Chhatha puja : उद्यापासून सुरु होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या ‘छठ पूजा’ महापर्वाचे महत्त्व आणि माहिती
सणांचा देश म्हणून जगामध्ये भारताची एक वेगळी आणि अतिशय खास ओळख आहे. कारण भारतामध्ये कायम एक सण झाला की, लगेच दुसरा सण येतच असतो. नुकताच आपण सर्वांनी दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. वर्षभर सर्वच जणं या दिवाळीची आतुरतेने वाट बघत असतात. पाच दिवसांचा हा सण संपल्यानंतर सगळ्यांनाच सुनेसुने वाटते. पण दिवाळी झाल्यानंतर आपल्या देशातील काही भागामध्ये तयारी सुरु होते ती, छठ पूजेची. उत्तर भारतातला सगळ्यात मोठा सण म्हणून छठ पूजेला ओळखले जाते. खासकरून भारताच्या उत्तर भागात छठ पूजेचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आपण अनेकदा या पूजेबद्दल ऐकले असेल, मात्र ही पूजा नक्की असते तरी काय?, या पूजेत नक्की करतात?, कोणत्या देवाला ही पूजा समर्पित आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेऊया. (Marathi) कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा सण साजरा केला जातो. छठ पूजेचा सण हा चार दिवस चालतो. छठ पूजेच्या दिवशी सूर्यदेव आणि षष्ठी मैया यांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी महादेवाची देखील पूजा केली जाते. हा उत्सव बहुतकरून देशाच्या बिहार, झा...