वेटरला टीप देण्याची सुरुवात कधीपासून झाली ?
तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत किंवा Friends सोबत रेस्टोरंटमध्ये जातच असाल. मस्तपैकी पोटभर जेवून झाल्यावर जेव्हा बिल द्यायची वेळ येते, तेव्हा एक गोष्ट तुम्ही हमखास केली असेल, ती म्हणजे ज्या वेटरने आपल्याला फास्ट सर्विस दिलीये, त्या वेटरला TIP दिली असेलच. पण तुम्ही कधी विचार केलाय का कि हि TIP नक्की का दिली जाते ? त्यामागची कहाणी काय आहे? ही TIP देण्याची पद्धत नेमकी कुठे आणि कधी सुरु झाली ? ही संस्कृती किंवा ट्रे़डीशन कसं बनलं? ह्याबद्दलच जाणून घेऊया. (Tipping Culture) Top stories तर ही जेवणानंतर टिप देण्याची परंपरा सुरु कोणी केली ? तसं बघायचं झालं तर हा टीप देण्याचा इतिहास फार जुना आहे. या संदर्भात काही गोष्टी समोर येतात. पहिली म्हणजे ही प्रथा ब्रिटिशांनी सुरु केली असं म्हटलं जात. या नुसार ही प्रथा सुमारे 1600च्या दशकात सुरु झाली आहे. योगायोग म्हणजे याच दशकात ब्रिटीश भारतात आले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या वर्षात झाली आणि ती साधारणपणे ब्रिटिशांच्या भारतात येण्याशी संबंधित होती. एका मीडिया वृत्तानुसार,1600मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना चांगली सेवा दिल्यामुळे थ