निक्कीने छोटा पुढारीला केले ‘किस’

 Nikki Tamboli Ghanashyam Video


 Top stories बिग बॉस सुरु झाल्यापासून रोजच या ना त्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये दोन गट पडले आणि जोरदार भांडणं पाहायला मिळाली. यासोबतच अगदी पहिल्याच आठवड्यात घरामध्ये मध्ये प्रेमाचे वारे देखील वाहू लागले. आता बिग बॉस आणि प्रेमप्रकरणं हे जणू समीकरणच बनले आहे. प्रत्येक सीझनमध्ये एक तरी जोडी हे बिग बॉसचे घर जमवताना दिसते.

आता या पाचव्या पर्वाला सुरु होऊन एवढे काहीच दिवस होत नाही तोवर घरात तिसऱ्या जोडीबद्दल चर्चांना उधाण आले आहे. सर्वात आधी या घरात निक्की आणि अरबाज यांच्या जोडीबद्दल चर्चा सुरु होती. मग वैभव आणि इरिना ही जोडी प्रकाशझोतात आली. आता मात्र निक्की आणि छोटा पुढारी यांची जोडी जमते की काय असे वाटत आहे. अहो असे वाटायला कारण देखील तसेच आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की चक्क छोटा पुढारीला किस करताना दिसत आहे.

घरात आल्यापासून छोटा पुढारी अर्थात घनःश्याम दरवडेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. घन:श्यामचा खेळ, त्याचे बोलणे, त्याची वक्तव्यं कायम त्याला चर्चेत ठेवताना दिसत आहे. नुकताच घनःश्याम आणि डीपी पोवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात छोटा पुढारी त्याचे मन मोकळे करत असताना त्याला अश्रू अनावर झाले होते.

बिग बॉसच्या घरात आल्यापासून घन:श्याम चांगलाच गाजताना दिसत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो लाजून गुलाबी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे गुलाबी होण्याचे कारण आहे निक्की तांबोळी.

Video Player
00:00
00:20

कलर्स चॅनेलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून “त्याच्याशी कसेही वागा पण छोटा पुढारी मात्र सगळ्यांशी प्रेमानेच वागणार!” असे कॅप्शन देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात निक्की तांबोळी छोट्या पुढारीला विचारते की, तू जेवलास? तुझं पोट भरलं? त्यावर घन:श्याम, “तुझं प्रेम मिळालं तर पोट भरल्यासारखं वाटतं”. तर दुसऱ्या एका दृश्यात तो निक्कीला, “तू माझ्याशी कशीही वाग, पण मी प्रेमानेच वागणार” असे म्हणताना दिसत आहे. तर ते कधी बोलताना दिसतात, एकत्र बसलेले दिसतात. निक्कीने तर घनःश्यामला किस देखील केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे या प्रोमोच्या बॅकग्राऊंडला ‘आई मला खेळायला जायचंय’ हे गाणे वाजत आहे.

======

हे देखील वाचा : ३६ वर्षांनी पुन्हा दिगज्जांचा ‘गं कुणीतरी येणार येणार गं’ गाण्यावर डान्स

======

घनश्याम तो कॅप्टन होऊ शकला नाही म्हणून खूपच दुखी झाला होता. त्याला याचे एवढे दुःख झाले की, तो डीपी दादांकडे जाऊन तो ओक्सबोक्शी रडला देखील होता. आता येणाऱ्या काळात घनश्याम आणि निक्की यांच्यात काय घडणार हे जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांमध्ये दिसून येत आहे. Top stories
 

Original Content Is Posted on: https://gajawaja.in/bigg-boss-marathi-5-nikki-tamboli-kiss-chota-pudhari-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first