उत्तराखंडची संरक्षक धारी देवी, दिवसातून 3 वेळेस बदलते रुप
उत्तराखंडमध्ये केदारनाथ आणि बद्रीनाथसह काही प्रमुख प्रसिद्ध मंदिरे आहेत. यापैकीच एक मंदिर म्हणजे धारी देवीचे आहे. याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि अनोखा आहे.
Dhari Devi Temple : भारतात अनेक प्रसिद्ध आणि अद्भूत मंदिरे आहेत. काही मंदिरे मानवनिर्मित तर काही स्वयंभू आहेत. भारतातील काही मंदिरे आपल्या इतिहास आणि अद्भूत कथांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. अशातच उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथसह धारी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. धार्मिक मान्यतेनुसार, धारी देवीला उत्तराखंडची संरक्षक मानले जाते. धारी देवी उत्तराखंडमधील चार धामांचे संरक्षण करते. उत्तराखंडातील धारी देवी मंदिर देशातील 108 शक्ती स्थळांपैकी एक आहे. याच मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया… Marathi news
धारी देवी मंदिराचा इतिहास
पौराणिक कथेनुसार, धारी देवीचे मंदिर उत्तराखंडात आलेल्या पुरात वाहून गेले होते. यामध्ये देवीची मुर्ती देखील वाहून गेली होती. पण पाण्याच्या प्रवाहातील मुर्ती एका डोंगराला आदळली गेल्यानंतर तेथेच थांबली. असे म्हटले जाते की, मुर्ती ज्या ठिकाणी थांबली त्यानंतर त्यामधून एक दैवीय आवाज ऐकू आला होता. यानंतर धारो गावातील नागरिकांनी मुर्तीची स्थापना मंदिरात केली. अशातच धारी देवीचे मंदिर स्थापन झाले. धारी देवीची प्रतिमा द्वापर युगापासून विराजमान आहे. हे मंदिर धरणाच्या मधोमध आहे. ही मूर्ती दिवसातून तीन वेळा आपले रुप बदलते. (Dhari Devi Temple)
धारी देवी मंदिर का प्रसिद्ध आहे?
-धारी देवी उत्तराखंड आणि येथील चार धामांचे संरक्षण करते असे मानले जाते.
-धारी देवी दिवसातून तीन वेळेस आपले रुप बदलते म्हणून प्रसिद्ध आहे.
-धारी देवी द्वापर युगापासून स्थित आहे. येथे दूरवरुन भाविक दर्शनासाठी येतात.
-पुरात वाहून गेल्यानंतरही धारी देवीचे मंदिर उत्तराखंड येथेच आहे.
-धारी देवीचे मंदिर 108 शक्ती स्थळांपैकी एक आहे. Top stories.
Comments
Post a Comment