वेटरला टीप देण्याची सुरुवात कधीपासून झाली ?



तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत किंवा Friends सोबत रेस्टोरंटमध्ये जातच असाल. मस्तपैकी पोटभर जेवून झाल्यावर जेव्हा बिल द्यायची वेळ येते, तेव्हा एक गोष्ट तुम्ही हमखास केली असेल, ती म्हणजे ज्या वेटरने आपल्याला फास्ट सर्विस दिलीये, त्या वेटरला TIP दिली असेलच. पण तुम्ही कधी विचार केलाय का कि हि TIP नक्की का दिली जाते ? त्यामागची कहाणी काय आहे? ही TIP देण्याची पद्धत नेमकी कुठे आणि कधी सुरु झाली ? ही संस्कृती किंवा ट्रे़डीशन कसं बनलं? ह्याबद्दलच जाणून घेऊया. (Tipping Culture) Top stories

तर ही जेवणानंतर टिप देण्याची परंपरा सुरु कोणी केली ? तसं बघायचं झालं तर हा टीप देण्याचा इतिहास फार जुना आहे. या संदर्भात काही गोष्टी समोर येतात. पहिली म्हणजे ही प्रथा ब्रिटिशांनी सुरु केली असं म्हटलं जात. या नुसार ही प्रथा सुमारे 1600च्या दशकात सुरु झाली आहे. योगायोग म्हणजे याच दशकात ब्रिटीश भारतात आले होते. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या वर्षात झाली आणि ती साधारणपणे ब्रिटिशांच्या भारतात येण्याशी संबंधित होती. एका मीडिया वृत्तानुसार,1600मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना चांगली सेवा दिल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्कम देण्यास सुरुवात केली गेली.यालाच TIP असं म्हणतात. थोडक्यात याची सुरुवात कर्मचार्‍यांच्या कौतुकासाठी केली गेली. नंतर तो एक ट्रेंड बनला. (Social News)

दुसरी एक गोष्ट जी Foodwoolf वेबसाईटच्या आधारे सांगितली जाते, ती म्हणजे 18 व्या शतकात अमेरिकेत टिपिंगची सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल ‌अॅडमिनिस्ट्रेशनमधील प्रोफेसर मायकल लिन यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत याची सुरुवात मोठ्या क्लासच्या लोकांनी सुरु केली होती. त्यावेळेस समाजातील मोठी, उच्च शिक्षित लोकं स्वत:चा क्लास दाखवण्यासाठी, दिखावा करण्यासाठी कामगार आणि सेवा देणाऱ्या वर्गाला अशी टिप द्यायचे. पण अमेरिकेत यातून गरीब-श्रीमंत अशी दरी तयार होऊ लागली. प्रोफेसर लिन यांनी असंही म्हटलंय की, याची सुरुवात फक्त 17 व्या शतकात ब्रिटनमध्ये झाली होती. जेव्हा विशेषत: मद्यपान करणारे लोकं वेटर किंवा नोकरांना टिप्स देत असत. कारण ते मद्यपान करणाऱ्या लोकंना दारु ओतून देतात किंवा त्यांचे ग्लास सांभाळतात. (Tipping Culture)

याबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी की 18 व्या शतकातील कॉफी हाऊसमध्ये एक टिपिंग जार होता. ज्याचा वापर इंग्लंडमध्ये सर्वत्र केला जाऊ लागला, याला बहूतेक लोकं शॉर्टमध्ये टिप बोलू लागले. ज्यामुळे हा शब्द सर्वत्र ओळखू लागला. आता आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय, तो TIP हा शब्द आला तरी कुठून हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाच असेल. तर ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार 1706 साली ‘टीप’ हा शब्द प्रथम वापरला गेला. असंही म्हटलं जात की, TIP चा फूल फॉर्म To Insure Promptitude आहे, म्हणजेच कार्यतत्परतेसाठी दिलं जाणारं बक्षीस. पण ही TIP देण्याची परंपरा बंद कारण्याचे] खूप प्रयत्न झाले. 1764 मध्ये, जेव्हा ब्रिटनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबमध्ये कर्मचाऱ्यांना TIP देण सामान्य झालं, तेव्हा उच्चभ्रू वर्गाने टिपिंग दूर करण्याचा प्रयत्न केला. या काळात लंडनमध्ये बराच गदारोळ झाला ,आंदोलनं झाली . 1904 मध्ये अमेरिकेतील पत्रकारांनीही याचा निषेध केला. त्यांच्या मते, टिप देण्याची परंपरा एक प्रकारची गुलामगिरी दर्शवते. अमेरिकन संस्कृतीत त्याचा समावेश नव्हता. (Social News)

======

हे देखील वाचा :  नव्याची आशा !

======

त्यानंतर जॉर्जियामध्ये अँटी-टिपिंग सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि पुढीच्या दशकात वॉशिंग्टनसह अमेरिकेच्या सहा राज्यांनी टिपिंगविरोधी कायदे केले. दरम्यान, 1926 मध्ये सर्व अमेरिकन राज्यांमध्ये टिपिंगविरोधी कायदे रद्द करण्यात आले.1960 मध्ये, यूएस काँग्रेसने फेअर लेबर स्टँडर्ड्स ऍक्ट (FLSA) मध्ये एक दुरुस्ती केली, त्यानुसार, कर्मचाऱ्यांसाठी टिपांची रक्कम निश्चित केली गेली. दरम्यान, TIP देणं हि आता एक संस्कृतीचं झाली आहे.अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये टिपिंग हा अलिखित नियम बनला आहे. तरीही या देशांतील काही रेस्टॉरंट आणि हॉटेलचालक टिपिंगवर बंदी घालण्याची मागणी करतात. त्या बदल्यात ते कर्मचाऱ्यांना चांगला पगार देण्याचं आश्वासन देतात. टीप देणं न देणे हे आपल्या हातात आहे. काही वर्षपूर्वी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने Department Of Consumer Affairs ने हे स्पष्ट केलं होत कि रेस्टॉरंटमध्ये जो 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज आकारला जातो तो Service Tax सुद्धा पर्यायी आहे. म्हणजेच, आपल्याला रेस्टॉरंटची Service आवडत नसेल तर आपण Service Tax देण्यास नकार देऊ शकता. त्यामुळे उगाच पियर प्रेशर खाली येऊन टीप देऊ नका. खरंच Genuinely जर एखाद्याला टीप द्यावसं वाटत असेल तेव्हाच द्या. (Tipping Culture) Top stories.


 

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first