बिहारच्या मुजफ्फरच्या लिचीची जगभर गोडी

 Bihar Litchi


काही शहरांची ओळख ही त्यातील फळांवरुन झालेली आहे. जशी नागपूरची संत्री, जळगांवची केळी, नाशिकची द्राक्ष, देवगडचा हापूस, काश्मिरची सफरचंद. अशीच ओळख बिहार मधील मुझफ्फरपूर येथील लिची फळाची झाली आहे. लाल रंगाचे कवच असलेल्या या फळाच्या आत छोटा पाणीदार गोळा असतो. व्हिटामीन सी चे भरपूर प्रमाण असलेल्या या छोट्या फळाच्या मोठ्या बागा मुजफ्फरपूर येथे आहेत.  मे महिना सुरु झाला की या बागा लिचीच्या लाल फळांनी भरुन येतात. मुजफ्फरपूरची ही लिची मग विक्रीसाठी देशभर तर पाठवण्यात येते मात्र अलिकडील काही वर्षात या लिचीला  परदेशातही मोठी मागणी मिळत आहे.  त्यामुळे बिहारच्या मुजफ्फरपूरची ओळख आता लिचीचे शहर म्हणून होऊ लागली आहे. (Bihar Litchi)

बिहारच्या मुझफ्फरपूरच्या लिचीची चव देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून या मुजफ्फरपूरमध्ये लिचीच्या बागा मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या. यामुळे येथील शेतक-यांना उत्पन्नाचा मोठा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. मुजफ्फरपूरमध्ये लिचीच्या बागा लावण्यात एवढी वाढ झाली आहे की, शेती व्यवसायात नसलेल्या अनेकांनीही या लिची लावगवडीमध्ये उत्सुकता दाखवली आहे.  त्यामुळेच शेती विभागातर्फे या नवीन लिची शेतक-यांसाठी विशेष अभ्यासक्रम घेण्यात येत आहेत. 

आता मुजफ्फरपूरमध्ये देशी लिचीसोबत विदेशी लिचीच्या कलमांची लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.  शेतकऱ्यांना लिची प्रजातीच्या विदेशी फळाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.  त्यामध्ये लाँगन या लिची प्रजातीच्या फळाचाही समावेश आहे. राष्ट्रीय लिची संशोधन केंद्राने थायलंड आणि व्हिएतनाममध्ये प्रसिद्ध असलेल्या या फळासाठी आता मुजफ्फरपूरच्या शेतक-यांना आवाहन केले आहे.  मुझफ्फरपूरच्या लिचीला पूर्व भारतात मोठी मागणी असते. (Bihar Litchi)

बिहारमधील वातावरण या फळासाठी पोषक मानले जाते.  मात्र यावर्षी अधिक उष्णता असल्यामुळे लिचीच्या फळावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत लिचीच्या बागांचे उत्पादन ३५ टक्क्यांनी घटले आहे. उष्णतेची लाटउष्ण वारे आणि वाढते तापमान यामुळे लिचीच्या फळावर आणि त्याच्यामधील गोडीवर परिणाम होतो. जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेल्या मुझफ्फरपूरमधील लिचीला परदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लिची परदेशात पाठवण्यासाठी उत्सुक असतात.  परिणामी देशात ज्या लिचीचे वितरण करण्यात येते, त्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे.  

मुजफ्फरपूरमध्ये यावर्षी ८० हजार टन लिचीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ होण्याची अपेक्षा लिची उत्पादक संघाने व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी लिचीचे भाव १०० रुपये किलोवर पोहोचले होते.  यावर्षी ते १२० रुपयांपर्यंत जाणार आहेत. साधारण १५ मे नंतर मुजफ्फरपूरमध्ये लिची काढण्यास सुरुवात करण्यात येते. हिरव्या रंगाच्या लिचीला तेव्हा लाल रंग येऊ लागतो. अशाचवेळी हे फळ तोडावे लागते. (Bihar Litchi)

अतिशय नाजूक असलेल्या या फळाची तोडणी आणि त्याचे पॅकींग महत्त्वाचे असते.  कारण लिचीच्या वरचे कवच खराब झाले तर त्याची किंमत लगेच खाली येते.  ते टाळण्यासाठी कृषी विभागाकडून शेतक-यांना विशेष मार्गदर्शन करण्यात येते. मुजफ्फरपूरच्या लिचीला ज्यूस बनवणा-या मोठ्या कंपन्याही थेट बगिच्यांमधून विकत घेत आहेत.  या कंपन्यांना फळ विकणे शेतक-यांना सर्वात सोप्पे जाते.  कारण कंपनीने एकदा फळे खरेदी केली की, त्यांचा पॅकींगची जबाबदारीही याच कंपन्यांवर येते. 

==============

हे देखील वाचा : ‘मसान’ सह विक्की कौशलचे हे सिनेमे तुम्ही पाहिलेयत का?

===============

शिवाय शेतक-यांनी रोख पैसे मिळतात. त्यामुळे शेतकरी या कंपन्यांसोबत लिचीच्या बागांची विक्री करण्यास शेतकरी उत्सुक असतात.  काही शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार लिचीच्या फळांवर प्रक्रिया करत आहेत. त्यामुळे मुजफ्फरपूरमध्येच लिचीपासून कॅनज्युस, वाइन, सॉस बनवण्याचे कारखाने सुरु झाले आहेत. शिवाय याच मुजफ्फरपूरच्या लिचीची कलमेही अन्य राज्यात मागवण्यात येतात.  तशी कलमे तयार करणा-या नर्सरींची संख्या मुजफ्फरपूरमध्ये वाढत आहे. (Bihar Litchi) 

लिचीच्या ताज्या फळाला गोडफुलांचा स्वाद असतो. काहीजण त्याची तुलना गुलाबाच्या सुगंधासोबत करतात. वाळल्यावरते अधिक गोड, मनुकेसारखे लागते. लिचीमध्ये सी व्हिटामिनसह बी व्हिटॅमिन, पोटॅशियम झिंकतांबे आणि लोहासह अनेक खनिजे आहेत.  त्यामुळेच या फळाची मागणी वाढत आहे.  मुजफ्फरपूरची सर्व अर्थव्यवस्था आता गोड फळाने बहरली आहे.  

Original content is posted on: https://gajawaja.in/muzaffar-litchi-is-a-worldwide-delicacy-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first