मुंबईतील ‘या’ आहेत प्रसिद्ध दहीहंडी
यावर्षी आपण भगवान श्रीकृष्णाची ५२५१ वी जयंती साजरी करत आहोत. दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला दहीहंडीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ ऑगस्ट रोजी सगळ्यांनी जल्लोषात कृष्ण जन्म साजरा केला. मध्यरात्री १२ ला श्रीकृष्णाला पाळण्यात टाकून त्याचा जन्मोत्सव सगळ्यांनी अतिशय आनंदाने आणि प्रेमळ भावनेने केला. marathi news . आता आज २७ ऑगस्ट रोजी सगळीकडे धूम असणार आहे ती दहीहंडीची. सर्व गोविंदांना आज जास्तीत जास्त दहीहंडी कशा फोडता येतील याचाच विचार असणार आहे. तसे पाहिले तर दहीहंडी भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते. मात्र मुंबईमध्ये या दिवशी एक वेगळेच वातावरण असते. हवेमध्ये एक नवा जल्लोष, आनंद, उत्साह असतो. मुंबईमधील दहीहंडी ही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अतिशय उंच उंच दहीहंडी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात. इथे दहीहंडी फोडण्यासाठी अतिशय प्रसिद्ध पथकं आहेत. ज्यांच्यामध्ये सर्वात उंच दहीहंडी फोडण्यासाठी नेहमी चढाओढ पाहायला मिळते. आज सर्वच मुंबईतील पथकं या दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. खास या दहीहंडी पाहण्यासाठी