Health : नवरात्रात उपवास करताना ‘अशा’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
आता लवकरच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून नवरात्राची ओळख आहे. एका वर्षात चार नवरात्री साजऱ्या होतात. त्यापैकी एक चैत्र नवरात्र, एक शारदीय नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्र असतात. यात शारदीय नवरात्राचे महत्त्व थोडे अधिक मानले जातात. नऊ दिवसांच्या या सणात देवीची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. देवीचे पाठ वाचले जातात. बरेच लोकं नवरात्रामध्ये नऊ दिवसांचे उपवास देखील करतात. अनेक लोकं उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात तर काही लोकं केवळ फळं आणि कोमट पाणी पितात. तर काही पूर्णपणे उपाशी राहून हे उपवास करतात. प्रत्येकाची आपली पद्धत असते. (Navratri 2026)
मात्र हे उपवास करताना सगळ्याच भक्तांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूपच जरुरी असते. कधी कधी काही लोकांना हा उपवास आरोग्यावर घातक परिणाम करतो, त्यामुळे डॉक्टर उपवास करताना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देतात. ज्या लोकांना काही आजार आहेत किंवा जे लोकं दररोज औषधं घेतात त्यांनी नवरात्रीचा उपवास करण्याआधी एकदा वैद्यकीय तपासणी करुन घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. नवरात्रामध्ये उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही. चला जाणून घेऊया. (Health)
सगळ्यात आधी जे लोकं आजारी आहेत किंवा नुकतेच आजारातून बरे झाले आहे अशा लोकांनी उपवास करणे टाळावे. तसेच मधुमेह, रक्तदाब, डोकेदुखी, पित्त, शरीरात रक्त कमी असणे, ह्रदयविकार, श्वसनविकार, फुफ्फुसाशी संबंधित आजार, यकृताचे आजार यासारखे विकार असल्यास किंवा नुकतीच शस्त्रक्रिया झाली असल्यास, अशक्तपणा आला असल्यास उपवास करणे टाळावे. सोबतच गरोदर महिलांनी शक्यतो उपवास करू नये. ज्यांना उपवास करण्याची सवय नसेल, जे लोकं कष्टाचे, धावपळीचे काम करत असतील अशा लोकांनी फक्त पाणी पिऊन उपवास करण्याऐवजी किमान एक वेळ खाऊन उपवास करावा. (Marathi)

उपवास करताना रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिणं टाळा. कारण चहा आणि कॉफीमधील कॅफिन पोटातील आम्लता वाढवते. यामुळे आम्लता तर वाढतेच शिवाय छातीत जळजळ देखील होऊ शकते. चहा आणि कॉफी याऐवजी तुम्ही लिंबाचे सरबत, ताक आणि नारळ पाणी पिऊ शकता. शिवाय उपवासाच्या दिवसांमध्ये अनेक लोक कमी पाणी पितात. यामुळे केवळ डिहायड्रेशन होत नाही तर बद्धकोष्ठता आणि आम्लता देखील वाढते. म्हणून, भरपूर पाणी प्या. यासोबतच, काकडी, टरबूज आणि मुळा यांसारखी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली फळे देखील घेऊ शकता. तसंच हर्बल टी देखील घेऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहते. परिणामी आम्लतेची समस्या उद्भवत नाही. (Top Trending Headline)
उपवासाच्या काळात बरेच लोक फळं खातात परंतु काही लोक फळं खाण टाळतात. मात्र उपवासात फळे खाल्ली पाहिजे. पण लक्षात ठेवा उपवासात लिंबूवर्गीय फळे कमी खावीत. कारण यामुळे शरीरातील आम्लता वाढते. उपवासात तुम्ही केळी, पेरू, अंजीर, पपई आणि सफरचंद खा. त्यातील कार्बोहायड्रेट्समुळे भरपूर ऊर्जा मिळते. काही लोक उपवास करताना संध्याकाळपर्यंत काहीही खात नाहीत. त्यामुळे आम्लता वाढते आणि गॅसची समस्या उद्भवते. म्हणून बराच काळ उपाशी पोटी राहण्यापेक्षा भिजवलेले बदाम, अक्रोड, केळी खा यामुळे तुम्हाला दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते. त्याशिवाय, तुम्ही ओट्स, चिया पुडिंग इत्यादी देखील खाऊ शकता. (Top Marathi News)
नवरात्रीचा उपवास करणारे लोकं अनेकदा चिप्स, नमकीन फरसाण अशा गोष्टींचे सेवन करतात. परंतु अशा पदार्थांचे सेवन करण्यापासून वाचले पाहिजे. कारण हायजिन सोबतच या पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकतात. तसेच काहीजण घरी सुद्धा उपवासाचे पदार्थ बनवतात ज्यामध्ये खूप जास्त तेलाचा वापर केला जातो. उपवासादरम्यान जास्त तेलकट खाण टाळायला हवं कारण यामुळे पचनक्रिया बिघडते आणि डिहाइड्रेशनची समस्या सुद्धा होऊ शकते. उपवास करताना दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी रात्री बदाम, अखरोड आणि पीनट्स (शेंगदाणे) पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. काही तासांच्या अंतराने फळांचे सेवन करू शकता. (Latest Marathi Headline)
नवरात्रीच्या काळात बरेच लोक लाडू, हलवा, मिठाई इत्यादी गोड पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये भरपूर साखर असते जी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गोड पदार्थांमध्ये जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढते. उपवासाच्या काळात गरबा/दांडिया खेळण्यामुळे किंवा उपवासाचे नियम पाळताना शरीरावर ताण येतो. रात्री किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. दिवसभरात खूप जास्त थकवा जाणवल्यास थोडा वेळ विश्रांती घ्या. राजगिरा हा उपवासाला चालणारा एक चांगला पदार्थ आहे. तसेच त्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. त्याची दुधामध्ये खीर किंवा लापशी बनवून खावी. यामुळे ताकद येते. भगर ही नवरात्रीच्या आहारातली महत्वाची गोष्ट म्हणून मानली जाते. भाताप्रमाणे ती बनवून खाता येते, तिची खीरसुद्धा करून खावी. हवे असल्यास आवडीच्या भाजीसमवेत खायला हरकत नसते. (Top Stories)
पदार्थांना गोड चव यावी याकरिता साखर वापरण्याऐवजी गूळ किंवा मध वापरावा. केळी, घोसाळी, साबुदाणा, रताळे, राजगिरा यांचे विविध पदार्थ करून खावेत. शिंगाड्याचे पीठ उपवासाला चालते. त्यात ७५ टक्के पिष्टमय पदार्थ आणि २० टक्के प्रथिने असतात. तेलाने माखलेल्या पुऱ्या खाण्याऐवजी या पिठाच्या पोळ्या बनवून खाल्ल्यास आरोग्याला त्या उत्तम असतात. तसेच ज्यावेळी भूक लागते अशावेळी काकडी, फळांचे तुकडे, सलाड खाण्यावर भर द्यावा. यामुळे ताकद येते आणि थकवा दूर होतो. (Social News)

Comments
Post a Comment