Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !
पुढच्या काही तासांमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध होणार किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना चर्चेसाठी अमेरिकेत बोलावून घेतले. या चर्चेत इराणमधील परमाणू शस्त्रांसंबंधात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे इराणमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या बैठकीत इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाल्याची चर्चा इराणमध्ये सुरु झाली आहे. त्यामुळे इराणी वृत्तपत्र कयहानने एका लेखात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येबद्दल भविष्यवाणी केली आहे. (Donald Trump)
आता कोणत्याही दिवशी, शहीद सुलेमानीच्या रक्ताचा बदला घेण्यासाठी, त्याच्या रिकाम्या कवटीत काही गोळ्या झाडल्या जातील, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 48 तास अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन देशांची भूमिका काय असेल, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव पहाता इऱाणचे खामेनी यंनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे चर्चा कऱण्यासाठी वेळ मागितली होती, मात्र ट्रम्प यांनी त्याला नकार देत नेतान्याहू यांना बोलावल्यामुळे इऱाणच्या अमेरिका द्वेषात अधिक भर पडली आहे. त्यामुळेच इराणच्या वृत्तपत्रामधून ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र याआधीही इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. Latest International News
ट्रम्प यांना ज्या मेजर सुलेमानी यांच्या नावानं धमकी देण्यात येत आहे, त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या गेल्या कार्यकाळात मारले होते. इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणमध्ये तसेच सीरिया आणि इराकमध्ये लोकप्रिय होते. कासिम सुलेमानी पाश्चात्य देशांमध्ये इस्लामिक क्रांती घडवण्याच्या विचारांचे होते. दहशतवाद्यांना पाठिंबा देऊन पाश्चात्य देशांमधील सरकार अस्थिर करण्याचा कट सुलेमानी रचत असल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं दिली होती. त्यानंतर अमेरिकेने हवाई हल्ल्यात कासिमला मारले. तेव्हापासून, इराणमध्ये सुलेमानी यांचा बदला घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत झालेली डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांची भेट इराणला सतर्क कऱणारी ठरली आहे. हे दोन्ही देश आपल्यावर हल्ला करण्याचा तयारीत असल्याचे इराणमध्ये सांगितले जात आहे. इस्रायलच्या लक्षावर इराणच्या फोर्डो आणि नतान्झ अणुऊर्जा प्रकल्प आहेत. (Donald Trump)
या प्रकल्पांवर हल्ला झाल्यास इराणनेही प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवली आहे. तसे झाल्यास इस्रायलच्या मदतीला म्हणून अमेरिकाही या युद्धात उतरणार आहे. ट्रम्प यांची गेल्या आठवड्यातील वक्तव्य यासाठी दाखला म्हणून घेण्यात येत आहेत. त्यांनी गाझामध्येही आम्ही विकास करु, त्यासाठी संपूर्ण गाझापट्टी खाली कऱण्याबाबत वक्तव्य केले होते. शिवाय त्यांनी अचानक नेतन्याहू यांच्याबरोबर केलेली बैठकही चर्चेत आली आहे. या बैठकीत अमेरिकेनं इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याची परवानगी इस्रायलला दिल्याची माहिती आहे. ही बैठक सुरु असतांना इस्रायलमध्ये इराणवरील हल्लाची संपूर्ण योजना तयार झाल्याचीही माहिती आहे. आयडीएफ प्रमुख आणि सेंटकॉन कमांडर कुरिल्ला यांनी तेल अवीवमध्ये तब्बल 10 तास बैठक घेऊन ही सगळी योजना तयार केली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये इस्रायल-इराणमध्ये युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या लक्षावर असलेला इराणचा फोर्डो हा अणुउर्जा प्रकल्प सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्प मानला जातो. International News
या प्रकल्पाची माहितीही जगाला नव्हती. 2009 मध्ये त्याबद्दलचे गुपित उघड झाले. तेव्हापासून अमेरिका हा अणुउर्जा प्रकल्प नष्ट कऱण्यासाठी प्रयत्नशील आहे. फोर्डो न्यूक्लियर प्लांट डोंगराखाली खोदून बांधण्यात आला आहे. सुमारे 270 फूट खोलीवर असलेला हा प्रकल्प अमेरिकेच्या आधुनिक सॅटेलाईटपासूनही दूर रहिला आहे. सुमारे 60 टक्के युरेनियम या फोर्डो न्यूक्लियर प्लांटमध्ये आहे. याशिवाय इस्रायलच्या लक्षावर असलेला इऱाणचा दुसरा अणुउर्जा प्रकल्प म्हणजे, नतान्झ अणु प्रयोगशाळा. याला इराणी अणुकार्यक्रमाचा कणा म्हटले जाते. नतान्झ लॅबचा एक भाग जमिनीखाली आहे. हवाई हल्ल्य़ापासून बचाव कऱण्यासाठी आवश्यक ती काळजी या प्रकल्पाबाबत घेण्यात आली आहे. Political News
=========
हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये
Donald Trump : ट्रम्प तात्यांच्या टॅरिफ पे टॅरिफमुळे मार्केट आपटलं !
==========
दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितली होती. पण ट्रम्प यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे इराणनं आपल्यावर हल्ला झाल्यास सैन्याला तयार रहाण्याचे आदेश दिले आहेत. तर ज्या अरब देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर इस्रायल किंवा अमेरिकेला इराणवर हल्ला करण्यासाठी देण्यात येईल, त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही खोमेनी यांनी दिली आहे. इराक, कुवेत, यूएई, कतार, तुर्किये आणि बहरीनला या देशांना ही धमकी दिली आहे. यावरुन अरब देशांमध्ये पुढच्या काही तासांमध्ये युद्धाची छाया अधिक गडद होणार असे चित्र आहे. International News
Original content is posted on: https://gajawaja.in/iran-and-america-marathi-info/
Comments
Post a Comment