बिकनी वॉक आणि पाकिस्तानमध्ये आग !
पाकिस्तानी मॉडेल रोमा मायकलच्या रॅम्पवॉकच्या व्हिडिओनी सध्या सोशल मिडियावर तुफान आणलं आहे. रोमा मायकल हिनं बिकीनी घालून एक रॅम्प वॉक केलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. काही क्षणातच या व्हिडिओला लाखाच्यावर लाईक मिळाल्या. आणि तेव्हापासून रोमाच्या आयुष्यात वादळ आलं. अत्यंत सुंदर असणारी रोमा ही पाकिस्तानची प्रख्यात मॉडेल आहे. तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या फॅशनचीही चर्चा असते. पण यावेळी तिने जी सोनेरी रंगाची बिकनी घातली होती, त्यामुळे पाकिस्तानमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. अगदी मॉडेल रोमा हिला मारण्याच्याही धमक्या मिळाल्या आहेत. यामुळे रोमानं आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन तिचे सर्व व्हिडिओ मागे घेतले आहेत. (Roma Michael) top stories
सोशल मिडियावर पाकिस्तानच्या लाहोरमधील 29 वर्षीय ख्रिश्चन मॉडेल रोमा मायकलच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानमध्ये या व्हिडिओवरुन मोठे वादळ आले आहे. पाकिस्तानचे नाव घेऊन या मॉडेलनं बिकनीमध्ये वॉक केलेच कसे हा प्रश्न विचारत पाकिस्तानी नागरिकांनी रोमाला फैलावर घेतले आहे. सौंदर्य स्पर्धेमधील एक भाग असलेल्या या रॅम्पवॉकमध्ये रोमानं सोनेरी रंगाची बिकनी घातली होती. तिचा हा परफॉमन्स तेव्हा चांगलाच गाजला आणि त्याचा व्हिडिओ झाल्यावरही त्याचा बराच गाजावाजा झाला. रोमाला या व्हिडिओवरुन धमक्या मिळू लागल्यावर तिनं तो व्हिडिओ मागे घेतला, तरीही तेवढ्या वेळात हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला होता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये अनेकांनी हा व्हिडिओ बघितला आणि रोमावर संताप व्यक्त केला आहे. (Roma Michael)
रोमानं नुकतेच मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये आपल्या देशाचे, म्हणजे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतरच झालेल्या वादानं तिला पाकिस्तान सोडण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानमधील जुनाट विचारसरणी आणि महिलांच्या स्वातंत्र्याची पायमल्ली याचे एक उदाहरण म्हणून मॉडेल रोमा मायकलच्या घटनेकडे पाहिले जात आहे. रोमा मायकल ही पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने लाहोरच्या युनिव्हर्सिटी ऑफ साउथ एशियामधून बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. मॉडेलिंगसोबतच तिने तू जिंदगी है आणि प्यारी निम्मो सारख्या कार्यक्रमांसह अनेक टीव्ही नाटक आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. (International News)
तिने कान्स फॅशन वीक आणि दुबई फॅशन शो यांसारख्या प्रमुख कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. रोमा मायकेलचे इंस्टाग्रामवर 77,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. रोमानं मिस ग्रँड पाकिस्तान 2024 आणि मिस चार्म पाकिस्तान 2023 यासह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. शिवाय, रोमा जगभरातील नामवंत डिझायनर्स आणि ब्रँड्ससोबत काम करत आहेत. फॅशन इंडस्ट्रीत रोमाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आता हिच रोमा मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये सहभागी झाली आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रोमा या स्पर्धेसाठी व्यस्त असली तरी तिच्या व्हिडिओवरुन पाकिस्तानमध्ये मोठे वादळ उठले आहे. पाकिस्तानच्या मौलवीनं रोमावर देशाचे नाव कलंकीत केल्याचा आरोप केला आहे. त्यात रोमा ही ख्रिश्चन समुदायातील आहे. (Roma Michael)
======
हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येला राज्यातूनच मदत
======
पाकिस्तानात ख्रिश्चन हे अल्पसंख्यसमुदायात येतात. अशा तरुणीनं हिजाबशिवाय एवढ्या मोठ्या व्यासपीठावर वावरुन पाकिस्तानच्या नावाला बट्टा लावल्याची प्रतिक्रीया धर्मगुरुंनी दिली आहे. काहींनी या प्रतिक्रीयांमध्ये तेल टाकून पाकिस्तानला कधीच परत येऊ नकोस, अन्यथा असा थेट इशाराच रोमाला दिला आहे. मात्र असे असले तरी रोमाला पाठिंबा देणा-यांचीही संख्या अधिक आहे. मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये हिजाबशिवाय स्पर्धा करणारी रोमा मायकल ही पहिली पाकिस्तानी मॉडेल आहे. तिच्या या निर्णयामुळे सांस्कृतिक प्रतिनिधित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. सर्व शुभेच्छा, रोमा अशा रोमाला शुभेच्छा देणा-यांचीही संख्या अधिक आहे. रोमा मायकलला मिळणा-या धमक्यांमुळे पाकिस्तानी महिला संघटनाही पुढे आल्या आहेत. पाकिस्तानमधील एक तरुणी देशाचे नाव घेऊन मोठ्या व्यासपीठावर गेली असेल तर तिच्या कलेचे कौतुक करायचे की तिच्या कपड्यांवर आक्षेप घ्यायचा, हे संपूर्णपणे चुकीचे आहे. याच मानसिकतेतून पाकिस्तना बाहेर पडला पाहिजे, अशी अपेक्षा महिला संघटनांनी व्यक्त केली आहे. (International News) top stories
सई बने
Comments
Post a Comment