पाकिटबंद फूडच्या लेबलवरील माहिती योग्य आहे की नाही कशी तपासून पहावी?
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने पाकिटबंद फूडसंदर्भात आपला एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, पाकिट बंद फूडवर लावण्यात येणाऱ्या लेबलच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते.
आजकाल धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना जेवण बनवण्यासाठी देखील पुरेसा वेळ नसतो. अशातच मार्केटमधून पाकिट बंद किंवा प्रोसेस्ड फूड आणून घरी तयार केले जाते. खरंतर असे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याशिवाय पाकिट बंद फूड तयार करणाऱ्या कंपन्या असा दावा करतात की, त्यामधील पदार्थ पूर्णपणे नैसर्गिक आणि फ्रेश आहे. असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचू शकत नाही. बहुतांशजण पाकिट बंद फूडवर लावण्यात आलेला लेबल न वाचताच ते खरेदी करतात. याच संदर्भात एक हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे.
ICMR चा दावा
आयसीएमआरने पाकिटबंद फूड संदर्भातील एक रिपोर्ट समोर सादर केला आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिटबंद फूडवर लावण्यात आलेल्या लेबलवरील माहिती दिशाभूल करणारी असते. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशाप्रकारची काही प्रकरणे समोर देखील आली आहेत.
आयसीएमआरच्या मते, शुगर फ्री असल्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांच्या वस्तूंमध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक असते. जे शरिरासाठी अधिक नुकसानदायक ठरु शकते. पाकिटबंद फ्रुट ज्यूसमध्ये फळांचा रस केवळ 10 टक्केच असतो. अशातच नागरिकांची फसवणूक केली जाते. पाकिटबंद पदार्थ अशाप्रकारे तयार केले जातात जेणेकरुन ग्राहक ते खरेदी करण्यासाठी आकर्षित होईल.
पाकिटबंद फूडवर दिशाभूल करणारी माहिती
एनआयएनने आपल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटलेय की, रियल ज्यूसचा दावा करणाऱ्या ब्रँडमध्ये साखर आणि अन्य तत्त्वे अधिक प्रमाणात मिक्स केलेली असतात. यामध्ये खरंतर फळांचा रस केवळ 10 टक्केच असतो.
लेबल वाचणे अत्यावश्यक
एखादे पाकिटबंद फूडच्या पाकिटावर पुढच्या बाजूला ब्रँडचे नाव छापलेले असते. केवळ तेच पाहून फूड खरेदी करू नये. खरेदी करण्याआधी पाकिटाच्या मागील बाजूला लावलेल्या लेबलचेही वाचन करावे. यामध्ये फूडमधील इन्ग्रीडियेंट्स लिहिलेले असतात. (Food Labels)
लेबल वाचण्याची योग्य पद्धत
पाकिटबंद फूड आपण आवडीने खातो. पण लिस्टची सर्वाधिक मोठी खासियत अशी की, यामधील इन्ग्रीडियेंट्सची संपूर्ण लिस्ट उतरत्या क्रमाने दिलेली असते. म्हणजेच जे तत्वे अधिक प्रमाणात असतात ते सर्वप्रथम आणि सर्वात कमी तत्वे अखेरीस दिलेली असतात. म्हणजेच यामध्ये कमी प्रमाणात असलेले तत्वे अखेरीस लिहिलेली असतात.
Comments
Post a Comment