Dubai : क्राऊन प्रिन्सच्या चौथ्या मुलीचे नाव हिंद !

 

दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांचे नाव काही दिवसापूर्वी भारतात चर्चेत आले होते. कारण या क्राऊन प्रिन्सनं त्यांच्या चौथ्या मुलीचे नाव हिंद ठेवले आहे. विलासी आयुष्याबद्दल ओळखले जाणारे हे संयुक्त अरब अमिरातीचे संरक्षण मंत्री आणि दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद हे भारताच्या दोन दिवसाच्या दौ-यावर आले आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यातील राजनैतिक आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे. क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणूनही ओळखले जातात. (Dubai)


पंतप्रधान मोदी यांच्याच आमंत्रणावरुन ते भारत भेटीसाठी आले आहेत. दुबईच्या या राजकुमाराच्या लक्झरी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या न मोजता येईल येवढ्या मालमत्तेबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद हे उत्तम घोडेस्वार आहेत. शिवाय स्कायडायव्हर आणि स्कूबा डायव्हर म्हणूनही ते ओळखले जातात. याशिवाय राजकुमार अरबी भाषेतील त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. राजकुमार त्यांच्या कविता फजा या टोपणनावाने प्रकाशित करतात. शेख हमदान सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असून 16.8 दशलक्षाहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत. राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद यांच्या या दौ-यावर पाकिस्तान आणि अमेरिका या देशांचेही लक्ष लागले आहे. (Latest International News)

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम हे दोन दिवसाच्या भारत दौ-यावर आहेत. अलीकडेच राजकुमार चौथ्यांदा वडील झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘हिंद’ ठेवले असून ते त्यांच्या आईच्या नावावरुन असल्याची माहिती आहे. राजकुमार हे दुबईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्रीही आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर उघडण्यासाठी राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद यांनी पुढाकार घेतला होता. या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद हे त्यांच्या प्रगत विचारांनी ओळखले जातात. (Dubai) International news

मार्च 2025 मध्ये त्यांच्या चौथ्या मुलीचा जन्म झाला. तिचे नाव ‘हिंद’ ठेवण्यात आले असून शेख हमदान बिन मोहम्मद यांची आई शेखा हिंद बिंत मकतूम यांच्या सन्मानार्थ हे नाव ठेवण्यात आले. ‘हिंद’ हे नाव अरबी भाषेत शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. शेख हमदान बिन मोहम्मद हे दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांचे पुत्र आहेत. 2019 मध्ये त्यांनी शेखा शेखा बिंत सईद बिन थानीशी लग्न केले. त्यांना रशीद, शेखा, मोहम्मद आणि हिंद अशी चार मुले आहेत. जुलै 2024 मध्ये त्यांना युएईचे संरक्षण मंत्री करण्यात आले. राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद हे घोडेस्वारीमध्ये चॅम्पियन असून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 2014 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या जागतिक घोडेस्वारी स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय राजकुमार स्कायडायव्हिंग, स्कूबा डायव्हिंग आणि सायकलिंगमध्येही चॅम्पियन आहेत. राजकुमार एक कवीही आहेत. अरबी भाषेमध्ये ते कविता करत असून सोशल मिडियावर या कविता फजा या नावानं प्रसिद्ध करतात. राजकुमार उत्तम छायाचित्रकारही आहेत. (Latest International News)

=========

हे देखील वाचा : Donald Trump : ट्रम्प तात्यांच्या टॅरिफ पे टॅरिफमुळे मार्केट आपटलं !

Pitongtarn Shinawatra : ती फक्त सुंदर नाही, उत्तम प्रशासकही आहे…

==========

राजकुमारच्या नावावर 33500 कोटीहून अधिक संपत्ती असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे एक खाजगी जेट, एक सुपरयॉट आणि फेरारी, एक लॅम्बोर्गिनी आणि एक सोनेरी मर्सिडीज यासारख्या आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. याशिवाय राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद यांच्याकडे 1000 उमदे घोडे आहेत. तसेच 120 हून अधिक उंट आहे. या घोडे आणि उंटाना ठेवण्यासाठी भव्य असे फार्म हाऊस असून तिथे या प्राण्यांना फाईव्हस्टार सुविधा उपलब्ध आहेत. राजकुमार दुबईमध्ये एका शाही राजवाड्यांमध्ये राहतात. अल मकतूम पॅलेस हा दुबईमधील सर्वात मोठा पॅलेस म्हणून ओळखला जातो. आधुनिक विचारसणीचे हे राजकुमार शेख हमदान बिन मोहम्मद आता भारतात आले आहेत. त्यांच्या या दौ-याकडे भारतासह शेजारी राष्ट्रांचेही लक्ष लागले आहे. (Dubai)

Original content is posted on https://gajawaja.in/prince-sheikh-hamdan-bin-mohammed-daughter-name-hind-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी