इंडियन सिनेमात जे पुरुषांना जमलं नाही, ते स्त्रीला जमलं !
गेल्या काही वर्षात भारतीय सिनेमाने जागतिक पातळीवर उंच उडी घेत अनेक विक्रम तर रचलेच आहेत, पण यासोबतच जागतिक स्तरावरच्या प्रतिष्ठीत पुरस्कारांमध्येही आपल्या सिनेमांनी मुसंडी मारली आहे. गेल्या वर्षीच RRR या तेलुगु चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार जिंकून इतिहास घडवला होता, यासोबतच आणखी एक अवार्ड RRR ने जिंकला होता, तो म्हणजे गोल्डन ग्लोब ! हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून जागतिक चित्रपटांना हा अवार्ड दिला जातो. याच अवार्ड्समध्ये आता एका भारतीय महिलेने असा पराक्रम केलाय, जो आजपर्यंत कुणालाही जमला नाही. जाणून घेऊया. (Payal Kapadia)
इंडियन फिल्ममेकर पायल कपाडियाने हा इतिहास रचला आहे. तिच्या ‘All We Imagine As Light’ या मुव्हीला गोल्डन ग्लोबमध्ये दोन नॉमिनेशन मिळाले आहेत. एक म्हणजे सर्वोत्कृष्ट फॉरेन Language मोशन पिक्चर्स आणि दुसरं म्हणजे Best Director हे Best Director चं नॉमिनेशन मिळवणारी ती भारतातली सर्वात पहिलीच फिल्ममेकर आहे. विशेष म्हणजे तिला आधीच या मुव्हीसाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये Grand Prix हा अवार्ड मिळाला होता. यामुळे जगभरात या चित्रपटाची प्रशंसा करण्यात आली. आतापर्यंत या मुव्हीने १० पेक्षा जास्त इंटरनशनल पुरस्कार जिंकले आहेत. पण गोल्डन ग्लोब हा विषयच प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे भारतीय फिल्ममेकर्सकडून पायलवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तिचा ‘All We Imagine As Light’ हा मुव्ही नुकताच २१ सप्टेंबर २०२४ ला रिलीज झाला होता. हिंदी, मल्याळम आणि मराठी अशा तीन भाषांमध्ये हा मुव्ही आहे. विशेष म्हणजे आपली मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने या मुव्हीमध्ये विशेष भूमिका केली आहे. पायल कपाडियाचा हा सहावाच मुव्ही आणि त्यातच पायलने जागतिक सिनेमावर आपली छाप पडली आहे. आजपर्यंत कोणत्याही पुरुष Director ला जे जमलं नाही, ते पायलने करून दाखवलं आहे. (Entertainment News)
========
हे देखील वाचा : बुशरा नावामागचे गुढ !
========
आता जाणून घेऊया की, गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या इतिहासात कोणकोणते भारतीय सिनेमे पुरस्कार जिंकले आहेत. सर्वप्रथम व्ही. शांताराम यांच्या ‘दो आंखे बारा हाथ’ या मुव्हीला Samuel गोल्डविन International हा पुरस्कार गोल्डन ग्लोबमध्ये मिळाला होता. १९८३ साली आलेला गांधी हा चित्रपट जरी हॉलीवूडपट असला तरी तो नेहमीच भारतीय मुव्ही म्हणून गणला गेला आहे. याला Best फॉरेन फिल्मचा अवार्ड मिळाला होता. यानंतर मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे आणि मॉन्सून वेडिंग या दोन चित्रपटांना बेस्ट फॉरेन फिल्मच्या Category मध्ये नॉमिनेशन मिळाले होते. २००९ साली स्लमडॉग मिलीनेअरमध्ये Best ओरीजनल स्कोरचा पुरस्कार ए आर रेहमान यांना मिळाला होता. त्यानंतर गेल्याच वर्षी RRR ला दोन नॉमिनेशन मिळाले. यामध्ये Best ओरीजनल सॉंगच्या Category मध्ये नाटू नाटू गाण्याला पुरस्कार मिळाला होता. एकंदरीत आतापर्यंत गोल्डन ग्लोबमध्ये भारतीयांना चार अवार्ड मिळाले आहेत. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष पायल कपाडियाच्या ‘All We Imagine As Light’ कडे आहे. कमर्शिअल सिनेमांच्या जगात एक साधा आणि सुंदर सिनेमा बनवून पायलने खऱ्या अर्थाने इतिहास रचला आहे. (Payal Kapadia) top stories
Original content is posted on: https://gajawaja.in/in-indian-cinema-what-men-could-not-do-women-did-marathi-info/
Comments
Post a Comment