Andhra Pradesh : श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातील नंदीचे रहस्य !
भारतातील अनेक मंदिरांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. या मंदिरांमधील गुढ आजही उलगडण्यात यश आलेले नाही. अशा काही निवडक मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे, श्री यागंती उमा महेश्वर स्वामी मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर आंध्रप्रदेशमधील नंदयाल जिल्ह्यात आहे. रहस्यांनी भरलेल्या या मंदिरातील नंदी महाराजांची मूर्ती ही सतत वाढत आहे. काही वर्षापूर्वी या नंदी महाराजांना भगवान शंकराचे भाविक प्रदक्षिणा मारायचे. मात्र आता ही मूर्ती वाढल्यामुळे हा प्रदक्षिणा मार्गही बंद झाला आहे. याशिवाय या मंदिराभोवती अनेक गुहा आहेत. यातील काही गुहांमध्ये प्रशस्त कक्ष असून याची निर्मिती कोणी, कशासाठी आणि कधी केली, हे कोणालाही माहित नाही. या मंदिरासमोर एक तलाव असून याभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. (Andhra Pradesh) Marathi news याशिवाय या तलावाच्या भोवती अश्वधारी कल्कींचीही मूर्ती कोरण्यात आली आहे. त्यामुळे श्री यागंती उमा महेश्वर मंदिराचे आणि कल्की अवताराचे रहस्य असल्याचे सांगण्यात येते. भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांमधील घटना पाहून भाविक नतमस्तक होतात. या चमत्...