महाकुंभमध्ये हॉटेल नाही, होम स्टे मध्ये रहा
प्रयागराजयेथील महाकुंभ मेळ्यासाठी सरकारतर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. या महाकुंभमेळ्यासाठी रोज लाखभराहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. या सर्व भाविकांना रहाण्याची आणि भोजनाची उत्कृष्ठ व्यवस्था व्हावी यासाठी आता उत्तरप्रदेश सरकारनं प्रयागराजमधील स्थानिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार आता येथील स्थानिकांची घरे होम स्टे च्या स्वरुपात भाविकांना उपलब्ध होणार आहेत. प्रयागराजमधील हॉटेलचे दर सध्या हजार ते पंचवीस हजारापर्यंत गेले आहेत. अशा परिस्थित सर्वसामान्य भाविकांना या होम स्टे मध्ये अत्यंत कमी दरात रहाण्याची आणि भोजनाची चांगली व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या होम स्टे मध्ये रहाणा-या भाविकांना स्थानिक भोजनाचीही चव त्यानिमित्तानं चाखता येणार आहे. तसेच येथील स्थानिकांनाही यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी कुंभमेळा प्रशासनातर्फे अधिकृत वेबसाईट काढण्यात आली असून या होमस्टेची नोंदणी यात करण्यात येत आहे. (Uttar Pradesh)
यातूनच प्रयागराज येथे येणारे भाविक आपल्यासाठी नोंदणी करत आहेत. याशिवाय ज्या भाविकांना टेंटनगरीमध्ये रहायचे आहे, त्यांच्यासाठीही बुकींग खुली कऱण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये उभारण्यात आलेली ही भव्य टेंटनगरी आता तयार झाली आहे. यात चार प्रकारचे तंबू असून त्यामध्ये येणा-या भाविकांची सर्व सोय होणार आहे. यात योगा पासून होमहवन करण्याचीही सोय आहे. शिवाय भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था कऱण्यात आली आहे. प्रयागराज येथे 13 जानेवारीते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान महाकुंभमेळा होत आहे. पण यासाठी प्रयागराज नगरीमध्ये आत्तापासूनच मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. तसेच ही नगरी 26 फेब्रुवारी नंतरही अशाच प्रकारे भाविकांनी गजबजलेली रहाणार आहे. फेब्रुवारी नंतर किमान तीन महिने प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येनं येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. या सर्व भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रयागराजमध्ये हॉटेल, टेंटनगरीसोबत आता होम स्टे ची व्यवस्था कऱण्यात येत आहे. (Social News)
प्रयागराजमध्ये हॉटेल, टेंटनगरीसोबत आता होम स्टे ची व्यवस्था कऱण्यात येत आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC आणि उत्तर प्रदेश पर्यटन विभागातर्फे ही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी पर्यटन विभागातर्फे स्थानिकांना आवाहन करुन कमीत कमी दोन रुम असतील तरी पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. महाकुंभमेळ्यासाठी बहुधा सर्वच हॉटेल आधीपासूनच बुक झाल्यानं हा होम स्टे चा पर्याय भाविकांना दिलासा देणारा ठरत आहे. यासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाईटला स्थानिकांनी आपल्या घराचा पत्ता नोंदवला आणि किती रुम होम स्टे साठी उपलब्ध आहेत, हे नोंदवल्यावर पर्यटन विभागाचे अधिकारी या पत्यावर प्रत्यक्ष भेट देत आहेत. या घरातील अन्य सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. यात स्वच्छता गृहांची उपलब्धता आणि भाविकांना देण्यात येणा-या अन्य सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. (Uttar Pradesh)
=======
हे देखील वाचा : सर्वशक्तीमान देशातील नागरिक भीतीखाली !
======
या होम स्टे योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक भाविकांनी ही सुविधा चांगली असल्याची नोंद संबंधित वेबसाईटवरही केली आहे. महाकुंभमेळ्याच्या वेबसाइटवरही होम स्टेचा पर्याय देण्यात आला आहे. सध्या प्रयागराजमध्ये 100 हून अधिक हॉटेल्स उपलब्ध असून त्यामध्ये सुमारे 2 हजार खोल्या आहेत. याशिवाय 50 होम स्टे ची नोंदणी झाली आहे. याशिवाय IRCTC ने प्रयागराजमध्ये महाकुंभ ग्राम आणि आधुनिक टेंट सिटी तयार केली आहे. त्यात भाविकांसाठी डिलक्स तंबू, प्रीमियम तंबू, रॉयल बाथ डिलक्स, रॉयल बाथ प्रीमियम अशा चार प्रकारात तंबू उपलब्ध आहेत. बुकिंगसाठी IRCTC ची अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com उपलब्ध आहे. शाहीस्नानाच्या दिवसांमध्ये, लक्झरी तंबूंचे भाडे ₹16,100 पर्यंत आहे. यामध्ये बुफे शैलीतील स्वादिष्ट भोजन, वैद्यकीय सुविधा, बॅटरीवर चालणारी वाहने आणि शटल सेवा देखील येथे उपलब्ध असेल. याशिवाय योग वर्ग, अध्यात्मिक चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पा या सुविधाही देण्यात येणार आहेत. या तंबू सिटीमध्ये परदेशातून येणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. प्रयागराजमध्ये येणारे भाविक आपल्याला अपेक्षित असलेल्या सुविधांची आधीच नोंदणी करत असल्यामुळे प्रशासनालाही त्याचे नियोजन करणे शक्य होत आहे. या सर्वात प्रयागराजमधील स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. (Social News) top stories
Original content is posted on: https://gajawaja.in/mahakhumbhamela-marathi-info/
Comments
Post a Comment