतर यज्ञकुंडाच्या परिसराची स्थानशुद्धी केली जाते. काही परंपरांमध्ये गोमूत्र, पंचगव्य आणि पांढरी मोहरी यांचा यासाठी वापर केला जातो. यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती आणि इतर देवतांचे पूजन केले जाते. कलशाजवळ देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करून महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि नवदुर्गा यांचे आवाहन केले जाते. देवीची प्रार्थना आणि ध्यानमंत्र म्हटल्यानंतर पीठदेवतांचे पूजन केले जाते. (Latest Marathi Headline)
होमहवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे अग्निस्थापना. पारंपरिक पद्धतीनुसार अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते. यासाठी समिधा, तूप आणि परंपरेनुसार योग्य लाकडांचा वापर केला जातो. हवन पूर्ण होईपर्यंत अग्नी सुरक्षितपणे प्रज्वलित ठेवला जातो. यानंतर नवग्रहांच्या शांतीसाठी गंध आणि पुष्प अर्पण करून पूजा केली जाते. नवग्रह हवनात तूप, तीळ, भात आणि समिधा अर्पण केल्या जातात. या वेळी संबंधित मंत्रांचे पठण केले जाते. (Top Stories)
हवनात पूर्ण आहुती देण्यासाठी एक नारळ घ्यावा. त्यावरून थोडा कापून ठेवून सर्वात शेवटी त्यावर लाल धागा गुंडाळावा. मग नारळ तुपात बुडवावे आणि मंत्र म्हणत अग्नीला अर्पण करावे. ही पूर्ण आहुती हवनाचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर ‘ओम पूर्णमद: पूर्णमिदम् पुर्णात पूण्य मुदच्यते, पुणस्य पूर्णमादाय पूर्णमेल विसिस्यते स्वाहा’ या मंत्राचा जप करावा. यामुळे हवन पूर्ण झाल्याचे मानले जाते आणि त्याचे पूर्ण फळ मिळते अशी श्रद्धा आहे. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Comments
Post a Comment