व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना न्यू यॉर्क न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या दोघांवरही ड्रग्ज तस्करीचा आरोप असून त्यांच्यावर अमेरिकन कायद्यानुसार खटला चालवणार आहे. अमेरिकेत, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी शिक्षा खूप कठोर आहे. त्यात दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा, मोठा दंड आणि काही प्रकरणांमध्ये अरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. त्यामुळेच आता निकोलस मादुरो यांचे भविष्य अंधारमय दिसत असतांनाच त्यांनी नेमलेल्या वकीलाचे नाव ऐकून ट्रम्प प्रशासन हादरले आहे. विकिलिक्स मधील असांज यांची निर्दोष सुटका करणारे बॅरी पोलॅक मादुरो यांचे वकील आहेत. पोलॅक यांनी असांज यांची अशाच एका अवघड प्रकरणातून सुटका केली आहेच, पण अनेक अशक्यप्राय खटल्यामध्ये त्यांनी आपल्या आशिलांना सहीसलामत बाहेर काढले आहे. त्यामुळेच मादुरो यांनी नेमलेल्या या वकीलामुळे ट्रम्प प्रशासनातील अधिकारी चिंतेत आले असून मादुरो यांच्या समर्थकांना आता त्यांच्या सुटकेची आशी दिसू लागली आहे. ( Venezuela )
व्हेनेझुएलाचे अध्य़क्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीवर अमेरिकेच्या न्यायालयात सुरु झालेल्या खटल्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. याखटल्यात मादुरो यांचा पक्ष कोण मांडणार याचीही उत्सुकता होती. आता मादुरो यांच्या वकीलाचे नाव पुढे आले आहे. निकोलस मादुरोंचे वकील हे बॅरी पोलॅक आहेत. बॅरी पोलॅके हे विकिलिक्स प्रकरणातील ज्युलियन असांजची अमेरिकन तुरुंगातून सुटका करणारे प्रसिद्ध वकील आहेत. तेच आता व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरोंचे रक्षण करणार आहेत. मादुरोंवर अमेरिकेत नार्को-दहशतवाद आणि ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप आहेत. या गुन्ह्यासाठी अमेरिकेत मृत्यूदंड आणि आजन्म कारागृहाची शिक्षाही सुनावण्यात येते. यातून मादुरो यांना बॅरी पोलॅक वाचवतील अशी आशा त्यांच्या पाठिराख्यांना आहे. ( Venezuela )निकोलस मादुरो प्रकरणात बॅरी पोलॅक यांची नियुक्ती होताच या ऐतिहासिक आणि हाय-प्रोफाइल कायदेशीर लढाईने नवीन वळण घेतले आहे. वास्तविक मादुरो यांच्यावर खटला चालणार अशी बातमी आल्यावर त्यांचे वकीलपत्र कोण घेणार याची चर्चा सुरु झाली. त्यासाठी अमेरिकेतील अनेक प्रसिद्ध वकील फर्मची चौकशी सुरु झाली होती. हा खटला जगप्रसिद्ध होणार आहे, शिवाय यात कोण जिंकणार याकडेही अवघ्या जगाचे लक्ष असणार आहे. अशी हायप्रोफाईल केस हाती घ्यायला अमेरिकेतील अनेक मान्यवर वकील उत्सुक होते. पण मादुरो यांच्या सहकार्यांनी या खटल्यासाठी प्रसिद्ध वकील बॅरी जे. पोलॅक यांचे नाव निश्चित केले आणि अमेरिकन कायदेशीर जगात खळबळ उडाली आहे. ( Venezuela)
मादुरो यांच्यावर अमेरिकेत गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यात नार्को-दहशतवाद आणि कोकेन तस्करीचा समावेश आहे. अमेरिकेत, अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी शिक्षा खूप कठोर आहे. ही शिक्षा गुन्ह्याचा प्रकार, प्रमाण आणि तीव्रतेवर अवलंबून असते. त्यात दीर्घ तुरुंगवास ते लाखो डॉलर्सचा दंड अशाही शिक्षेची तरतूद आहे. शिवाय काही प्रसंगी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षाही दिल्याच्या घटना आहेत. यातही हेरॉइन, कोकेन किंवा मेथाम्फेटामाइन सारख्या नियंत्रित पदार्थांचे जास्त प्रमाण किती आहे, आणि त्यांची कुठल्या प्रांतात, किती तस्करी झाली, यावर शिक्षा अवलंबून असते. या सर्वातून बॅरी कशाप्रकारे मादुरो यांची सुटका करणार याकडे जगभराचे लक्ष रहाणार आहे.
बॅरी जे. पोलॅक यांनी गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेतील सर्वात संवेदनशील आणि वादग्रस्त प्रकरणे हाताळली आहेत. ते हॅरिस, सेंट लॉरेंट अँड वेचस्लर या प्रतिष्ठित कायदा फर्ममध्ये भागीदार आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि उच्च-स्तरीय संघीय खटल्यांमध्ये अनुभवी मानले जातात. मादुरोंचा खटला न्यू यॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात न्यायाधीश अल्विन हेलरस्टाईन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. यात पहिल्याच दिवशी सिनालोआ कार्टेलसारख्या ड्रग्ज नेटवर्कला मादुरोंनी लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला आणि ड्रग्ज तस्करांना राजनैतिक पासपोर्ट देखील दिले असा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. सोबतच मादुरोंची पत्नी सिलिया फ्लोरेसचा खटला अमेरिकेच्या न्याय विभागाचे माजी अभियोक्ता मार्क डोनेली हे हाताळत आहेत. त्यामुळेच मादुरो यांच्या पाठिराख्यांना त्यांची निर्दोष सुटका होईल, अशी आशा आहे. ( Venezuela )
Comments
Post a Comment