‘या’ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुरुषांना करावा लागतो शृंगार
भारतामध्ये अनेक मंदिरं आहेत. मंदिरांचा देश म्हणून जरी भारताचा उल्लेख केला तरी वावगे ठरणार नाही. कारण आपल्या देशात मंदिरांची संख्या खूपच मोठी आहे. या मंदिरांपैकी बहुतांशी मंदिरांचा इतिहास खूपच जुना आणि गौरवशाली आहे. प्रत्येक मंदिराची आपली एक परंपरा आणि खासियत आहे. काही प्रथा अतिशय वेगळ्या आणि आश्चर्यकारक देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्या मंदिराची एक परंपरा आहे, जी ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर अनेक भाव एकत्र दिसतील. तसे पाहिले तर भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रथा पाहायला मिळतात. हे मंदिर देखील दक्षिणेतलेच आहे. या मंदिराची खासियत अतिशय हटके आहे. या मंदिरात पुरुषांना पूजा करायची असेल तर त्यांना महिलांसारखे सजून धजून मंदिरात जावे लागते. त्यानंतरच त्यांना मंदिरात प्रवेश मिळतो. ऐकून नवल वाटले ना…? मात्र हे खरे आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात कोट्टनकुलंगरा श्रीदेवी एक अनोखे मंदिर आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र तरीही पुरुष मंदिरात प्रवेश करतात, पण तो पुरुष म्हणून नाही तर स्त्री बनून. देवीच्या पूजेची ही परंपर...