या मंदिराचं रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल !



आपल्या देशाला ” मंदिरांचा देश” म्हणून एक अलिखित ओळख आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मोठी नवीन जुनी मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक मंदिरामागे त्याचा असा एक विशिष्ट इतिहास, एक कथा आहे. याच मंदिरांच्या देशामध्ये एक अस मंदिर आहे, जे फक्त वर्षातून एकदाच फक्त दिवाळीच्या दिवसांमध्येच उघडतं आणि इतर दिवस ते मंदिर बंद असतं. दिवाळीचे दिवस सरले की, दिवा लावून पुढील वर्षभरासाठी हे मंदिर बंद करण्यात येतं. मुख्य बाब म्हणजे हे भारतातील एक मात्र असं मंदिर आहे, जे फक्त दिवाळीमध्ये उघडलं जातं. कोणतं आहे ते मंदिर आणि काय आहे त्यामागचा इतिहास आणि इतर रहस्यमयी गूढ गोष्टी ? जाणून घेऊया. (Hasanamba Temple) top stories

आता अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली आहे. सगळीकडे दिवाळीचा आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय. दुकानंही विविध वस्तुंनी सजलेली आहेत. भारतीयांसाठी दिवाळी म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सण. त्यामुळॆ दिवाळीआधी घरातील साफसफाई केली जाते आणि नंतर लक्ष्मी देवीचं पूजन केलं जात. याच दिवाळीच्या दिवसांत एका मंदिराला विशेष महत्व प्राप्त होतं. हे मंदिर म्हणजे कर्नाटक राज्यातील बेंगळुरू पासून १८० किमी अंतरावर हसन जिल्ह्यात वसलेलं हसनंबा मंदिर, जे देवीला समर्पित आहे. हे मंदिर फक्त दिवाळीमध्येच आठवडाभर उघडण्यात येतं. दिवाळीत या मंदिराचे दरवाजे उघडले जातात, आणि त्यानंतर 7 दिवसांनी दिवे लावले जातात, फुले आणि प्रसाद अर्पण केला जातो आणि या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. पुढे वर्षभराने याचे दरवाजे उघडले जातात. (Social News)

देवी शक्ती किंवा अंबा यांना समर्पित, हसनंबा मंदिर हे 12 व्या शतकात बांधल गेल असं सांगितलं जातं. जवळपास ८२३ वर्ष जुने मंदिर म्हणून देखील याची ख्याती आहे. या मंदिराला हसनची प्रमुख देवता मानल जात आणि हसन शहराच नाव हसनंबा देवीवरून पडल आहे. पूर्वी हसनला सिंहासनपुरी म्हणून ओळखल जात असे. आता वर्षातून फक्त एकदाच उघडण्यात येणाऱ्या या मंदिराची आणखी एक ख्याती आहे, ती म्हणजे हे एक चमत्कारिक मंदिर आहे असे सांगितलं जातं. भक्त इथे पत्र लिहून इच्छा मागतात आणि त्यांच्या इच्छा देवी पूर्ण करते. देशातील हे पहिल मंदिर आहे जिथे भक्त देवी आईला पत्र लिहून आपली इच्छा व्यक्त करतात. दरम्यान, दिवाळीच्या पर्वावर मोठ्या संख्येने भक्तगण इथे दर्शनासाठी पोहचतात. यामंदिरात देवीला फक्त तांदळाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य किंवा चमत्कार म्हणजे जेव्हा दिवाळीनंतर हे मंदिर बंद केलं जातं, त्यापूर्वी इथे एक दिवा लावला जातो आणि ताजी फुल देवीला वाहिली जातात. पण जेव्हा पुढच्या वर्षी हे मंदिर उघडल जात तेव्हा हा दिवा तसाच जळत असतो आणि वाहिलेली फुलसुद्धा ताजी असल्याचंन दिसून येत. शिवाय देवीला अर्पण केलेला प्रसादही पूर्ण वर्षभर ताजा राहतो. (Hasanamba Temple)

या मंदिराची पौराणिक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते. त्यानुसार अंधकासुर या राक्षसाने ब्रह्मदेवाकडून अदृश्य होण्याच वरदान मागितलं होतं. यानंतर त्याने पृथ्वीतलावावर अत्याचार करायला सुरुवात केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी भगवान शिवाने अंधकासुराचा वध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरातून रक्ताच्या थेंबाने तो राक्षस पुन्हा जिवंत झाला. असं सारखं सारखं होऊ लागलं आणि शेवटी शिवाने आपल्या सामर्थ्याने योगेश्वरी देवीची निर्मिती करून राक्षसाचा संहार केला. (Social News)

======

हे देखील वाचा :  वसुबारस हा सण का आणि कसा साजरा करावा?

======

दरम्यान, हे मंदिर वर्षातून एका आठवड्यासाठी उघडत असल्यामुळे या एका आठवड्यादरम्यान मंदिराला भेट देण्यासाठी खूप दूरवरून भक्त येत असतात. या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या मंदिराला भेट देण्याची एक विशिष्ट वेळ आहे. ती म्हणजे सकाळी ७ ते १० आणि दुपारी ३ ते रात्री १०. या आठवड्यात हसनंबा देवीच दर्शन घेता आल तर भाविक स्वत:ला भाग्यवान समजतात. या वर्षी हे मंदिर 24 ऑक्टोबर रोजी उघडलं असून ते ३ नोव्हेंबर रोजी बंद होईल. या दरम्यान भक्तगण पूजेच्या वेळेशिवाय कधीही मंदिरात भेट देऊ शकतात. (Hasanamba Temple) Top stories.


 

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first