Posts

Railway : भारतातील ‘या’ रेल्वे स्टेशवरुन प्रवास करताना लागतो पासपोर्ट

Image
  भारताबाहेर प्रवास आपण विमानानेच करत असतो. आपल्याला जर भारताबाहेर प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी लागतो तो पासपोर्ट. पासपोर्टशिवाय आपल्याला परदेशात जाता येत नाही. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात असे काही रेल्वे स्टेशन आहेत जिथून प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे…तर? तुम्ही म्हणाल काहीही काय रेल्वेने प्रवास करताना कुठे पासपोर्ट लागतो. आम्हाला वेड्यात काढता का राव? मात्र हे खरे आहे, जेव्हा तुम्ही काही विशिष्ट रेल्वे स्टेशनवरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला पासपोर्टची गरज पडते. (Railway) अनेक लोकं त्यांना गरज नसते म्हणून पासपोर्ट काढत नाही. कारण त्यांना माहिती ते परदेशात प्रवास करणार नाही. मात्र देशांतर्गत काही ठिकाणी रेल्वेने प्रवास करताना देखील पासपोर्ट लागतो. हे ऐकल्यावर आता अनेकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुद्धा पासपोर्ट काढावा लागेल. जर तुम्हाला देशातील काही विशिष्ट स्टेशनवरून प्रवास करायचा असेल तर आधी पासपोर्ट काढावा लागेल आणि मगच त्या स्टेशनवरून तुम्ही प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते स्टेशन आहेत. (Indian Railway) पेट्रापोल ...

Ryo Tatsuki : तिच्या स्वप्नाची दहशत !

Image
  जपानची बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या र्यो तात्सुकीची एक भविष्यवाणी प्रसिद्ध झाली आहे. या भविष्यवाणीमुळे जपानसह त्याच्या शेजारी देशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. र्यो तात्सुकी यांना स्वप्नामध्ये भविष्य दिसायचे. त्या घटना त्यांनी एका डायरीत लिहिल्या. यावर ‘द फ्युचर आय सॉ’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात र्यो तात्सुकीने केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता याच पुस्तकात र्यो तात्सुकीनं जपानसाठी जुलै 2025 महिना सर्वात खतरनाक महिना असल्याचे लिहिले आहे. जपानमध्ये जुलै 2025 मध्ये सर्वात मोठी आपत्ती येण्याबाबत र्यो तात्सुकीने भविष्यवाणी केली आहे. International news जपानच्या आसपासच्या समुद्रात लाव्हासारखे बुडबुडे येतील आणि महाकाय लाटा निर्माण होतील, अशी ही भविष्यवाणी आहे. 2011 च्या भयानक त्सुनामीपेक्षाही धोकादायक अशी त्सुनामी येण्याची शक्यता या पुस्तकातून वर्तवण्यात आली आहे. जपानसह त्याच्या शेजारी देशांनाही या त्सुनामीची झळ बसणार असल्याचेही र्यो तात्सुकी यांनी लिहिले असल्यामुळे या देशांमध्ये खळबळ उडाली आहे. राजकुमारी डायनाच्या मृत्यूपासून ते कोरोना महामारीपर्यंत अन...

Dubai : क्राऊन प्रिन्सच्या चौथ्या मुलीचे नाव हिंद !

Image
  दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांचे नाव काही दिवसापूर्वी भारतात चर्चेत आले होते. कारण या क्राऊन प्रिन्सनं त्यांच्या चौथ्या मुलीचे नाव हिंद ठेवले आहे. विलासी आयुष्याबद्दल ओळखले जाणारे हे संयुक्त अरब अमिरातीचे संरक्षण मंत्री आणि दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद हे भारताच्या दोन दिवसाच्या दौ-यावर आले आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यातील राजनैतिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणूनही ओळखले जातात. (Dubai) पंतप्रधान मोदी यांच्याच आमंत्रणावरुन ते भारत भेटीसाठी आले आहेत. दुबईच्या या राजकुमाराच्या लक्झरी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या न मोजता येईल येवढ्या मालमत्तेबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद हे उत्तम घोडेस्वार आहेत. शिवाय स्कायडायव्हर आणि स्कूबा डायव्हर म्हणूनही ते ओळखले जातात. याशिवाय राजकुमार अरबी भाषेतील त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. राजकुमार त्यांच्या कविता फजा या टोपणनावाने प्रकाशित करतात. शेख हमदान सोशल मीडियाव...

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

Image
  पुढच्या काही तासांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध होणार किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना चर्चेसाठी अमेरिकेत बोलावून घेतले. या चर्चेत इराणमधील परमाणू शस्त्रांसंबंधात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे इराणमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या बैठकीत इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाल्याची चर्चा इराणमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे इराणी वृत्तपत्र कयहानने एका लेखात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबद्दल भविष्यवाणी केली आहे. (Donald Trump) आता कोणत्याही दिवशी, शहीद सुलेमानीच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी, त्याच्या रिकाम्या कवटीत काही गोळ्या झाडल्या जातील, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 48 तास अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन देशांची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव पहाता इऱाणचे खामेनी यंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे चर्चा कऱण्यासाठी वेळ माग...

Apple : सफरचंद खा आणि निरोगी राहा

Image
  आपण नेहमीच एक म्हण ऐकत असतो आणि ती म्हणजे,  “An Apple A Day Keeps The Doctor Away” अर्थात रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा. म्हणजेच आपण जर रोज एक सफरचंद खाल्ले तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो आणि डॉक्टरांकडे जाण्याची आपल्याला गरज भासणार नाही.  मग असे काय आहे या सफरचंदामध्ये की ते खाल्ल्यास आपण निरोगी राहू शकतो? चला तर मग जाणून घेऊया या सफरचंद खाल्ल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल.  (Apple) बाराही महिने बाजारामध्ये मिळणारे चाल चुटुक सफरचंद नेहमीच आपले लक्ष वेधून घेते. कधी अतिशय महाग तर कधी स्वस्त असणारे हे सफरचंद लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आजारी माणसाला भेटल्या जाताना आपण नेहमीच सफरचंद घ्यायलाच प्राधान्य देतो. याचे कारण म्हणजे सफरचंदामध्ये असलेले आरोग्यवर्धक गुण. डॉक्टर देखील आजरी असल्यास सफरचंद खाण्याचाच सल्ला देतात.  याचे कारण म्हणजे सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते. ज्यामुळे वजन देखील वाढत नाही. सफरचंदांमध्ये कॅलरीजही चांगल्या प्रमाणात असतात.  (Apple Benefits) वजन कम...

Shalivahan Shake : जाणून घ्या शालिवाहन शके म्हणजे काय?

Image
  लवकरच आपण गुढीपाडव्याचा सण साजरा करणार आहोत. या सणाला खूपच मोठे आणि महत्वाचे वैशिट्य आहे.  एकतर या दिवशी हिंदू नवीन वर्ष सुरु होते आणि दुसरे म्हणजे या दिवसापासून हिंदू कालगणना सुरु होते. पुराणानुसार, गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले.  आपले जवळपास सर्वच हिंदू सण हे याच कालगणनेनुसार साजरे करत असतो. खूप कमी असे सण आहेत ज्यासाठी इंग्रजी कॅलेंडरची आपल्याला गरज पडते.  (Gudhipadwa) आपण नेहमीच अनेकांच्या तोंडून, पंचागावर, पूजा सांगणाऱ्या गुरुजींच्या तोंडून एक शब्द नक्कीच ऐकला असेल आणि तो शब्द म्हणजे, ‘ शालिवाहन शक ‘. मग नक्की हे ‘शालिवाहन शक’ आहे तरी काय? काय आहे या शब्दाला अर्थ? फक्त कोणीतरी हा शब्द उच्चरतात आपण ऐकतो आणि सोडून देतो. मात्र शालिवाहन शक या शब्दाला मोठा अर्थ आणि महत्व आहे. याच शब्दावरून आपली हिंदू कालगणना ठरवली गेली आहे. हिंदू कालगणनेत विक्रम संवत् आणि शालिवाहन शके या दोन कालगणना महत्त्वाच्या आहेत.  (Shalivahan Shake) भारतात शक आणि विक्रम या दोन दिनदर्शिकांचे म...

Statue Of Liberty : अमेरिकेची ओळखच पुसली जाणार !

Image
  जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेची ओळख काय, असा प्रश्न विचारला तर डोळ्यासमोर  स्टॅच्यू ऑफ लिबर्टी  हे स्वातंत्र्याचे प्रतीक समोर उभे रहाते. जगातील उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणा-या या  स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला 139 वर्ष  झाली आहेत. मात्र एवढ्या वर्षानंतर आता अमेरिका हे स्वातंत्र्याचे प्रतिक गमावणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा हा पुतळा अमेरिकेमध्ये तयार झालेला नाही, तर  1886  मध्ये फ्रान्सनं हा पुतळा अमेरिकेला भेट स्वरुपात दिला आहे. अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहारामधील  मॅनहॅटन परिसरातील लिबर्टी बेटावर  या पुतळ्याला उभारण्यात आले. त्यामध्येही फ्रान्समधील तंत्रज्ञानांचा समावेश होता.  (Statue Of Liberty) ‘ स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे’ लोकार्पण 28 ऑक्टोबर 1886  रोजी अमेरिकेचे तत्कालीन  राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड  यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून हा पुतळा  अमेरिका आणि फ्रान्स मधील मैत्रीचे प्रतीक झाला आहे. मात्र आता हाच पुतळा फ्रान्स परत मागण्याच्या तयारीत आहे. युरोपियन संसदेचे सदस्य आणि फ्रान्समध...