हेल्दी राहण्यासाठी आरोग्याला या व्हिटॅमिन्सची भासते गरज
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, काहीवेळेस व्हिटॅमिन्सची गरज जेवणातून पूर्ण केली जात नाही. अशातच काही सप्लिमेंट्सची मदत घेतली जाते. पण सप्लिमेंट्सच्या मदतीने व्हिटॅमिन्सची कमतरता पुर्ण करणे योग्य नाही.
हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह काही आजार दूर राहतात. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो आणि काही आजार मागे लागू शकतात.बहुतांशजणांच्या शरिरात व्हिटॅमिन्सची कमतरता दिसून येते. एक-दोन नव्हे आपल्या शरिराला दररोज काही प्रकारच्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. याची पुर्तता काही गोष्टींमधून केली जाऊ शकते. अशातच शरिराला कोणत्या प्रकारच्या व्हिटॅमिन्सची गरज असते याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
दररोज किती व्हिटॅमिन्सची गरज असते?
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, हेल्दी राहण्यासाठी एका व्यक्तीला प्रतिदिन किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारच्या व्हिटॅमिनची गरज असते हे त्याचे वय, लिंग आणि हेल्थ कंडीशनवर अवलंबून असते. दरम्यान, हे व्हिटॅमिन्स कोणते असावेत याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आङे.
व्हिटॅमिन किती प्रकारचे असतात?
एकूण 13 प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. त्यापैकी 9 व्हिटॅमिन पाण्यात मिक्स आणि चार वसामध्ये मिक्स होणारे असतात. यामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B7, व्हिटॅमिन B9, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन K चा समावेश असतो. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, यामध्ये काही व्हिटॅमिनची दररोज शरिराला आवश्यकता असते. (Health Care Tips)
दररोज शरिराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन
व्हिटॅमिन ए
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन बी6
व्हिटॅमिन बी12
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, व्हिटॅमिनची गरज पुर्ण करण्यासाठी जेवण महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आहारात फळ, भाज्या, कडधान्ये, लीन प्रोटीन आणि डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी साठी तुरट फळे, व्हिटॅमिन के साठी हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन ई साठी नट्स-सीड्सचा समावेश करावा. याशिवाय काही व्हिटॅमिनची गरज जेवणातून पूर्ण होत नसल्याने काहीवेळेस सप्लीमेट्सची मदत घेतली जाते. पण यापासून दूर राहिले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सप्लीमेंट्सचे सेवन करावे.
Comments
Post a Comment