Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार ‘अज्ञानेश्वरांच्या’ हिट लिस्ट वर का?

 ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सुप्रीम कोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली. Vikas Singh नामक Supreme Court च्या एका वरिष्ठ अधिवक्त्याने निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त Gyanesh Kumar यांना, एस आय आर संदर्भात सर्व निर्णय, इतर २ आयुक्ताची संमती न घेता, घेतले म्हणून तातडीने निलंबित करावे, त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची एस आय टी मार्फत चौकशी करावी आणि त्यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित करावे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. पुढे जाऊन त्यांनी न्यायालयाला अशी धमकी दिली की तुम्ही आमच्या मागणीप्रमाणे अंतरीम आदेश दिला नाही तर देश जळू लागेल. (हेच विकास सिंग Sushant Singh Rajput च्या संशयास्पद हत्ये संदर्भात सुशांतच्या वडिलांचे वकील होते). ते सुशांतच्या वडिलांना न्याय मिळवून देऊ शकले नाहीत., ही त्यांची पूर्वपिठीका.विकास सिंगच्या याचिकेचा सर्व डोलारा इंडियन एक्स्प्रेसच्या एका अर्धवट रिपोर्टवजा बातमीवर आधारित आहे.या बातमीवर इंडियन एक्सप्रेसने ३ दिवसात यु टर्न घेतला ही बाब सोयीस्कर रित्या विसरली जात आहे. (Gyanesh Kumar)

या याचिकेवर सुप्रीम कोर्टने ज्या टिप्पण्या केल्या आणि जे निर्देश दिले ते अत्यंत ऑब्जेक्टिव्ह व टू द पॉईंट आहेत. काय म्हणाले सुप्रीम कोर्ट –
१-आम्ही एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे निर्देश /आदेश देणार नाही
२- वृत्तपत्रातील बातमी बरोबर किंवा चूकही असू शकते
३-आम्ही आमचे होम वर्क करून आलेलो आहोत. आम्हाला विषय माहित आहे
४ ज्ञानेश कुमारांना निलंबित करण्याची मागणी फेटाळून लावत आहोत
५ ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणार नाही.
६ फॉर्म नंबर ६ मध्ये बदल करण्यास आम्ही अनुमती दिलेली नाही
७तिन्ही आयुक्त, केंद्र सरकार यांनी एक आठवड्यात ऍफिडेव्हिट दाखल करावे
८ निवडणूक आयोगाने आपले रेकॉर्ड सुप्रीम कोर्टासमोर ठेवावे. निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय सर्व सहमतीने किंवा बहुमताने घेतले आहेत का ते आम्ही तपासून पाहू. (Gyanesh Kumar)

सुप्रीम कोर्टच्या वरील पवित्र्यामुळे भल्या भल्या वकिलांसह इतर सर्व ‘अज्ञानेश्वरांना ‘ चांगलाच झटका/ चटका बसला असेल. कोण आहेत हे अज्ञानेश्वर?
१- Mamata Banerjee -ममता्नी ज्ञानेश कुमारांची संभावना चोर / डाकू अशी केली
२- Rahul Gandhi – राहुलनी ज्ञानेश कुमार यांना ‘सत्तेवर आलो तर बघून घेऊ अशी धमकी दिली आहे.
३- Uddhav Thackeray – यांनी तर ज्ञानेश कुमारांवर थेट हात उगारण्याची धमकी दिली
४ Arvind Kejriwal – यांनी ज्ञानेश कुमारना अटक करण्याची मागणी केली
५ सर्व झुरळे :- ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेण्यासाठी जंतर मंतर वर पुन्हा आंदोलन करण्याची धमकी दिली
६ Raj Thackeray -शून्याच्या ‘चक्रव्युहातून ‘ हे बाहेर पडू शकत नाहीत म्हणून यांचा ज्ञानेश कुमारांवर राग आहे.
या सर्व अडाण्यांना हे माहित नाही की मुख्य निवडणूक आयुक्ताना हटवण्याचा एकमेव मार्ग आहे इम्पिचमेन्ट मोशन संसदेत पास करून घेणे. तसेच यांना हेही माहित नसावे की मुख्य निवडणूक आयुक्ताना फौंजदारी तक्रारीपासून कायदेशीर अभयदान मिळाले आहे (संसदेकडून). सर्वोच्च न्यायालय सुद्धा निवडणूक आयुक्ताना निलंबित/ बडतर्फ करू शकत नाही. निवडणूक आयुक्त हे थेट राष्ट्रपतीना रिपोर्ट करतात. (Gyanesh Kumar)

मुख्य निवडणूक आयुक्तांचा गुन्हा तरी काय?
१- बंगालमध्ये इतिहासात प्रथमच एकही खून न होता विधान सभा निवडणूक शांततेत पार पडली
२-बंगालमध्ये सर्व पक्षपाती अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून कायदा व सुव्यवस्था राखली
३ बोगस व डुप्लिकेट मतदान होऊ दिले नाही
४अवैध घुसखोर परकीय नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळली
५ केंद्रीय सुरक्षा बलाची नेमणूक केल्याने जनतेत विश्वास निर्माण होऊन ९०% हून अधिक मतदार घराबाहेर पडले व त्यांनी निर्भीडपणे मतदान केले
६ निवडणुकीतील गैरप्रकार रोखले

निवडणूक आयुक्तानी अराजकवाद्याच्या शेपटावर पाय ठेवल्याने ते आता फडफडत आहेत. बंगालमध्ये जे सत्तापरिवर्तन झाले ते निवडणूक आयोगामुळे झाले असा सोयीस्कर गैरसमज जनतेत पसरवून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला उलथवून टाकण्याचा एकमेव अजेंडा घेऊन सर्व विभाजनवादी तत्वे एक होऊन रस्त्यावर उतरत आहेत. बंगालमध्ये जर ममता परत निवडून आल्या असत्या तर ही आंदोलने झाली नसती. एस आय आर प्रक्रिया खरंच पक्षपाती असती तर बिहारमधील Bharatiya Janata Party चा बालेकिल्ला असलेल्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असता का? मध्य प्रदेशात दतीया मतदारसंघात भाजप हरला असता का? दोन्ही राज्यात भाजपचीच सरकारे आहेत. वेड पांघरून पेडगावला जाणारे राहुल गांधी, केजरीवाल, डावे नेते, झुरळे या प्रश्नांची उत्तरे देतील का? वोट चोरीचा आरोप करतात मात्र कोर्टात कुठलाही पुरावा देत नाहीत. सर्व आरोप संसदेत किंवा माध्यमांसमोर केले जातात. (Gyanesh Kumar)

केरळचे Congress चे गृहमंत्री कॅमेऱ्यासमोर म्हणत आहेत की एस आय आर मुळे बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली म्हणूनच काँग्रेस सत्तेवर येऊ शकली. महाराष्ट्रात Raj Thackeray काही महिन्यापूर्वी म्हणत होते की महाराष्ट्रातील मतदार यादीत ९६ लाख बोगस मतदार आहेत. मतदारयाद्द्यांचे शुद्धीकरण झाले पाहिजे. तेच राज ठाकरे आज घूम जाव करून एस आय आरला विरोध करत आहेत. पत्रकारांच्या रूपात बसलेले ‘नंदीबैल’ याविषयी राज ठाकरेंना प्रश्न विचारत नाहीत. कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्य मंत्री D. K. Shivakumar यांनी जनतेला आवाहन केले होते की सर्वांनी आवश्यक ती कागदपत्रे दाखवून एस आय आर साठी सहकार्य करावे. त्यांनी स्वतः एस आय आरचा फॉर्म भरताना कॅमेऱ्यासमोर विधान केले होते की फॉर्म भरणे अगदी सोपे आहे. केरळ, तामिळनाडू च्या निवडणुकीत Gyanesh Kumar/निवडणूक आयोग एकदम चांगले ठरतात. दोन्ही राज्यात एस आय आर प्रक्रियेत काही गोंधळ नाही कारण तेथे बिगर Bharatiya Janata Party सरकार स्थापित झाले. भाजप जिथे सत्तेवर आला तिथे मात्र निवडणूक आयोग पक्षपाती., इ व्ही एम मध्ये घोटाळा. असल्या हास्यास्पद दाव्यांना समाजातील तथाकथित बुद्धिवादी जेव्हा हवा देतात तेव्हा त्यांना ‘अज्ञानेश्वर’ म्हणून संबोधणे वावगे ठरणार नाही. (Gyanesh Kumar) 

This blog is originally posted at gajawaja - https://gajawaja.in/gyanesh-kumar-why-is-gyaneshwars-hit-list/

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?