रात्री झोपताना चुकूनही जवळ ठेवू नका या वस्तू, होईल मोठे नुकसान
रात्री झोपताना वास्तुच्या नियमांनुसार काही गोष्टींचे पालन करावे. यामुळे आयुष्यात नेहमीच आनंदाचे क्षण येतात. याशिवाय झोपेत अडथळाही निर्माण होत नाही. Marathi news.
Vastu Tips : वास्तुनुसार आपण ज्या ठिकाणी राहतो, उठतो-बसतो अथवा झोपते त्याचा परिणाम आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. अशातच वास्तुनुसार, रात्री झोपताना काही गोष्टी स्वत: जवळ कधीच ठेवू नयेत. खरंतर असे मानले जाते की, रात्री झोपताना आपल्या आजूबाजूला ठेवलेल्या काही गोष्टी झोपेत अडथळा आणू शकतात. अथवा वास्तुदोषाचा देखील सामना करावा लागू शकतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
झोपताना इलेक्ट्रिक वस्तू जवळ ठेवू नका
वास्तुनुसार, खोलीतील वातावरण उत्तम राहण्यासाठी सर्वप्रथम झोपेच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वस्तू ठेवू नये. स्मार्टफोन, टॅबलेट अथवा लॅपटॉपसारख्या वस्तूंच्या माध्यमातून चुंबकीय विकिरण बाहेर पडतात. यामुळे झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो. अशातच झोपताना इलेक्ट्रिक वस्तू काही अंतरावर ठेवाव्यात.
झोपताना पुस्तक अथवा कागदपत्र जवळ नको
वास्तुनुसार, झोपण्याच्या ठिकाणी पुस्तके अथवा कागदपत्रे ठेवू नयेत. याशिवाय बिल्स किंवा कागदावर लिहिलेली एखादी नोट देखील नसावी. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. एवढेच नव्हे बौद्धिक विकासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. (Vastu Tips)
धारधार वस्तू ठेवू नका
झोपताना आजूबाजूला धारधार अथवा टोकदार वस्तू ठेवू नये. वास्तुशास्रानुसार, अशा वस्तूंमुळे नकारात्मक उर्जा वाढली जाते. यामुळे आयुष्यात तणाव वाढला जाऊ शकतो. एवढेच नव्हे टोकदार वस्तू आयुष्यात काही संघर्ष अथवा अडळे निर्माण करणे, बैचेन वाटणे अशा काही गोष्टी घडवून आणू शकतात.
पैशाने भरलेली बॅग
रात्री झोपताना स्वत:जवळ कधीच पैशाने भरलेली बॅग ठेवू नये. यामुळे आयुष्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते. अशा काही गोष्टी नेहमीच स्वच्छ ठिकणी ठेवाव्यात.
काच किंवा आरसा ठेवू नये
बहुतांशजणांच्या बेडरुममध्ये आरसा असतो. पण वास्तुनुसार, बेडरुममधील आरसा नेहमीच झाकून ठेवला पाहिजे. यामुळे नकारात्मक उर्जा वाढल्या जाऊ शकतात. याशिवाय व्यक्तीच्या झोपेत देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. Marathi news
Comments
Post a Comment