जपानमुळे व्हेल माशाच्या अस्तित्वावरच संकट
बुरी डायकोन , शिओयाकी सकाना , कात्सुओ-नो-टाटाकी , सनमा-नो-नित्सुके , मिसो-झुके सॅल्मन , नानबान-झुक , अजी फुराई , शिरासू डोनबुरी , टेकचिरी , नामेरू , हिमोनो ही कसली नावं आहेत, हा प्रश्न पडला असेल तर ही नावं आहेत, जपानमधील खाद्य पदार्थांची. जपानमध्ये माशांचा वापर करुन हे पदार्थ बनवले जातात. हे सर्वच पदार्थ जपानच्या सर्वच भागात प्रसिद्ध आहेत. विशेषतः यातील काही पदार्थ हे व्हेल माशाच्या मासांपासून तयार केले जातात. जगातील सर्वात मोठ्या माशांमध्ये या व्हेल माशाचा समावेश होतो. हा मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानला जातो. जन्माच्या वेळीही , निळा व्हेल इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. फक्त हा मासाच काय पण या ब्लू व्हेल माशाचे पिल्लूही सर्वात मोठे असते, त्याचे वजन ८८०० पौंड म्हणजेच चार हजार किलोच्या आसपास असते. (Japan Whale Fish) या एवढ्या अवाढव्य व्हेल माशाच्या मासांचे पदार्थ जपानमध्ये एवढे खाल्ले जात आहेत की, समुद्रातील हा सर्वात मोठा मासाच नष्ट होईल की काय ? अशी भीती पर्यावरण तज्ञांन...