Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी नक्की कधी 14 की 15 सप्टेंबर? जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त

 ज्या सणाची आपण सर्वच वर्षभर अगदी डोळ्यात तेल घालून वाट बघत असतो तो गणेशोत्सव आता अवघा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुद्धीची देवता, 64 कलांचा अधिपती, प्रथमपुज्य असलेल्या बाप्पांचे आपण सर्वच मोठे भक्त आहोत. लहान असो किंवा मोठे प्रत्येक कामाची सुरुवात गणेशाचे नाव घेऊनच केली जाते. गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा, कुटुंबाचा एक भाग आहेत. आता बाप्पा लवकरच येणार असून, त्यांच्या आगमनाची, स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी चालू आहे. बाजारपेठा देखील बाप्पांच्या मुर्त्यांची, सजावटीच्या सामानाने भरल्या आहेत. यंदा तर बाप्पा तब्बल 10 दिवसांसाठी आपल्याकडे येणार असून, आपला पाहुणचार घेणार आहेत. (Marathi)

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०६ वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७:४४ वाजता संपेल. उदयतिथीनुसार, गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर, २०२६ रोजी साजरी केली जाईल. १० दिवसांचा गणेशोत्सव १४ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालेल. अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. गणपतीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करण्यासाठी मध्यान्हकाळ विशेष शुभ मानला जातो. पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.२० ते दुपारी १.४८ हा गणेशपूजेचा शुभ मुहूर्त आहे. (Ganesh Chaturthi 2026)

भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते. यंदा सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशोत्सव सुरू होणार आहे. तर शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी गणेशोत्सव समाप्ती होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आरंभी एक दिवस अगोदर हरतालिका पूजन महिला व तरुणी करीत असतात. मात्र, यंदा एकाच दिवशी हरतालिका पूजा ani गणपती मूर्तीची स्थापना करावी लागणार आहे. या वर्षी 2026 मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहे, साधारणपणे हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत नाही. हरतालिका तृतीया भाद्रपद महिन्यात शुल्क पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि गणेश चतुर्थी चतुर्थी तिथीला येते. हरितालिका ही नेहमी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते. मात्र, या वर्षी हे दोन्ही सण 14 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच महिलांकडून हरतालिकेची पूजा केली जाणार आहे. (Top Marathi News)

Ganesh Chaturthi

भगवान गणेशाचा जन्म मध्यान्ह काळात म्हणजेच दुपारच्या वेळी झाला होता, म्हणूनच गणेश मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा पूजा मध्यान्ह काळात करणे अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानले जाते. महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. (Latest Marathi Headline)

गणेश चतुर्थी व्रत कथा
शिवपुराणातील कथेनुसार, एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उटणं लावलं होतं. अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले, अशाप्रकारे श्रीगणेशाचा जन्म झाला. माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्रीगणेशाला बसण्याची आज्ञा केली. यावेळी भगवान शंकर आले. पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही. यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं. जेव्हा माता पार्वती तिथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दु:ख झालं. (Top Stories)

मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला, आपल्या मुलाचे शीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. यावेळी सर्व देवताही तेथे जमा झाले. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्याचा आदेश दिला. बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं. यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले. पण, यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती. कारण, गणपतीचं शरीर मानवी आणि शीर हत्तीचं होतं. यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं. याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. तसेच हत्तीच्या शीरामुळेच श्रगणेशाला गजमुख हे नाव पडलं.

This blog is originally published at Gajawaja - https://gajawaja.in/ganesh-chaturthi-2026-date-sthapana-shubh-muhurat/

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?