Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी
आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच लहान मोठ्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. निसर्गाचे, निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांचे आणि येणाऱ्या नवीन ऋतूचे स्वागत करण्यासाठी देखील अनेक सणाची आखणी केली गेली आहे. वसंत पंचमी हा असाच एक अतिशय अर्थपूर्ण आणि महत्वपूर्ण सण आहे. वसंत पंचमीचा (Vasant Panchami) सण हा वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो. यासोबतच याला अजूनही मोठे महत्व आहे.(Vasant Panchami)
हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यात येते. या पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस मानला जातो. मकर संक्रांतीनंतरसूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे.
वसंत पंचमीचा सण हा देवी सरस्वतीला समर्पित आहे. यंदा वसंत पंचमीचा सण आज २ फेब्रुवारीला साजरा होत आहे. आजच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी २ फेब्रुवारी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपासून सुरु होईल. तर ३ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार वसंत पंचमी २ फेब्रुवारीला साजरी केली जाईल. (Vasant Panchami Information)
हिंदू धर्मानुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीची मनोभावे पूजा केल्यास अभ्यासात आणि शिक्षणात यश मिळते. या दिवशी काही ठिकाणी उपवासही केला जातो. ही पंचमी होळीच्या चाळीस दिवसाआधी येते. ही तिथी शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
वसंत पंचमीचा सण सूर्याचे उत्तरायण सुरू होत असतानाच्या काळात येणारा सण आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. आजच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा करून तिची आशीर्वाद प्राप्त केल्यास विद्येची प्राप्ती होते. सरस्वती देवीची पूजा करताना पुढील श्लोक म्हणावा. (Sarasvati devi Pujan)
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना॥
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाला मोठे महत्व आहे. मान्यतेनुसार देवी सरस्वतीला पिवळा रंग खूप आवडतो. त्यामुळे या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करणे, पिवळी फुले अर्पण करणे आणि पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. पिवळा रंग हा वसंत पंचमीच्या सणाचे प्रतीक आहे. वसंत ऋतूमध्ये पिवळी फुले सर्वत्र फुललेली दिसतात. त्यामुळे हा रंग वसंत ऋतूशी संबंधित आहे. (Marathi Top News)
पिवळा रंग उत्साह, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. हा रंग नवीन सुरुवात आणि नवीन आशा दर्शवतो. नैराश्य दूर करण्यासाठी पिवळा रंग प्रभावी मानला जातो. पिवळा रंग मनाला सक्रिय ठेवण्यास मदत करतो. पिवळा रंग आत्मविश्वास वाढवतो. पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे, म्हणून तो उष्णता उर्जेचे प्रतीक आहे. पिवळा रंग सुसंवाद, संतुलन, पूर्णता आणि एकाग्रता देतो.
देवी सरस्वतीच्या जन्माशी संबंधित कथा
हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो .पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे. कथा या प्रकारे आहे-अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते.
तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव- जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले.
त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी और वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पुजलं जातं.
==============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
वसंत पंचमीशी संबंधित पौराणिक कथा
यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्री कृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वत:ला राधा प्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतू सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंतपंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली. Top Stories
Original content is posted on : https://gajawaja.in/vasant-panchami-devi-saraswati-birthday-know-the-special-significance-of-the-day-marathi-info/
Comments
Post a Comment