अमर होण्यासाठी ती चक्क करायची रक्ताने आंघोळ !




फेस वॉश, फेस क्लीनर, फेस स्क्रबर, मॉइश्चरायझर, फेस मास्क, सनस्क्रीन आणि अजून बरंच काही. आजकाल मार्केटमध्ये बरेच प्रॉडक्ट आहेत, जे आपल्या चेहऱ्याला आणखी सुंदर बनवतात. पण ४००- ४५० वर्षांपूर्वी एक राणी होती, जीने सुंदर दिसण्यासाठी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या होत्या. तिच्याकडे बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल इतकी ती सुंदर होती. पण तिच्या सुंदरतेचं रहस्य होतं रक्त. ती रक्ताने आंघोळ करायची. कोण होती ही राणी? आणि ती रक्ताने का आंघोळ करायची? जाणून घेऊया. हंगेरीतल्या बाथोरी राजघराण्यात १५६० मध्ये एलिजाबेथ बाथोरीचा जन्म झाला. ती सुंदर तरुण होती, सरळ साधी. पण तिचं बालपण साधं नव्हतं. तिच्या कुटुंबाने ट्रान्सिल्वानियावर आणि जवळपास रोमानियावर नियंत्रण ठेवलं होतं. एलिजाबेथ चार किंवा पाच वर्षांची असताना तिला एपिलेप्सीच्या झटके यायचे. (Elizabeth Bathory)

त्याकाळी नोकारांना गुलामांसारखी वागणूक दिली जायची, नोकरांना नियमितपणे मारहाण व्हायची, आणि लहान वयातच हे सगळं ती पाहायची. वयाच्या सहाव्या वर्षी तिने फाशी देताना पाहिलं होते. १३ व्या वर्षी तिचं १८ वर्षांच्या Francis Nadasdy याच्याशी लग्न झालं. Francis हा सुद्धा एका प्रतिष्ठित हंगेरियन कुटुंबियातला मुलगा होता. पुढे तुर्कांसोबत झालेल्या युद्धात तो सैन्याचा प्रमुख होता, म्हणून त्याला हंगरीचा नॅशनल हीरो सुद्धा लोकं बोलू लागले होते. या दोघांच जीवन पश्चिम हंगेरियात गेलं, जिथे एका किल्ल्यात हे दोघं राहत होते. जिथे लहानपणा पासून एलिजाबेथने गरीब लोकांसोबत आणि नोकरांसोबत छळ होताना पाहिलं होतं. म्हणून ते सगळं तिच्यासाठी सामान्य झालं होतं. आता लोकांसोबत होणार छळ बघताना एलिजाबेथला मज्जा येऊ लागली होती. Francis हा सुद्धा लोकांचा छळ करायचा, आणि एलिजाबेथच्या आनंदासाठी त्याने एकदा एका मुलीला बंदी बनवलं आणि तिच्या पूर्ण अंगावर मध टाकलं. मग मधमाशा आणि कीटक तिच्या अंगावर सोडले होते. (Crime Story)

ह्याच्यावरुन एलिजाबेथची क्रूरता तुम्हाला कळली असेल. पण पुढे जाऊन या क्रूरतेला अंधश्रद्धेची जोड मिळाली आणि एलिजाबेथ आणखी क्रूर झाली. तिला कोणी सांगितलं की, तरुण मुलींच्या रक्ताने आंघोळ गेली तर तु आणखी सुंदर आणि अमर होशील. या गोष्टीवर एलिजाबेथचा विश्वास बसला आणि सुरु झाला एक भयानक खेळ. ती गरीब तरुण मुलींना राजवाड्यात काम देऊ लागली, मग त्यांना बंदी बनवून त्यांना टॉर्चर करू लागली. उपासमारीने किंवा एलिजाबेथच्या टॉर्चरमुळे जेव्हा एखाद्या तरुण मुलीचा मृत्यू व्हायचा, तेव्हा एका बाथटबमध्ये त्यांच्या शरीरातलं रक्त काढून त्याने ती आंघोळ करू लागली. काही दिवसांनंतर गावतील लोकांमध्ये या गोष्ट पसरली, राजवड्यातून कामासाठी ऑफर आली तर लोक त्याला नकार देऊ लागले. एलिजाबेथसाठी ही समस्या होती, पण तिने यावर समाधान शोधलं. तिने तरुण मुलींना किडनॅप करायला सुरुवात केली. मग त्या मुलींच सुद्धा रक्त काढून ती आंघोळ करू लागली. हे बरीच वर्ष तिने सुरू ठेवलं. १६०४ साली Francis Nadasdy मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतरही तिने हा खेळ सुरू ठेवला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गरीब तरुण मुलींची संख्या कमी झाली. मग तिने उच्चपदस्थ कुटुंबातील मुलींची शिकार करण्यास सुरुवात केली. (Elizabeth Bathory)

========

हे देखील वाचा : देवा ! पुन्हा वेंगाबाबा

========

या सगळ्या घटनेची आणि एलिजाबेथच्या क्रूरतेची खबर हंगेरीच्या राजाला मिळाली, त्याने या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर हे प्रकरण सर्वांंनसमोर उघडकीस आलं. त्याने आपल्या सैन्याला एलिजाबेथच्या किल्ल्याच्या तपासणीचे आदेश दिले. एलिझाबेथच्या राजवाड्यातून अनेक मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले गेले. १६१० साली एलिजाबेथला तिच्या गुन्ह्यांसाठी तिला अटक करण्यात आली. पण कोणत्याही जेलमध्ये तिला टाकण्यात आलं नाही, तर तिला तिच्याच राजवाड्यात बंदी बनवण्यात आलं होतं. मग चार वर्षांनी तिचा त्याच राजवाड्यात मृत्यू झाला. तिच्या राजवाड्यातून ८० सांगाडे सापडले होते. पण असं बोललं जात की तिने ६०० पेक्षा जास्त तरुण मुलींचा खुन करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती. (Crime Story) Top stories.

Original content is posted on: https://gajawaja.in/elizabeth-bathory-marathi-info/


 

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first