Shravan : स्त्री आणि पुरुष एकसमान असल्याची शिकवण देणारे महादेवाचे अर्धनारीनटेश्वर रूप
आज श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवांचा महिना. या संपूर्ण महिन्यामध्ये दररोज शिवपूजा केली जाते. पण श्रावण महिन्यातील सोमवारचे महत्व औरच आहे. आजच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करून त्यांना जवस शिवामूठ म्हणून वाहिली जाते. श्रावणात अनेक ठिकाणी शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. केवळ श्रावणच नाही तर हिंदू धर्मातील अनेक व्रतवैकल्यांमध्ये शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. शिव आणि पार्वती हे कायम एकमेकांसोबतच आपण पाहिले आहे. पार्वती मातेने कायम वेगवेगळी रूपे घेऊन शिवांना प्राप्त केले. त्यांना कायम शिव आणि शक्ती नावाने देखील ओळखले जाते. आजवर आपण शिव शंकर यांच्या अनेक रूपांबद्दल अनेक अवतारांबद्दल ऐकले असेल, वाचले असेल, पाहिले असेल. मात्र आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवांच्या एका अतिशय आगळ्या वेगळ्या रूपाची माहिती सांगणार आहोत. या रूपाबद्दल जवळपास सर्वांनीच ऐकले असेल, पण त्याची माहिती खूप कमी लोकांना असेल. (Shravan)
भगवान शिवांनी पृथ्वीवरील मनुष्याचे रक्षण करण्यासाठी कायम अनेक रूपं घेतली. भगवंताने पृथ्वीवर स्त्री आणि पुरुष असे दोन वेगळे जीव तयार केले आहे. दोघे मनुष्य असले तरी ते खूपच वेगळे आहेत. आजच्या काळात कायम स्त्रीला पुरुषांपेक्षा दुय्यम दर्जा मिळतो. मात्र देवाने दोघांना देखील एकसारखेच बनवले आहे. असे असले तरी मनुष्याने मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला आणि पुरुषांना कायम अव्वल स्थान दिले. पण देवाने दोघेही एकमेकांचे पूरक असल्याचीच शिकवण जगाला दिली. स्त्री आणि पुरुष हे वेगळे आणि तर पूरक आणि ते दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहे. याची जाणीव करून देण्यासाठी शिवाने एक खास अवतार घेतला होता. आज आपण त्याचबद्दल जाणून घेऊया. (Marathi)
महादेवांनी कायम विविध अवतार घेऊन या जगाला अधर्मापासून वाचवले आणि जगाला उत्तम मार्ग दाखवला. याच शिवांचे एक महत्त्वाचे त्यांचे रूप म्हणजे अर्धनारीनटेश्वर. या नावावरूनच अनेकांना त्यांच्या या रूपाचा अंदाज आलाच असेल. अर्ध नारी अर्थात अर्धा भाग स्त्री आणि अर्धा भाग पुरुष. अर्धनारीनटेश्वर हे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे एकत्रित रूप आहे, जे पुरुष आणि स्त्री शक्तीच्या म्हणजेच शिव-शक्तीच्या पूर्णतेचे, समतुल्यतेचे आणि ऐक्याचे प्रतीक आहे. या रूपात उजवा भाग शिवाचा आणि डावा भाग पार्वतीचा आहे, जे नर-नारीचे संतुलन दर्शवते. (Shiv)
हे रूप निर्माण, संतुलन आणि तत्त्वज्ञानाचे निदर्शक आहे. शिव महापुराणात उल्लेख आहे की – ‘शंकर: पुरुषा: सर्वे स्त्रिय: सर्वा महेश्वरी ।’ म्हणजेच सर्व पुरुष भगवान सदाशिवांचे अंश आहेत आणि सर्व स्त्रिया देवी पार्वतीचे अंश आहेत, हे संपूर्ण जिवंत जग त्याच भगवान अर्धनारीश्वरांनी व्यापलेले आहे. मात्र असे काय घडले की भगवान शिवांनी असे अर्धनारीनटेश्वर रूप घेतले? यामागे एक खास पौराणिक कथा सांगितली जाते. भृंगी ऋषी हे महादेवांचे परम भक्त होते. मात्र, ते नेहमीच माता पार्वतीला महादेवापेक्षा वेगळी मानत असे आणि केवळ शिवाचीच पूजा करत असे. आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी ते एकदा कैलास पर्वतावर पोहोचले. नेहमीप्रमाणे, आदिशक्ती मां जगदंबा महादेवाच्या डाव्या बाजूस विराजमान होत्या. महादेव समाधी अवस्थेत होते आणि माता जगदंबा चैतन्याव्यस्थेत होत्या. माता जगदंबाचे डोळे उघडे होते. (Todays Marathi Headline)
भृंगी शिवप्रेममध्ये लीन झालेले होते आणि त्यांना केवळ शिवाभोवती परिक्रमा करायची होती. कारण त्याची ब्रह्मचर्यची व्याख्या वेगळी होती. आपल्या अत्यानंदात, आपल्याला केवळ महादेवाभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे, असे म्हणत त्यांनी मातेला शिवापासून विभक्त होण्याची विनंती केली. माता पार्वतीला समजले की, ते तपस्वी आहे, परंतु अद्याप त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली नाही. त्यांनी भृंगी ऋषींना समजावून सांगितले की, मी महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही. पण भृंगी समजण्यास तयार नव्हते. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्पाचे रूप धारण केले आणि ते शिवाभोवती फिरू लागले. (Latest Marathi Headline)

जगदंबा आणि महादेव यांच्या मधून जात प्रदक्षिणा घालण्याचा ते प्रयत्न करत होते. तेव्हा शिवाची समाधी भंग झाली आणि महादेवाच्या लक्षात आले की, भृंगी यांनी त्यांच्या डाव्या बाजूला जगदंबेला पाहून ते विचलित झाले आहेत. आपल्या भक्ताला समजावण्यासाठी शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता जगदंबा त्यांच्यात विलीन झाल्या. परंतु, भृंगी ऋषींना देवाचा संदेश समजला नाही आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी उंदराचे रूप धारण केले आणि अर्धनारीश्वर रूपाला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शिवभक्त भृंगीचा हट्ट निरंतर सहन करणाऱ्या माता जगदंबाचा संयम अखेर तुटला आणि त्यांनी भृंगी ऋषींना शाप दिला. (Top Marathi News)
हे भृंगी, तू विश्वाच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करत आहेस. जर तू मातृशक्तीचा आदर न करण्याबद्दलच्या आपल्या हातावर ठाम असशील, तर आत्ता तुझ्या आईचा अंश तुझ्या शरीरापासून वेगळा होईल. हा शाप ऐकून स्वत: महादेव अस्वस्थ झाले. कारण शरीरविज्ञानाच्या यांत्रिकीय स्पष्टीकरणानुसार, मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू वडिलांकडून भेटतात, तर रक्त आणि देह आईच्या अंशामधून प्राप्त होतात. या शापानंतर, भृंगीची प्रकृती खराब झाली आणि रक्त-मांस त्वरित त्यांच्या शरीरांपासून विभक्त झाले. त्यांच्या शरीरात फक्त हाडे आणि स्नायू उरले होते. या शापानंतर, भृंगी असह्य वेदनांमध्ये पडले. तेव्हा त्यांना लक्षात आले की पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही स्थान समान आहे, आपण त्यांना भिन्नतेच्या दृष्टीने पाहू नये. आपण या दोघांचाही आदर केला पाहिजे. (Top Trending Headline)
यानंतर, असह्य वेदनांनी ग्रस्त भृंगी ऋषींनी जगदंबेला प्रार्थना केली, त्यानंतर मातेने त्यांना क्षमा केली आणि त्यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, आपला शाप मागे घेणार तोच भृंगी ऋषीने त्यांना रोखले आणि सांगितले की, आई माझे दु:ख दूर करून माझ्यावर खूप दया केली आहे. परंतु, मला याच स्वरूपात राहू दे जेणेकरून माझे हे रूप जगासाठी एक उदाहरण बनेल, जे लोक पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक करतात अशा लोकांचे काय होते, हे त्यांना कळेल. (Social News)
आपल्या भक्ताचे हे बोलणे ऐकून महादेव आणि माता जगदंबा दोघेही त्याच्यावर खुश झाले. आई जगदंबा आणि महादेव यांनी अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि भृंगी ऋषींना त्यांच्या गणांमध्ये प्रमुख स्थान दिले. मग महादेव म्हणाले की आता या रूपात तुमची उपस्थिती या जगाला एक संदेश असेल की स्त्री व पुरुष यांच्यात भेद करणार्याचा गत तुमच्यासारखी होईल. हे जग पुरुष आणि स्त्रिच्या मिलनानेच पुढे जाते. दोघांचे स्वतःचे स्थान आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे. (Top Stories)
अथ अर्धनारीनटेश्वर स्तोत्र
चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय ।
धम्मिल्लकायै च जटाधराय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
कस्तूरिकाकुंकुमचर्चितायै चितारज:पुंजविचर्चिताय ।
कृतस्मरायै विकृतस्मराय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
चलत्क्वणत्कंकणनूपुरायै पादाब्जराजत्फणीनूपुराय ।
हेमांगदायै भुजगांगदाय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
विशालनीलोत्पललोचनायै विकासिपंकेरुहलोचनाय ।
समेक्षणायै विषमेक्षणाय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
मन्दारमालाकलितालकायै कपालमालांकितकन्धराय ।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
अम्भोधरश्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय ।
निरीश्वरायै निखिलेश्वराय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
प्रपंचसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय ।
जगज्जनन्यैजगदेकपित्रे नम: शिवायै च नम: शिवाय ।।
प्रदीप्तरत्नोज्ज्वलकुण्डलायै स्फुरन्महापन्नगभूषणाय ।
शिवान्वितायै च शिवान्विताय नम: शिवायै च नम: शिवाय ।।
स्तुति फल
एतत् पठेदष्टकमिष्टदं यो भक्त्या स मान्यो भुवि दीर्घजीवी ।
प्राप्नोति सौभाग्यमनन्तकालं भूयात् सदा तस्य समस्तसिद्धि: ।।
।। इति आदिशंकराचार्य विरचित अर्धनारीनटेश्वरस्तोत्रम् सम्पूर्णम् ।।

Comments
Post a Comment