‘मसान’ सह विक्की कौशलचे हे सिनेमे तुम्ही पाहिलेयत का?
विक्की कौशल इंडस्ट्रीमधील सर्वाधिक टॅलेंडेट अभिनेत्यापैकी एक आहे. अशातच विक्कीने उत्तम भूमिका केलेले सिनेमे एकदा तरी पाहिले पाहिजेत.
बॉलिवूडमधील टॅलेंडेट अभिनेता विक्की कौशलची आज इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओखळ आहे. एका लहान स्तरावरुन आपल्या करियरची सुरुवात करत आज यशाच्या शिखरावर विक्की पोहोचला आहे. अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात अभिनेत्याने एकापेक्षा एक उत्तम आणि दमदार सिनेमे दिले आहेत. विक्की कौशलच्या चाहत्यांना त्याचे सिनेमे वारंवार पहावेसे वाटतात. पण तुम्ही विक्कीच्या ‘मसान’ सिनेमाव्यतिरिक्त काही गाजलेले सिनेमे पाहिलेत का?
विक्की कौशलचे ओटीटीवरील उत्तम सिनेमे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशलने अस्टिटेंट डायरेक्टर फिल्म गँग्स ऑफ वासेपुरपासून फिल्मी करियरला सुरुवात केली. यामध्ये विक्कीने अनुराग कश्यपला असिस्ट केले होते. वर्ष 2015 मध्ये आलेल्या मसान सिनेमातून अभिनेत्याने अभिनयात करियर करण्यास सुरुवात केली.
मसान सिनेमा
वर्ष 2015 मध्ये आलेला मसान विक्की कौशलचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमात ऋचा चड्ढा आणि संजय मिश्राने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाला तुम्ही युट्यूबवरही पाहू शकता.
उरी: द सर्जिकल स्ट्राइल
वर्ष 2019 मध्ये आलेला उरी: द सर्जिकल स्ट्राइल सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला कसा धडा शिकवला याची कथा सिनेमात आहे. या सिनेमाला तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
संजू सिनेमा
वर्ष 2018 मध्ये आलेल्या संजू सिनेमात रणबीर सिंह मुख्य भूमिकेत होता. पण विक्की कौशलने त्याच्या खऱ्या मित्राची भूमिका उत्तमपणे साकारली होती. या सिनेमाला तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
सरदार उधम
वर्ष 2021 मध्ये विक्कीचा सरदार उधम सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची कथा शहीद उधम सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात विक्की कौशलेने उत्तम भूमिका साकारली आहे. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. (Vicky Kaushal Movies)
सॅम बहादूर
वर्ष 2023 मध्य सॅम बहादूर सिनेमा प्रदर्शित झाला. यामध्ये फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्याची कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमात विक्कीने सॅम बहादुर यांची भूमिका साकारली आहे.
जरा हटके जरा बचके
वर्ष 2023 मध्ये आलेला जरा हटके जरा बचके मध्ये एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये सारा अली खानही झळकली आहे. या सिनेमाला जिओ सिनेमावर पाहता येईल.
Comments
Post a Comment