Cockroach : फक्त 10 रुपयांत झुरळांपासून सुटका घरातील ‘हा’ सोपा जुगाड
Cockroach : घरामध्ये झुरळांचा (Cockroaches) त्रास ही अनेकांची डोकेदुखी बनलेली असते. किचन, बाथरूम किंवा ओलसर ठिकाणी झुरळं पटकन वाढतात आणि स्वच्छतेवरही परिणाम करतात. बाजारात अनेक महागडे केमिकल प्रॉडक्ट्स उपलब्ध असले तरी त्यांचे दुष्परिणामही असू शकतात. अशावेळी कमी खर्चात आणि घरगुती पद्धतीने झुरळांपासून सुटका कशी मिळवता येईल, याबाबत अनेकजण उपाय शोधत असतात. तज्ज्ञांच्या मते, झुरळं हाकलण्यासाठी बोरिक पावडर (Boric Powder) हा अत्यंत प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे. साधारण 10 रुपयांमध्ये मिळणारी ही पावडर झुरळांच्या संपर्कात आल्यावर त्यांना नष्ट करण्यास मदत करते. बोरिक पावडर थोड्या साखरेसोबत किंवा पीठात मिसळून झुरळं येणाऱ्या ठिकाणी ठेवली, तर झुरळं त्या मिश्रणाकडे आकर्षित होतात आणि काही वेळातच त्यांचा नायनाट होतो. याशिवाय बेकिंग सोडा आणि साखरेचा वापर देखील केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा झुरळांच्या पोटात गेल्यावर रासायनिक प्रतिक्रिया निर्माण होते, ज्यामुळे त्यांचा नाश होतो. हा उपाय पूर्णपणे घरगुती असून, केमिकल्सचा वापर टाळू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे....