फाटे फुटलेल्या केसांसाठी ‘हे’ करा घरगुती उपाय
असे म्हटले जाते की, स्त्रीचे सौंदर्य तिच्या केसांमध्ये असते. ज्या स्त्रीचे केस लांब, दाट, मऊ ती खरी सुंदर स्त्री. मात्र आजकाल प्रदूषण, चुकीचा आहार, आळस आदी अनेक कारणांमुळे केसांच्या बऱ्याच निर्माण होत आहे. यात बहुतकरून कोंडा, केस गळती, निस्तेज कोरडे केस आणि केसांना फाटे फुटणे या समस्या जास्त दिसून येत आहे.
प्रत्येकाला निरोगी, चमकदार, लांबसडक केस हवे असतात. यासाठी योग्य जीवनशैली आपण अंगिकारली पाहिजे. आजच्या काळात सर्वात जास्त केसांना फाटे फुटण्याची समस्या जास्त दिसत आहे. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून ही समस्या कमी करू शकतो. हे उपाय कोणते जाणून घेऊया.
केसांचा सर्वात खालचा किंवा शेवटचा भाग म्हणजेच केसांचे टोक दोन भागात विभागू लागते तेव्हा त्याला स्प्लिट एंड म्हणतात. हा केसांचा सर्वात जुना भाग असतो जो खूप नुकसानीमुळे फुटतो. योग्य वेळी उपचार न केल्यास ते वरच्या दिशेने जातात आणि परिणामी तुटतात. सतत केसांकडे दुर्लक्ष केल्याने, त्यांची योग्य काळजी न घेतल्याने, तिखट रासायनिक उपचार आणि केस विंचरण्याची अयोग्य पद्धती शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता हे केसांना फाटे फुटण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे.
केस धुण्यासाठी गरम पाणी नको
केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाणी केसांच्या क्यूटिकलला नुकसान पोहोचवते, त्यामुळे केस तुटतात आणि त्यांना हानी पोहचते. त्यांची मुळं नाजूक होतात. यासाठी केस धुण्यासाठी कोमट किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी वापरावे.
केस कमी धुवा
आपल्या भोवतालची धूळ, प्रदूषण, घाण यांमुळे केस खूपच खराब होतात. त्यामुळे अनेक स्त्रिया एक दिवस आड किंवा रोज केस धुतात. मात्र रोज केस धुणे केसांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. केस रोज धुतल्याने केसांवरील नैसर्गिक तेलांचा लेप निघून जातो. त्यामुळे ते कोरडे होतात आणि परिणामी त्याचे तुकडे होतात. आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा केस धुवू नये.
मायक्रोफायबर टॉवेल वापरा
केस पुसण्यासाठी अयोग्य टॉवेल वापरल्यामुळे देखील केसांना फाटे फुटू शकतात. केस ओले असताना ते सर्वात जास्त नाजूक असतात आणि ते टॉवेलने वाळवल्याने अधिक कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केस पुसण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
योग्य शॅम्पू आणि कंडिशनर
केस धुतल्याने केसांमधून भरपूर नैसर्गिक तेल निघून जाते, त्यामुळे त्यांना पुन्हा ओलावा देणे फार महत्वाचे असते. केसांना हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग करणारे योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा. केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी हेअर स्पा हा एक चांगला मार्ग आहे .
नियमित ट्रिमिंग
स्प्लिट केसांना ट्रिम करणे उत्तम पर्याय आहे. असे केस लगेच कापल्यामुळे ते वरपर्यंत स्प्लिट होत नाही. आणि उर्वरित केसांवर त्याचा परिणाम होत नाही. स्प्लिट हेयरला रोखण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग म्हणजे केस नियमितपणे ट्रिम करणे.
केमिकल्स किंवा कलरचा वापर
चांगल्या हेअर स्टाईलकरता केसांमध्ये केमिकल आणि कलरिंग करण्यास प्राधान्य देतो. हे रंग आणि रसायने वापरल्याने केसांची नैसर्गिक आर्द्रता काढून टाकली जाऊ शकते. ज्यामुळे केस कोरडे होऊ शकतात आणि तुटण्याचा धोका वाढू शकतो. रासायनिक उपचारांमुळे केसांना आतून नुकसान होते आणि ते कमकुवत होतात.
ओव्हर ब्रशिंग
केस जास्त विचारल्यामुळे किंवा अधिक ब्रश केल्यामुळे तुटतात. ओव्हर ब्रश केल्याने केस आतून तुटू शकतात आणि तुकडे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे ते टाळणे अत्यंत आवश्यक आहे. top stories
(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Comments
Post a Comment