जान्हवीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान

 Big Boss Marathi


 Latest Marathi News बिग बॉस मराठीमध्ये रोजच नवनवीन ड्रामा, भांडणं, वाद पाहायला मिळत आहे. पहिला आठवडा निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात झालेल्या भांडणाने गाजला. हा वाद इतका मोठा होता की, संपूर्ण महाराष्ट्राने, रितेश देशमुखने निक्कीला चांगलेच सुनावले. त्यानंतर आता निक्की जरा शांत झाली आहे. मात्र ती शांत झाली असली तरी तिच्या ग्रुपची तिची मैत्रीण जान्हवी किल्लेकर मात्र निक्कीची जागा भरून काढत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी ही वर्षा उसगांवकर यांच्याशी जोरदार भांडण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी जान्हवीला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. जान्हवीने घरात आल्यानंतर सूरज चव्हाण, आर्या, अभिजीत सावंत आदी सदस्यांची भांडणं केली आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जान्हवी आर्याला “निर्लज्ज…” म्हणत गार्डन परिसरातून जात असते. तिथे वर्षा उसगांवकर पाठमोऱ्या बसलेल्या असतात. त्यांना असे वाटते की सवयीप्रमाणे जान्हवीने त्यांच्याशी पुन्हा भांडण करायला सुरुवात केली. मात्र जान्हवी त्यांचा गैरसमज दूर न करता थेट वर्षाजींशी भांडू लागते. जान्हवी त्यांना म्हणते, “ताई माझ्या नादी लागू नका… माझं तोंड उघडू नका. मी तुम्हाला आधीच सांगतेय… पहिल्या दिवसापासून मी तुमच्याशी आदराने बोलतेय.” यावर वर्षा म्हणतात, “तू जे हसलीस… ते आदराने हसलीस का? उपहासाने…” यावर जान्हवी पुन्हा म्हणते, “तुमच्यासारखी मी खोटारडी नाहीये. मी चांगल्या हेतूने हसले, तुम्ही वेगळा अर्थ घेताय.”

वर्षाजी जान्हवीला म्हणतात, “फालतू गोष्टींच्या नादी मी लागत नाही.” नंतर मात्र जान्हवी वर्षा उसगांवकरांशी कसलाच विचार न करता मोठमोठ्याने भांडणं करत असल्याचे दिसते. आजच्या भागात हे आपल्याला पाहायला मिळाले. जान्हवी म्हणाली, “इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता” यावर वर्षा तिला सांगतात, “अगं पोरं काय म्हणतेस…मी माझ्या नवऱ्याबरोबर आनंदात आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे.”

वर्षाजींच्या या बोलण्यानंतर जान्हवी पुढे म्हणते, “तुम्ही घाणेरडा अर्थ काढताय. ही घाणेरडी अ‍ॅक्टिंग माझ्यासमोर करू नका…हे घाणेरडे तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई… ही फालतूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले कलाकार आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिले आहेत.”

जान्हवी जेव्हा वर्षाजींना त्यांच्या पुरस्कारांवरून बोलायला लागली तेव्हा अंकिताने या भांडणात मध्यस्थी करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “आपण त्यांच्या अभिनयावर का जातोय? तुम्ही दोघी इतर काही बोला पण, हे नको बोलूस.” जान्हवी तरीही शांत बसत नाही… भांडण करताना पुढे म्हणते, “यांना बाहेर काढतील ना… मग दोन शब्द बोलले पाहिजे म्हणून हे चालूये. वर्षाजी या फुटेजसाठी भांडण करत आहे.”

======

हे देखील वाचा : गुलिगत सुरजने जिंकली सर्वांची मने
======

हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर अनेकजण तिला ट्रोल करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी 5’च्या एका व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना वर्षा उसगांवकर यांच्या एका चाहत्याने लिहिले, “जान्हवी तू वर्षा ताईच्या अभिनय विषयी बोलत आहे ना, तू त्यांच्यासमोर शून्य आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “जान्हवीला बाहेर काढा आधी.” आणखी एकाने लिहिले, “जान्हवी तू फक्त नॉमिनेट हो, त्यानंतर आम्ही पाहतो.” यशिवाय “जान्हवीला लाज वाटली पाहिजे…एका नामांकित अभिनेत्रीला तुम्ही असं बोलता, आजकाल १-२ मालिका करून आलेल्या पोरी त्यांच्या पुरस्कारांवर बोलतात” आदी अनेक कमेंट्स यावर आल्या आहेत. Latest Marathi News 

Original Content Is Posted on: https://gajawaja.in/bigg-boss-marathi-season-5-jahnavi-killekar-trolled-for-disrespecting-varsha-usgaonker-marathi-info/


Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first